‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
CherishX ही कंपनी मार्च २०१६ ला मायांक सिंघानिया (CTO & Co-Founder), इच्छित अग्रवाल (Founder), मुदित जीजू (Co-Founder), योगेश यादव (Founder) यांनी चालू केली. हे चौघेपण आयआयटी, आयआयएम चे विद्यार्थी ! दिल्लीमध्ये कंपनीचे मुख्य कार्यालय असून जवळपास १ लाखाहून अधिक ग्राहकांना सेवा पुरवितात.
CherishX च्या माध्यमातून हे लोक वेगवेगळे अनुभव आपल्याला देतात.
जसं की, तुम्हाला आयपीएल मॅच बघायची आहे ! आणि ते पण एका मोठ्या प्रोजेक्टर स्क्रीनवर..! तर मग अँप घ्या. प्रोजेक्टर भाड्याने मागवा. यांचे लोक येतात. ऑडिओ स्पिकर्स, मोठी स्क्रीन सगळं भरून..!
आपल्याला आवडत्या कुत्र्याशी खेळायचं आहे? ते पण मिळतं. कुत्र्याची जात निवडा. हे लोक कुत्रा आणतात. दिवसभर तुमचा मोकळा वेळ प्राण्यांबरोबर घालवा (Date with Dog).
अशा मजेशीर बऱ्याच सर्व्हिसेस ही कंपनी देते. यामध्ये Money plant for mom, Candlelight dinner, Ballon & Room decorations, Anniversary Specials, Home Surprises, Mother’s Day Special, Fun activities, Breathtaking escape aboard a helicopter, Hangouts, Premium Car Rides, Stable Dates (horse riding classes), Salsa Classes, Proposal Settings, Social / Orphanage Visits, Adventure Sports like Fly Boy, Qutab Golf Area, Golf Sessions with Trainers सर्व्हिसेस आहेत.
सध्या बेंगलुरू, दिल्ली, कोलकाता, जयपूर, इंदोर या ठिकाणी ही कंपनी सेवा पुरविते.
_
दिनेश कुडचे
Software engineer, tech enthusiast
security expert, fintech expert
writer @ दै. सकाळ, पुण्यनगरी
Director @ Technowell Web Solutions
_
संकलन
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
अत्यंत उपयुक्त माहिती दिनेश सर. नवं काहीतरी वाचायला मिळलं. उद्योजक मित्र नवी माहिती दिल्याबद्दल आभारी
Useful information
Thanks sir