‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
तुम्ही तुमचा स्वत:चा यशस्वी व्यवसाय उभारायचे योजिले आहे, त्या साठी तुम्ही तुमच्या व्यवसायाचे विजन (vision) व मिशन (mission) स्टेटमेंट तयार केले असेल, परंतु डेसीजन स्टेटमेंट बनवले आहे काय?
“जेव्हा कधी तुम्ही एखादा यशस्वी उद्योग बघता, कोणीतरी एकदा साहसी निर्णय घेतलेला असतो” – पिटर ड्रकर
यशस्वी उद्योग उभारायची पहिली पायरी म्हणजे तसा उद्योग उभारायचा समर्पित निर्णय घेणे. त्याविषयी थोडा विचार करा. तुमचा व्यवसाय यशस्वी करण्याची पहिली पायरी म्हणजे तो यशस्वी करण्याचा निर्णय घेणे. बर्याचदा लोक व्यवसायात उडी घेतात आणि लगेच ग्राहक कसे मिळवता येतील, पैसे कसे कमावता येतील, विक्री कशी करता येईल, यावर लक्ष द्यायला सुरवात करतात. पण असे करताना ते संपूर्ण समर्पित नसतात. आणि जेव्हा अपेक्षित यश मिळत नाही, तेव्हा वैतागून ते प्रयत्न सोडून देतात, बर्याचदा व्यवसायच बंद करतात.
परंतु जेव्हा तुम्ही मजबूत इराद्याने, ठाम निर्णय घेऊन, निर्धाराने व्यवसायात उतरता तेव्हा तुम्ही त्यात यशस्वी होण्यासाठी जे काही करावे लागेल त्या सर्व गोष्टींची तयारी करून उतरता.
डेसीजन या शब्दाची उत्पत्ति लॅटिन शब्द Decedere पासून झाली आहे ज्याचा अर्थ बंद करणे (to cut off from) असा होतो. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता तेव्हा तुम्ही इतर शक्यता बंद करता. व्याखे प्रमाणे, जेव्हा तुम्ही यशस्वी व्यावसायिक होण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही अयशस्वी होण्याच्या सर्व शक्यता, सर्व पर्याय बंद करता.
यात ताकत आहे, ऊर्जा आहे! आणि तुम्ही तुमचा यशस्वी उद्योग उभारण्यासाठी तुम्हाला जे काही करावे लागेल ते करण्यासाठी तुम्हाला असाच समर्पित ठाम निर्णय घ्यावा लागेल.
अनेक जण जे व्यवसाय सुरू करतात अथवा सुरू करण्यात उत्सुक असतात त्यांनी असा ठाम व समर्पित निर्णय घेतलेला नसतो. ते पुढे काय होईल याची वाट बघत असतात, आपल्याला ग्राहक मिळतील या आशेवर असतात. कुठेही समर्पण अथवा दृढनिश्चय नसतो. तुमच्या बाबतीत असे होऊ देऊ नका. प्रयत्न”” ते “यश” असा बदल घडवण्यासाठी सर्वात प्रथम ठाम व समर्पित निर्णय घेणे गरजेचे असते. त्यासाठी तुमचे “”डेसीजन स्टेटमेंट” तुम्ही लिहिणे महत्वाचे आहे. “
उद्योग उभारणे सोपे नाही. त्यात अनेक अडचणी उभ्या राहतात. जे जे करावे लगेल त्यासाठी तुम्ही निर्धार केला नसेल, तर तुम्ही यशवी होणार नाहीत. जेव्हा तुम्ही यशस्वी उद्योजक होण्याचा ठाम निर्णय घेता आणि तुमच्या डेसीजन स्टेटमेंट सोबत रोज कनेक्ट होता, तेव्हा तुमच्या कडे जास्त ठाम उद्धिष्ठ, स्पष्टता, प्रेरणा, प्रेरक हेतु व केन्द्रित लक्ष असते. तुमचं निर्धार, तुमचे डेसीजन स्टेटमेंट तुम्हाला तुम्ही उद्योजक का झालात आणि का तुम्हाला तुमच्या उद्योगात यशस्वी व्हायचे आहे या मागच्या कारणांची आठवण करून देत जाईल. जेव्हा तुम्ही तुमच्या डेसीजन स्टेटमेंट सोबत आणि त्यामागच्या कारणांसोबत अंतर्मनाने जोडले जाल तेव्हा तुम्ही यशस्वी होण्यासाठी जे काही करावे लागेल त्यासाठी प्रेरित व्हाल.
तसे बघायला गेलो तर एकट्या डेसीजन स्टेटमेंटला काहीच अर्थ नसतो, पण समर्पित व ठाम निर्णयामुळे व त्या सोबत रोज कनेक्ट झाल्यामुळे ज्या सातत्यपूर्ण क्रिया घडतात (consistent actions) ते जास्त महत्वाचे व उपयुक्त असते.
निर्धार वाक्य / डेसीजन स्टेटमेंट कसे असावे
शक्तीशाली डेसीजन स्टेटमेंटची खालील वैशिष्ठ्ये असतात :
स्पष्ट आणि संक्षिप्त
तुमचे डेसीजन स्टेटमेंट अगदी 10-15 वर्षे वयाचा मुलाला देखील सहज समजले पाहिजे.
सहज लक्ष्यात राहण्याजोगे
तुमचे निंर्धार वाक्य लक्ष्यात राहण्यास सोपे असले पाहिजे. ते कधीही आठवून उच्चारता आले पाहिजे.
भावना निर्माण करणारे
प्रत्यक्ष वाक्य पेक्षा त्या मागच्या भावना जास्त महत्वाच्या असतात.
क्रिया करण्यास प्रेरित करते
तुमचा सरवोत्तम निर्णय तो असतो जो तुमची इच्छा नसतांना देखील तुम्हाला क्रिया करण्यास प्रेरित करतो.
निर्धार वाक्य / डेसीजन स्टेटमेंट काय नसते
निर्धार वाक्य हे ध्येय नसते.
ध्येय / उद्धिष्ट टेरिफिक असते, पण तुमचे ध्येय गाठण्याची ताकद तुम्हाला तुमच्या निर्णयातून मिळते. एकदा का तुम्ही तुमचे निर्धार वाक्य तयार केले की तुम्ही तुमची उद्धिष्ट व ध्येय त्या अनुषंगाने, तुमच्या निर्णयास सुसंगत अशी ठरवू शकता. परंतु आधी निर्णय तर घेतला गेला पाहिजे, निर्धार केला गेला पाहिजे. म्हणून निर्धार वाक्य आधी तयार करावे लागेल.
निर्धार वाक्य हे तुमच्या व्यावसायिक हेतू विषयीची समर्पित घोषणा आहे.
तुमच्या भावना जागृत करेल असे एक निर्धार वाक्य तयार करा. एक शक्तीशाली निर्धार वाक्य तुम्हाला तुमच्या उद्योगाच्या आवडीशी जोडेल. ते तुमचं निर्धार व समर्पण पक्के करेल आणि व्यवसाय उन्नतीसाठी लागणार्या सातत्यपूर्ण क्रिया करण्यास तुम्हाला प्रेरित करेल. तुम्ही स्वत:ला विचारा “मी आता कोणता असा निर्णय घेऊ शकतो जो मला क्रियाशील करेल व मला वचनबद्ध करेल यशस्वी उद्योजक होण्यासाठी.”
तुमचे निर्धार वाक्य पाठ करा.
तुमचे निर्धार वाक्य रोज वाचा.
निलेश गावडे
९६७३९९४९८३
ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach
www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील