स्टार्टअप कट्टा – WeWork…. व्यवसायांसाठी अल्प दरात Shared Workspace पुरविणारे स्टार्टअप


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

ऑफिस हवंय? ते पण टिअर १, टिअर २ शहरात? कसं घ्यायचं? कसं परवडणार? व्यवसाय होईल का पण? यासारखे प्रश्न बाजूला ठेवा आणि जॉईन करा विवर्क..! काय आहे WeWork? पाहुया..

WeWork ही अमेरिकी कंपनी असून नव्या स्टार्टअप्सना, उद्योजकांना, लहान व्यवसायांना, मोठ्या कंपन्यांना सामायिक कार्यक्षेत्रे (shared workspaces) पुरविण्याची व्यवस्था करतात. २०१० साली न्यूयॉर्कमध्ये स्थापित झालेली ही कंपनी आज जगभरात ११४ हुन अधिक शहरांमध्ये सेवा पुरविते. या कंपनीत ५०००+ लोक कार्यरत आहेत. ऍडम न्यूमन आणि मिगुल मॅककेल्वि या दोघांची संकल्पना आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे.

आजपर्यंत या कंपनीने जवळपास १,००,००,००० चौ.फुट जागा वेगवेगळ्या व्यवसायांना उपलब्ध करून दिलेली आहे. आज कंपनीचे ४७ अमेरिकी डॉलर्स इतके बाजारमुल्य आहे.

भारतात बेंगलुरू, मुंबई, हैद्राबाद, नोएडा, गुरगाव इ. ठिकाणी कंपनी सेवा पुरविते. तुमच्या व्यवसायात असणाऱ्या मनुष्यबळानुसार आपणांस ऑफिससाठी जागा दिली जाते. सर्वसाधारतः १-२०, २०-१००, १००-१०००, १०००+ इतक्या मनुष्यबळ वर्गवारीत जागेचं नियोजन केलं जातं. मुंबईत ७,५०० ते ३५,८०० रुपये/दरमहा पर्यंत जागा उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये सुपरफास्ट इंटरनेट, रोजची ऑफिस स्वच्छता, आयटी सपोर्ट, २४*७ ऍक्सेस, पार्किंग व्यवस्था, बिझनेस प्रिंटर्स, कॉफी, मेल सर्व्हिस, फोन सर्व्हिस इ. सेवा पुरविल्या जातात.
_

दिनेश कुडचे
Software engineer, tech enthusiast
security expert, fintech expert
writer @ दै. सकाळ, पुण्यनगरी
Director @ Technowell Web Solutions
_

संकलन
उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


3 thoughts on “स्टार्टअप कट्टा – WeWork…. व्यवसायांसाठी अल्प दरात Shared Workspace पुरविणारे स्टार्टअप

  1. chan ahe hi navin malika. khup chan mahiti ahe sir. bharatat aspan kahi ahe he aaj ch kalal. dhanyavad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!