यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या पत्नीचे ऐका


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

धक्का बसला ? पण हे सत्य आहे. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तुमच्या व्यवसायात पुढे जायचे असेल तर तुमच्या पत्नीचे ऐका.

आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपल्याला क्लेशकारक प्रसंगातून आपली सुटका आपले अंतर्ज्ञान करते. आपल्याला पुढे घडणार्‍या वाईट घटनांची चाहूल आपल्याला आपले अंतर्मन, अंतर्ज्ञानाने करून देत असते, पण आपण बर्‍याच वेळा त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या उद्योगात सुद्धा असे प्रसंग अनेक वेळा येतात जिथे आपण एखादा चुकीचा निर्णय घेऊन बसतो किवा योग्य वेळेला निर्णय घेण्याचे टाळतो (वेळेत निर्णय न घेणे हा देखील चुकीचा निर्णय असतो) आणि पुढे जाऊन आपल्याला त्याचे दुसपरिनाम भोगावे लागतात. अशा प्रसंगी, जेव्हा तुम्ही द्विधा मनस्थितीत असाल तेव्हा कोणताही निर्णय घेण्या आधी, आपल्या पत्नीचे एकदा तरी नक्की ऐका व तिचा सल्ला अमलात आणता येईल का यावर नक्की विचार करा.

वैज्ञानिक अभ्यास असे सांगतो की पुरुषांपेक्षा स्त्रीयांचे अंतर्ज्ञान जास्त शक्तीशाली असते. जर्नल ऑफ अल्झायमर डिजिझ या पत्रिकेतील एका इश्यू मधील एक संशोधक अहवाल असा सांगतो की स्त्रियांचा मेंदू अनेक क्षेत्रात खूप जास्त कार्यरत असतो. परंतु यात स्त्रियांचा मेंदू सहानुभूती, अंतर्ज्ञान, सहयोग, स्व:नियंत्रण, योग्य चिंता या जास्त प्रमाणात दाखवतो. अभ्यास असेही सांगतो की स्त्रियांचा मेंदू नेतृत्व करण्यासाठी जास्त सक्षम असतो.

जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या पत्नीच्या या अंगभूत शक्तीस्थळांचा उपयोग नक्की करून घ्या. आपल्याकडे म्हंटलेच आहे “यशस्वी पुरुषा मागे स्त्रीचा हात असतो”. तो हात तुमच्या पत्नीचा असू द्या. तिच्या अंतर्ज्ञान (intuition) शक्तीचा योग्य उपयोग करा.

भगवान ओशो म्हणतात
– अंतर्ज्ञान शुद्धीच्या शिडीची सगळ्यात वरची पायरी आहे. खालची पायरी म्हणजे वृत्ती, मधली बुद्धी व सर्वात वरची अंतर्ज्ञान.

पत्नी तिच्या कुटुंबाशी भावनिक दृष्ट्या खूप जास्त गुंतलेली असते. तिच्या साठी तिचा संसार, तिचे कुटुंब आणि खास करून तिचा नवरा खूप महत्वाचे असतात. अनेक प्रसंगात जेव्हा तिला दोघांपैकी एक निवडायचे असते तेव्हा ती तिच्या नवर्‍याला प्राधान्य देईल. तिच्या साथी तोच तिचा सर्वस्व असतो. तिच्या स्वत: पेक्षा तिला तिच्या नवर्‍याचे आयुष्य, त्याचे सुख जास्त महत्वाचे वाटत असते. या कारणामुळे तिचे अंतर्ज्ञान तिला कायम तिच्या नवर्‍याची खुशाली कळवत असते. तिला तिच्या संसारवर येणार्‍या आरीष्टांची आधीच कल्पना करून देत असते. तिच्या या शक्तीचा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नक्की उपयोग करू शकता.

तुमच्या पत्नीला भावनिक दृष्ट्या सुद्धा तुमच्या उद्योगात सहभागी करून घ्या. तुमच्या पत्नीसोबत तुमच्या व्यवसायाची ख्याली खुशाली वर चर्चा करत चला. तुम्ही एक व्यावसायिक म्हणून ज्या अनुभवातून रोज जाताय त्याविषयी तिला सांगत चला. तुमचे अनुभव, तुमची चिंता, तुमची त्रास तिच्या सोबत खुल्यादिलाने शेअर करा. रोजची या कामासाठी एक वेळ अशी ठरवून घ्या. घराबाहेर तुमच्या आयुष्यात काय घडते आहे याची उत्सुकता तुमच्या पत्नीला असतेच, तुम्ही ते तिच्याशी शेअर करता याचा तिला वेगळा आनंद मिळतो. तुमची पत्नी जितकी तुमच्याशी भावनिक जोडली गेली आहे तितके ती तुमच्या व्यवसायाशी सुद्धा जोडली असेल तर तिला तुमच्या व्यवसायातिल किंबहुना त्यामुळे तुमच्या आयुष्यात पुढे घडणार्‍या क्लेशकारक घटनांची जाणीव तिचे अंतर्ज्ञान आधीच करून देईल, तुम्हाला फक्त ते समजून घ्यायचे आहे. ते 100% बरोबर असेलच असे नाही, पण अनेक प्रसंगी तुम्ही फायद्यातच असाल. निर्णय घेताना फक्त शांत डोक्याने तुमची पत्नी काय म्हणते याचा पण विचार करा.

_

निलेश गावडे
९६७३९९४९८३

ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach

www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!