स्टार्टअप कट्टा – “अमेझॉन गो” ओळख भविष्याची… स्वयंचलित खरेदीची…


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

व्यवसाय ऑनलाईन झाला पाहिजे, ऑफलाईन मार्केटला स्कोप नाही, असं आपण वारंवार ऐकतो. पण अमेझॉन, स्विगी या कंपन्या आता ऑफलाईन मार्केटला उतरत आहेत. भारतामध्ये फक्त १०% लोकांना इंग्रजी लिहिता-वाचता येते. ही बाब या कंपन्यांना लक्षात आली. म्हणून काही महिन्यांपुर्वी अमेझॉननं ‘हिंदी अमेझॉन’ पोर्टल चालु केलं. संपूर्ण जगाचं लक्ष ‘भविष्यात नेमकी अर्थव्यवस्था कशी असेल’ ? यावर केंद्रित झालेली आहे. येत्या काही वर्षात ‘फिनटेक’ क्षेत्रात प्रचंड क्रांती होईल, असं जाणकारांचं मत आहे.

अमेझॉननं पहिल्यांदाच ५ डिसेंबर २०१६ ला सिएटल (वॉशिंग्टन, अमेरिका) इथे ‘अमेझॉन गो’ नावाची ‘ऑनलाईन-ऑफलाईन, स्वयंचलित स्वरूपातील स्टोअर संकल्पना’ चालु केली. या स्टोअरची खास ओळख म्हणजे संपूर्ण स्टोअर हे ‘पुर्णपणे स्वयंचलित’..! ऐकायला जसं नवल वाटतं तसं प्रत्यक्षात बघायला फारच मजा येईल.

हे सर्व अनुभवण्यासाठी, आपल्याला सर्वप्रथम ‘अमेझॉन गो’ हे अँप डाउनलोड करून घ्यावं लागेल. हे अँप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही स्मार्टफोनसाठी उपलब्ध आहे. शॉपिंग करण्यापूर्वी हे अँप आपल्या अमेझॉन अकाउंटला लिंक्ड असणे गरजेचे आहे. स्टोअरच्या सुरुवातीला क्युआर कोड स्कॅन करून स्टोअरमध्ये प्रवेश दिला जातो. या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या वस्तू खरेदी करू शकता. खाद्यपदार्थ, मांसाहारी पदार्थ, मर्यादित किराणा, लिकर इत्यादींची विक्री या स्टोअरमार्फत होते. संपूर्ण स्टोअरमध्ये वेगवेगळे सेन्सर्स बसविण्यात आलेले असून त्यामधुन ग्राहकाच्या खरेदीवर लक्ष ठेवले जाते. यामध्ये प्रत्यक्ष रॅकवर देखील वजन तपासणाऱ्या विशिष्ट सेन्सर्सचादेखील समावेश आहे. हे सेन्सर्स ग्राहकाने कोणती वस्तू उचलली, त्यांची संख्या, त्यांचं एकूण वजन याप्रमाणे बिलामध्ये वस्तूंच्या किमती नोंदविल्या जातात. सर्व वस्तु आपल्याला एका ‘व्हर्चुअल चेकआऊट’ मध्ये दिसतात. समजा, आपण एखादी घेतलेली वस्तू नको असेल आणि ती वस्तू जर तुम्ही परत त्या रॅकवर ठेवली तर त्याप्रमाणे बिलामध्ये वजावटदेखील लगेच दिसुन येते. अशा प्रकारचा प्रयोग सर्वप्रथम मी मलेशियात एका हॉटेलमध्ये पाहिलेला ! आहे ना मजा ! खरेदी पूर्ण झाल्यानंतर आपणांस कोणत्याही प्रकारे कॅशिअरला पैसे द्यावे लागत नाही. ज्यावेळी आपण या स्टोअरमधुन बाहेर पडता तेव्हा सेल्फ-चेकआऊटद्वारे आपल्या अमेझॉन अकाउंटमधुन पैशाची वजावट केली जाते.

ही प्रणाली तयार करताना प्रामुख्याने कॉम्प्युटर व्हिजन, डीप लर्निंग अल्गोरिदम्स, आर्टिफिशल इंटेलिजन्स, सेन्सर फ्युजनसारख्या अत्यंत उच्च ताकदीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने टेस्ला, गुगल सारख्या कंपन्या ‘स्वयंचलित वाहने’ तयार करण्यासाठी करतात. यांमुळे खरेदी, पारदर्शक सुविधा आणि परिपूर्ण व्यवहार सुसह्य होणे शक्य होते. या तंत्रज्ञानामुळे एफएमसीजी कंपन्यांच्या कामांच्या धोरणामध्ये बदल अपेक्षित आहेत.

आज अमेरिकेत सिएटल, शिकागो, सॅनफ्रासिस्को, न्यूयॉर्क येथे अमेझॉन गो चे स्टोअर्स उपलब्ध आहेत. एकूण ११ स्टोअर्समार्फत ही यंत्रणा कार्यरत आहे. सध्या अमेझॉन प्रायोगिक तत्वावर या स्टोअरच्या विकासामध्ये काम करत आहेत. पुढील काही वर्षांमध्ये अमेझॉन अशी स्टोअर्स वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. ब्लूमबर्गच्या सप्टेंबर २०१८ च्या आकडेवाडीनुसार, अमेझॉन २०२१ पर्यंत जवळपास ३००० स्टोअर्स अमेरिकेत चालु करेल.

दिनेश कुडचे
Software engineer, tech enthusiast
security expert, fintech expert
writer @ दै. सकाळ, पुण्यनगरी
Director @ Technowell Web Solutions
_

संकलन
उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “स्टार्टअप कट्टा – “अमेझॉन गो” ओळख भविष्याची… स्वयंचलित खरेदीची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!