रागाची किंमत काय ?


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

प्रत्येक घटनेत आपल्या वागण्याचे किमान दोन पर्याय असू शकतात. आपण फक्त थोडं थांबून, थोडं हळू होऊन त्या पर्यायांचा विचार करायला पाहिजे.
कोणतीही घटना अचानक घडत नाही. आपल्याला राग येईल असा प्रसंग अचानक घडत नाही. अनेक छोट्या घटनांमधून आपण आपल्या मनाशी ठरवत जातो, ती विशिष्ट घटना घडणार असेल तेव्हा मी कसे वागेन. आणि जसा वेळ जाईल किंवा जशी ती मुख्य घटना घडण्याची वेळ जवळ येत जाईल, तसे आपण आपल्या मनाशी ठाम निर्धार करतो की आपण कसे वागणार आहोत/react होणार आहोत. Our previous experiences, builds our beliefs and they fuel our anger many times. आपल्या त्या प्रसंगातल्या वागण्या बद्दल आपण इतके ठाम होऊन जातो की ती घटना घडतात सुरवातीला समोरच्या व्यक्तीच्या कदाचित सकारात्मक व चांगल्या reactions कडे सुद्धा आपण दुर्लक्ष करतो व आपण स्वतः:शी ठरवल्या प्रमाणे वागायला सुरू करतो व पुढे एक नकारात्मक घटनांची/reactions ची एक साखळी निर्माण होते.

म्हणून थोडं थांबलं पाहिजे, थोडं स्लो झाल पाहिजे. आपण थोडं थांबून स्वत:ला खालील प्रश्न विचारले पाहिजे

ती व्यक्ती समोर आल्यावर आपण कसे वागायचे ठरवले आहे?
आपण तसे वागल्यानंतर त्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय असेल? ती व्यक्ती काय करेल? कशी वागेल?

जर वरील प्रश्नाचे आपले उत्तर “मला त्याची फिकीर नाही… I don’t care… तो त्याचा प्रश्न आहे… त्यांनी काय करायचं ते त्याचं ते बघतील … मला काय त्याचं.. ” अशा प्रकारची असतील तर समजून घ्या, तुमचे वागणे पुढे एक मोठी नकारात्मक घटनांची साखळी निर्माण करणार आहे, व कदाचित नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.

आता विचारा “समजा मी अस नाही वागलो, तर काय होईल?”
तुमची वरील उत्तर या प्रश्नाला सुद्धा योग्य असू शकते, valid असू शकते याचा सुद्धा विचार करा. आणि म्हणून हे एक कारण आहे, दुसऱ्या पर्यायाने वागण्याचं समर्थन करण्याचे.. कदाचित सकारत्मक घटना घडतील…

मी असं नाही वागलो तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधा. समोरची व्यक्ती कशी प्रतिक्रिया देईल? त्याने घडणाऱ्या घटनांवर काय परिणाम होतील?
कदाचित तुम्हाला तुमचा वेगळाच फायदा त्यात दिसून येईल…
पण एक सकारात्मक घटनांची साखळी पुढे निर्माण होईल..

प्रत्येक घटना दोनच प्रकारच्या घटनांची व परिणामांची साखळी निर्माण करू शकते… नकारात्मक आणि सकारात्मक.

आपण निवडलेल्या आपल्या वागण्याचे पर्याय ठरवतात कोणत्या प्रकारच्या घटनांची व परिणामांची साखळी पुढे निर्माण होणार आहे. म्हणजेच आपण स्वतः ठरवतो पुढे काय घडणार आहे ते. जेव्हा नकारात्मक घटनांची व परिणामांची साखळी निर्माण करतो, तेव्हा आपण दुसऱ्याला नि इतर सगळे आपल्या वागण्याला दोष देत असतात. परंतु आपण जेव्हा जाणीवपूर्वक सकारात्मक घटनांची व परिणामांची साखळी निर्माण करतो तेव्हा त्याचे परिणाम देखील सकारात्मक असतात. बहुतेक वेळेस आपले सकारात्मक वागणे समोरच्याला अनपेक्षित धक्का देऊन जाते. सर्वात महत्वाचे आपण आपल्या भावनांचा कंट्रोल करत असतो, आपल्या भावना आपल्यावर कंट्रोल करत नसतात. नकारात्मक पर्याय निवडल्यास बहुतेक वेळेस आपल्या भावना समोरची व्यक्ती कंट्रोल करीत असते.

आपल्याला एकट्याला जमणार नसेल तर आणि शक्यतो अशा प्रसंगी आपल्या सोबत जे आपले जवळचे असतील आपले कुटुंब असेल, त्यांचा सोबत चर्चा करा, समजा पुढे जे घडणे अपेक्षित आहे, त्या मध्ये आपल्या डोक्यात असे वागायचे घोळते आहे, पण त्या ऐवजी वेगळं वागलो तर? ते काय असू शकेल? त्याचे परिणाम काय होतील? ते परिणाम आपल्या आयुष्यावर, पुढे घडणाऱ्या घटनांवर काय परिणाम करतील ? तसे घडलेले आपल्याला चालणार आहे का?

थोडं थांबा… हळू दीर्घ श्वास घ्या… एक ते दहा अंक मोजा… विचार करा… आता जसे वागायचे ठरवले आहे त्याने काय काय घडेल, आणि यापेक्षा वेगळे वागलात किंवा जसे वागायचे ठरवले आहे तसे वागलात नाही तर काय घडेल.

योग्य पर्यायाचा विचार करून निर्णय घ्या आणि त्याप्रमाणे वागा.

_

निलेश गावडे
९६७३९९४९८३

ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach

www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!