‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
आज सोशल मीडियाच्या जगतात एकमेकांच्या भेटीपण व्हर्च्युअल झाल्यात. लोक इतके ‘ऍडिक्टेट’ झालेत की त्यांचे खेळपण आता ऑनलाईन झालेत. कॅरम खेळायचं आहे, ये ऑनलाईन ! बुद्धिबळ खेळायचं आहे, ये ऑनलाईन ! त्यात काय ते नवीन पबजी..! प्रत्यक्ष मैदानावर खेळले जाणारे खेळ हे आता हळू हळू कमी होत चालले आहेत. परंतु काही लोक असे पण आहेत की जे सकाळी ५ ला उठून पोहायला जातात, सायकलिंग करतात, क्रिकेट खेळतात, बॅडमिंटन खेळतात. अशा लोकांना मेट्रो शहरांत सहकारी मिळणं देखील फार कठीण झालंय. याला ‘व्हर्च्युअल’ पर्याय आणला बेंगलोरच्या ‘प्लेयो’ या अँप ने…!
मोठ्या शहरात खेळांच्या बऱ्याच तक्रारी गौरवजीत सिंह यांना दिसून आल्या. खेळाडू मिळत नाही, फुटबॉलचं मैदान वेटिंगमध्ये, मेंबरशिप भरुनदेखील प्रत्यक्षात जाणं होत नाही, ग्रुपमध्ये बोलणं होत नाही, ट्रेनर मिळत नाही अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तर स्वरूपात ‘प्लेयो’ हे अँप गौरवजीत सिंग यांनी १ मे २०१५ ला प्रत्यक्षात आणलं. प्लेयोवर १५०० हुन अधिक मैदाने/कोर्ट्स, १ लाख खेळाडू सभासद आहेत. भारतात तसेच दुबईमध्ये हे अँप उपलब्ध आहे.
या अँपमुळे ओळखी वाढतात, मैत्री वाढते, तुमच्या आवडीनिवडीनुसार हुशार सहकारी मिळतात, मॅच/चॅलेंज लावू शकता, मित्रांना इन्व्हाईट करू शकता, कोणाबरोबर खेळायचं आणि कोणाबरोबर नाही ते ठरवू शकता. खेळातील विशेष रेटिंग वाढवू शकता, पाहिजे ते ग्राउंड/कोर्ट ऑनलाईन बुक करू शकता ते पण आपल्या वेळेनुसार, तुमची प्रगती ऍनालीटीक्सच्या माध्यमातून पाहू शकता. बॅडमिंटन, टेनिस, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस, बास्केटबॉल, रनिंग, सायकलिंग, व्हॉलीबॉल, रब्बी, कबड्डी, थ्रोबॉल, अल्टिमेट फ्रिस्बी, स्क्वाश, पेडल, पिकलबॉल असे ३५+ खेळ ऑनलाईन उपलब्ध आहेत.
या अँपला सीड फंडिंगमध्ये १० लाख अमेरिकी डॉलर्स मिळालेले आहेत. २०१८ मध्ये गुगलकडून या अँपला ‘बेस्ट अँप ऑफ २०१८ – बेस्ट हिडन जेम’ हा पुरस्कार मिळाला आहे. भविष्यात २१ ते ५० वर्षादरम्यानचे १२ ते १५ कोटी लोक हे अँप वापरतील असा विश्वास गौरवजीत सिंह यांना आहे.
दिनेश कुडचे
Software engineer, tech enthusiast
security expert, fintech expert
writer @ दै. सकाळ, पुण्यनगरी
Director @ Technowell Web Solutions
_
संकलन
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
sarani mandleli paristhiti far ch bhayavah ahe. khelayala bolavayala pan manas app vaparatat mhanaje kamal ch ahe. mothya shaharat ekakipana far ch vadhat chalalay. tari app cha khup motha fayada ahe. chan ahe he app. asech lekh liha kudache sir.
sir/madam I am Sunil Chavan from Beed Maharashtra i am Kung fu Karate techar so i want my sports online stage so plz give me advice plz thanks
plz call 7744034490 Shrikant Avhad