स्टार्टअप कट्टा – क्रेडिट कार्ड चा नवा अवतार BonPe


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

भारतामध्ये सध्या फिनटेक तंत्रज्ञानाचा आवाका वेगाने वाढत आहे. यामध्ये बरेच अमुलाग्र बदल आपण पाहिलेत. इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड्स, आरटीजीएस यापुढे जाऊन युपीआय तंत्रज्ञान आलंय. त्यातही पुढे जाऊन आता क्रेडिट कार्ड्स ही संकल्पना वेगाने पसरत आहे. सध्या भारतात ५ कोटीहून अधिक लोक क्रेडिट कार्ड्स वापरतात. तरीपण हे प्रमाण लोकसंख्येच्या १% पेक्षा कमी आहे. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होतच आहे. याच संकल्पनेला आधारित ‘बॉन कार्ड’ स्टार्टअपमध्ये आणण्यात ‘बॉनपे’ ला यश आलंय.

‘सॅलरीड एम्प्लॉईज’ना ज्या सोयी मिळतात त्या सोयी व्यावसायिकाला मिळतातच असं नाही. पुणेस्थित बॉनपे हा स्टार्टअप भास्कर (बोस्की) कोडेंनी २०१६ला चालु केला. कोंडेंना वयाच्या ८व्या वर्षांपासून संगणक तंत्रज्ञानाचे प्रचंड वेड होते. १६व्या वर्षी कॉम्प्युटर प्रोग्रॅम त्यांनी लिहिला. पुण्यात असताना ते सतत उबेर आणि ओलामधून प्रवास करायचे. प्रवास करता करता ड्राइवर लोकांशी त्यांच्या गप्पा व्हायच्या. या दरम्यान त्यांच्या समस्या, अडचणी कोडेंनी जाणून घेतल्या. याला पर्याय म्हणून बॉनपे ची निर्मिती झाली.

आज १० हुन अधिक शहरांमध्ये बॉनपे कार्यरत आहे. क्रेडिट कार्डप्रमाणेच ‘बॉन कार्ड’ कर्मचाऱ्यांना दिलं जातं. कर्मचारी ते कार्ड फक्त ऑफिस कामासाठीच वापरू शकतात. या कार्डला विशिष्ट क्रेडिट (रु. ५०० ते रु. ५०००) लिमिट दिलं जातं. यातून सर्व जमा-खर्च ऍनालीटीक्सच्या माध्यमातून पाहू शकता. दर आठवड्याला बॉनपे बिल खात्यातुन वजावट केले जाते. आजपर्यंत बॉनपे ने २०,००० कार्ड्स वितरित केलेत. यावर जवळपास २ लाखांहून अधिक व्यवहार होतात. प्रीपेड स्वरूपातही हे कार्ड उपलब्ध आहे. विविध कंपन्यांशी बॉनचे जाळे असून त्या माध्यमातुन ते कर्मचाऱ्यांना गरजेसाठी पैसे पुरवितात.

या स्टार्टअपला सीड फंडिंग राऊंडमध्ये ओमिडियार नेटवर्क, ऍक्सिलोर, बेटर कॅपिटल मार्फत १.१ मिलिअन अमेरिकी डॉलर्स (७.६५ कोटी रु.) फंड मिळाला आहे. यातून बॉनपे वेगवेगळ्या बँकांशी जोडण्यात येईल.

दिनेश कुडचे
Software engineer, tech enthusiast
security expert, fintech expert
writer @ दै. सकाळ, पुण्यनगरी
Director @ Technowell Web Solutions
_

संकलन
उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!