ग्राहकांनी तुमच्याकडे का यावं ? या प्रश्नाचं उत्तर द्या


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

दहा पंधरा वर्षे झाली असतील, नॅशनल जिओग्राफिक वर एका कॅफे ची डॉक्युमेंटरी पहिली होती. ती अजूनही बऱ्यापैकी लक्षात आहे. फक्त, मला त्या कॅफे च नाव आता आठवत नाहीये. त्या कॅफेमधे कॉफी पिण्यासाठी ग्राहकांची नेहमीच गर्दी असे. लोक कॅफेबाहेर आपला नंबर येण्याची वाट पाहत थांबत.

पण ते लोक कॉफी पिण्यासाठी येत नव्हते.

खरंय.. कॅफे मधे येऊन कपभर कॉफी रिचवण्यात त्यांना आवडायचं, पण ते कॉफी पिण्यासाठी येत नव्हते. ते यायचे ते आज मला कोणत्या डीझाईन च्या कपात कॉफी प्यायला मिळणार आहे या उत्सुकतेपोटी. कॉफी पिणं हे निमित्त होतं, आज कोणत्या डिझाईन चा काप मिळणार आहे हे उद्दिष्ट होतं. त्या कॅफेमधे सतत नवनवीन डिझाईन चे कप ठेवले जात. कॅफे ची स्वतःची डिझाइनर ची टीम होती. जे दररोज शेकडो डिझाईन बनवत. त्यामुळे ग्राहकांना नेहमीच कप ची वेगळी डिझाईन पाहायला मिळे. आणि हेच कारण होतं ग्राहकांचं त्यांच्या कॅफे बाहेर रांग लावून थांबण्याचे… त्यांच्या कॅफे मधे ग्राहकांनी का यावं याच उत्तर त्यांनी दिलं होतं.

आपल्या व्यवसायाची नुसती प्रोडक्ट किंवा सेवा दाखवण्यापुरती जाहिरात करून फायदा नसतो. ते प्रोडक्ट किंवा सेवा ग्राहकांनी घ्या घ्यावं याच उत्तर तुम्हाला द्यावं लागतं, तरच तुमचा स्वतःचा हक्काचा ग्राहक वर्ग तयार होत असतो. त्या कॅफेमधे कॉफी विकणं हे फक्त एक उत्पन्नाचं साधन होतं. ग्राहकांना दररोज वेगवेगळ्या डिझाईन च्या कपात कॉफी देणं हा त्या व्यवसायाचा गाभा होता. बऱ्याच व्यावसायिकांची इथे गल्लत होत असते. आपल्या प्रोडक्ट सेवेच्या प्रचंड जाहिराती करूनही आपल्याला अपेक्षेप्रमाणे ग्राहक का मिळत नाही याच उत्तर त्यांना कधीच मिळत नाही. खरं तर ते ग्राहकांना, तुम्ही आमच्याकडे का यावं याच उत्तर देण्यात कमी पडलेले असतात. तुम्ही लोकांना फक्त तुमचा ब्रँड प्रोडक्ट फक्त दाखवत असतात, का घ्यावे याचे उत्तर देत नाही. अशावेळी ग्राहक तुम्हाला स्पेशल काही नसलेल्या इतर व्यवसायांप्रमाणेच कॉमन कॅटेगरीमधे गृहीत धरतो.

तुम्ही जाहिरात दाखवली, ग्राहकांनी पहिली. पण तेच प्रोडक्ट इतर ठिकाणीही मिळत असेल तर खास तुमच्याकडेच का यावे? ते प्रोडक्ट किंवा सेवा त्यांना घराच्या जवळपासही कुठे मिळू शकेल. तुमच्यामधे वेगळेपण काय आहे कि त्यासाठी त्यांनी वेळ काढून खास तुमच्याकडेच यावे? या प्रश्नच उत्तर तुम्ही त्यांना देऊ शकलात तर ते तुमचे कायामचे ग्राहक होतील. जर हे उत्तर देण्यात अपयशी ठरलात तर ते तोपर्यंतच तुमच्याकडे येतील जोपर्यंत त्यांना त्याच सेवेसाठी प्रोडक्टसाठी आणखी सोपा पर्याय मिळत नाही.

ग्राहकांनी तुमच्याकडे का यायला हवं याच स्पष्ट उत्तर ग्राहकांना द्या… तुमचे वेगळेपण उठून दिसेल अशा प्रकारे प्रेझेंट करा…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “ग्राहकांनी तुमच्याकडे का यावं ? या प्रश्नाचं उत्तर द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!