ग्राहक सर्वोच्च आहे हे कर्मचाऱ्यांच्या डोक्यात घट्ट बसवा


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

बऱ्याचदा कंपन्या बंद पाडण्यात कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सिंहाचा वाटा असतो… खास करून सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये कर्मचाऱ्यांमुळे कंपन्या डबघाईला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. जिथे ग्राहकांचा थेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क येणार असतो तिथे ग्राहक टिकवायचा कि संपवायचा हे कर्मचारी ठरवतात. जिथे कर्मचारी ग्राहकांना नसती ब्याद समजतात तिथे कंपनीचे दिवाळे वाजणार हे निश्चित असते.

आपल्याला पगार जरी कंपनी देत असली, तरी कंपनीला पैसा ग्राहक देतो हे कर्मचाऱ्यांच्या लक्षात यायला हवे. ग्राहक टिकला तरच कंपनी टिकणार आहे, आणि कंपनी टिकली तरच आपली नोकरी टिकणार आहे हे कर्मचाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. म्हणजेच कंपनी असो किंवा कंपनीचे कर्मचारी, दोघांनीही ग्राहकांना सर्वोच्च सन्मान देणे आवश्यक आहे. पण आपल्याकडे नेमका याच्या उरफाटा कारभार चालू असतो. मोठ्या कंपन्यांमधे कर्मचारीच ग्राहकाला किती गांभीर्याने घ्यायचं हे ठरवणार असतात, पण कर्मचारी ग्राहकांच्या तक्रारींना आता गांभीर्याने घेईनासे झाले आहेत. अगदी कंपनी मॅनेजमेंट आणि कर्मचाऱ्यांच्या वादात सुद्धा अंतिम फरफट ग्राहकांनीच होत असते. साहजिकच ग्राहक काही काळ वाट पाहतो आणि दुसऱ्या कंपनीकडे वळतो.

ग्राहक कमी झाला कि कंपनी डबघाईला येते, कंपनी संपली कि याच, ग्राहकांना गृहीत धरणाऱ्या, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातात. ग्राहकांचं यात नुकसान काहीच होत नाही, जे काही होत ते कर्मचारी आणि कंपनी मालकाचंच…

कर्मचारी कंपनीत रुजू झाला कि त्याच्यावर पहिले संस्कार झाले पाहिजेत ते ग्राहक सेवेचे.
ग्राहक हाच आपल्यासाठी सर्वोच्च आहे. तो टिकला तर आपण टिकू हे त्याच्या डोक्यात घट्ट बसले पाहिजे.
कितीही सांगितले तरी सगळे कर्मचारी चांगले काम करतील याची शाश्वती नसते त्यामुळे थेट ग्राहकांच्या सेवेशी संबंध येणारे जे कर्मचारी असतील त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक चांगला व्यक्ती असावा.
कर्मचाऱ्यांसमोर ग्राहकांशी वागताना स्वतः मालकाने अतिशय अदबीने वागावे तसेच, ग्राहक सेवेमध्ये स्वतः वेळोवेळी लक्ष घालावे. यामुळे कर्मचाऱ्यांवर ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे दडपण वाढते.
वेळोवेळी कर्मचाऱ्यांसाठी काही व्यावसायिक वक्त्यांचे लेक्चर्स आयोजित करावे, ज्यात जास्त भर कार्यक्षमता आणि ग्राहक सेवा यावर असेल.
ग्राहक सेवेत कुचररी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक शासन करा, यामुळे इतर कर्मचारी स्वतःच्या वर्तणुकीत सुधारणा करतात…

कर्मचाऱ्यांच्या डोक्यात एक गोष्ट घट्ट बसली पाहिजे… ग्राहक टिकला तर आपली नोकरी टिकणार आहे. ग्राहक हाच आपल्यासाठी सर्वोच्च आहे.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!