‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
७० % लोकांचा हॉटेल मध्ये जाण्याचा उद्देश जेवणाचा नसतो, मार्केटमधे जाण्याचा उद्देश शॉपिंग चा नसतो, कॅफे मधे बसण्याचा उद्देश कॉफी पिण्याचा नसतो. लोकांचा खरा उद्देश कामाच्या व्यापातून थोडासा विरंगुळा मिळावा हा असतो. काही काळ बाहेर कुठेतरी जाऊन निवांत बसावे, भटकावे, कामाचा शीण कमी करावा या उद्देशाने लोक घराबाहेर पडत असतात. लोकांना टाईमपास करायचा असतो, आणि टाईमपास करण्याच्या नादात थोडेफार पैसेही खर्च केले जातात…
पण लोकांना जिथे येऊन आपला काही वेळ खर्च करायचा असतो तिथेच नेमके आपण त्यांना हवी ती सुविधा देऊ शकत नाही. आपण फक्त प्रोडक्ट विकण्याच्या दृष्टीने विचार करतो. प्रोडक्ट विकण्यासाठी वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण विचार करत नाही. आपल्या मुख्य व्यवसायाला चालण्यासाठी लोकांना तिथे यायला प्रवृत्त करेल अशी सोय आपण करत नाही. हि लहान लहान व्यावसायिकांची नकळतपणे होणारी चूक आहे.
माझं एखाद हॉटेल असेल तर मी तिथे फक्त टेबल खुर्च्या मांडण्यापेक्षा, जर थोड्या खेळणी, आईस्क्रीम सेंटर, कॉफी व्हेंडर उभे केले, आणि लोकांना निवांत बसून गप्प इमारत येईल असे लहान लहान स्टूल ठेवले तर त्या निमित्ताने जास्त लोक तिथे येतील आणि साहजिकच हॉटेलचा बिझनेस वाढेल…
जर माझे कॅफे शॉप असेल तर दोघा तिघांना तासनतास बसून गप्पा मारता येईल अशी व्यवस्था केली तर जास्त बझनेस वाढेल… अगदी त्यासाठी कोपऱ्या कापऱ्यात लहान लहान स्टूल असले तरी लोक तिथे येऊन गप्पा मारतील आणि सोबतच कॉफी सुद्धा खरेदी करतील.
लोक बागेत फिरायला येतात आणि फिरता फिरता आसपासच्या लहान लहान विक्रेत्यांकडून काहीतरी खरेदी करतात
लोक मॉल मधे फिरायलाच जात असतात. फिरता फिरता दुकानात डोकावताना त्यांना एखादी वस्तू आवडू शकते, मग ते लगेच खरेदी करतील किंवा भविष्यात खरेदीचे नियोजन करतील.
थिएटर मधे लोक टाईमपास करायलाच जातात. तिथेही आता लहान लहान शॉप्स असतात. चित्रपट सुरु व्हायच्या आधी किंवा संपल्यानंतर तिथेच काहीतरी खरेदी करण्याची इच्छा होते.
हायवेच्या कडेला एखादे हॉटेल असेल आणि समोर मोठी मोकळी जागा असेल तर तिथे लहान मुलांसाठी भरपूर खेळणी ठेवा. लहान मुलं खेळण्यासाठी त्याच हॉटेल मध्ये जाण्याचा हट्ट धरतील आणि त्यानिमित्ताने त्यांचे पालक तुमच्या हॉटेल मध्ये जेवायला येतील
व्यवसायात गोष्टी एकमेकांना जोडून असतात. पण आपण एखाद्याच गोष्टीकडे लक्ष देतो आणि इतरांकडे दुर्लक्ष करतो.
लोकांना टाईमपास करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. एखाद्या मोकळ्या जागेवर थोड्या थोड्या अंतरावर खुर्च्या टाकून ठेवा… भरपूर लोक येतील. मग तिथे येणाऱ्या लोकांसाठी चाट, कॉफी, स्नॅक्स, चहा असे पदार्थ उपलब्ध करून द्या…
तुमच्या गावातील जे मुख्य मार्केट आहे तिथे हा प्रकार शक्य नाही, मग तिथे वेगळा मार्ग अवलंबवा. मार्केट पूर्णपणे स्वच्छ चकचकीत करा. चांगले रंगीबेरंगी लाईट्स लावून भरपूर रोषणाई करा, लहान लहान व्यावसायिकांना, हातगाडी चालकांना आपले व्यवसाय उभारायला उद्युक्त करा. रस्त्याच्या कडेने खुर्च्या स्टूल ठेवा, लोक त्या गाड्यांवर टाईमपास म्हणून काहीतरी खायला येतील, पर्यायाने त्यांची नजर संपूर्ण मार्केटवर पडेल, हळूहळू त्यांची तेथूनही कधीतरी काहीतरी खरेदी करण्याची इच्छा होईलच.
काहींना एकांत हवा असतो. काही मिनिट किंवा काही तास त्यांना शांतपणे एका जागी बसून अराम करण्याची इच्छा असते. अशांसाठी एखादे चांगले रिलॅक्स सेंटर सुरु करा. ते मोफत असू द्या… येणाऱ्यांसाठी चहा कॉफी पुरविण्याचे काम करा. भरपूर धंदा होईल.
तुमचं प्रोडक्ट विकणं तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहे, पण ते घेणं ग्राहकांसाठी सक्तीचे नाही. म्हणून त्यांना आधी आपल्या प्रोडक्ट च्या आसपास भटकण्यासाठी प्रवृत्त करावे लागते, आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रोडक्ट कडे आकर्षित करावे लागते…. थोडक्यात लोकांना टाईमपास करण्यासाठी जागा द्या… लोक तुम्हाला बिझनेस देतील…
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
खूप सुंदर सांगतात आपण धन्यवाद????
Good
छान आयडिया दिलीय
Nice idea