स्टार्टअप कट्टा – तुम्हाला हवं ते घरपोच पुरविणारे Dunzo App


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

महत्वाचे डॉक्युमेंट्स घरी विसरलात? मित्राला रूमची चावी द्यायची आहे? डबा आणायचा आहे? किराणा द्यायचा आहे घरी? कपडे ड्रायक्लिनला द्यायचे आहेत? पार्सल्स द्यायचे आहेत? पाहिजे ते काम सांगा, डंझो अँपमधून !

डंझो अँपची सुरुवात जुलै २०१४ मध्ये एका छोट्या व्हाट्सअँप ग्रुपपासून झाली. कबीर विश्वास, अंकुर अग्रवाल, दलविर सूरी, मुकुंद झा या मुंबई विद्यापीठातील चौघांनी मिळून डंझो सेवा प्रत्यक्षात आणली. “कोणतेही काम असो ते आम्ही ६० मिनिटाच्या आत पोहोचवू” या आत्मविश्वासावर आज कंपनी बेंगलुरू, दिल्ली, पुणे, हैद्राबाद, गुरगाव, चेन्नई या प्रमुख शहरात कार्यरत आहे. कंपनीचे मुख्यालय बेंगलुरू येथे आहे. जवळपास १० लाख डिलिव्हरीच्या ऑर्डर्स दर महिन्याला कंपनीला मिळतात. गुगलनं यांचं काम बघून २०१७ मध्ये १२.३ मिलिअन अमेरिकी डॉलर्स गुंतवले आहेत.

कोणतीही वस्तू असो ती स्वतः खरेदी करून ही कंपनी आपल्या पाहिजे तिथे आणून देते. यामुळे तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज वाटत नाही. कंपनी २४*७ सेवा पुरविते. औषधे, खाद्यपदार्थ, किराणा, ड्रायक्लिन सेवा, पुस्तके, मोबाईल, वस्तू, पार्सल्स, पान, फळे, भाज्या अशा विविध सेवा आपल्याला कमी खर्चात घरपोच मिळतात.

या अँपमध्ये मुख्यतः ‘मशीन लर्निंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. शहरी लोकांना जास्तीत जास्त आळशी करण्याचा प्रयत्न यामागे दिसून येतो. एकदा सॉफ्टवेअरला कामाची पद्धत कळली की सॉफ्टवेअर स्वतः काय चूक काय बरोबर हे ठरवतं. कुठं काय लागणार आहे? कुठे ताकद कमी पडते हे सगळं स्वयंचलित सॉफ्टवेअर ठरवतं.

दिनेश कुडचे
Software engineer, tech enthusiast
security expert, fintech expert
writer @ दै. सकाळ, पुण्यनगरी
Director @ Technowell Web Solutions
_

संकलन
उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!