‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
आज तुम्ही Whtsapp वर व सोशल मीडिया वर तुमच्या contact list मध्ये काय फॉरवर्ड केले आहे? रोज सकाळी तुम्ही कोणता संदेश मोबाइल वर वाचून फॉरवर्ड करता ? त्या संदेशाचा तुमच्या व्यावसायिक गोल्सशी किती संबंध आहे याचा एकदा विचार करा.
खूप वर्षांपूर्वी, पुरातन ग्रीस मध्ये, एक प्रवासी रस्त्यात एका म्हातार्या व्यक्तिला माऊंट ऑलिंपस कडे कसे जायचे विचारतो. तो म्हातारा व्यक्ति, जो महान तत्ववेत्ता सोक्रटीस असतो. उत्तरतो “जर तुला खरेच माऊंट ऑलिंपस कडे जायचे असेल तर फक्त एक काळजी घे, तुझं प्रत्येक पाऊल हे माऊंट ऑलिंपसच्या दिशेनेच असेल”. तात्पर्य, तुम्हाला जर यशस्वी व आनंदी व्हायचे असेल तर तुमची प्रत्येक कृती, तुमचा प्रत्येक विचार हा तुम्हाला त्या दिशेने घेऊन जाणारा असला पाहिजे.
मला रोज सकाळी अनेक लोक गुड मॉर्निंग, काहीतरी धार्मिक, राजकीय स्वरूपाचे असे सदेश पाठवत असतात. अपवादानेच कोणी व्यवसाय विषयीचे, यश, नेतृत्व या विषयीचे इन्स्पिरेशनल, मोटीवेशनल संदेश पाठवतात. तुम्ही काय वाचता, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत काय चर्चा करता हे तुमच्या यशात खूप महत्वाची भूमिका बजावते.
तुम्हाला जर लवकर यशस्वी व्हायचे असेल, तुम्ही जे मनाशी ठरवले आहे ते लवकर साध्य करायचे असेल तर तुम्ही त्यासाठी पूरक असाच विचार कायम केला पाहिजे, आणि त्या साठी मदत होईल, तुम्हाला प्रेरणा मिळेल असेच वाचले पाहिजे. तुम्ही अशाच लोकांसोबत जास्त वेळ घालविला पाहिजे ज्यांना तुमचे ध्येय, उदधीष्ठ याबद्दल आदर आहे, त्यांचे विचार तुमच्या तुमच्या ध्येयाशी पूरक आहेत, व ते तुम्हाला कायम प्रोत्साहित करणारे आहेत.
रोज सकाळी एक असा inspirational/motivational quote शोधा जो तुम्ही ठरविलेल्या उदधिष्ठांना पूरक असेल, तुम्हाला त्या दिवशी तुमचे उदधिष्ठ साध्य करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना प्रेरणा देईल. असा संदेश जो दिवसभर तुमच्या सोबत असेल तुम्हाला उत्साह व प्रेरणा देईल. हे काम तुम्ही आदल्यादीवशी रात्री सुद्धा करू शकता. झोपण्या आधी तुमच्या उद्याचा दिवसात, तुमच्या व्यावसायिक धावपळीत तुम्हाला प्रेरणा देईल असा संदेश शोधा. इंटरनेट वर तुम्हाला महान व थोर लोकांची, यशस्वी उद्योजकांचे अनेक चांगले संदेश सापडतील, जे त्यांना त्यांचा आयुष्याच्या वाटचालीत गवसले आहेत, ते त्यांचा यशाचे गमक आहे. असे काही शोधायला फारसा वेळ लागणार नाही. तो संदेश लीहून काढा नि मोठयाने 2-3 वेळा वाचा. तो संदेश तुम्हाला का आवडला, तो तुमच्या उद्धिष्ट यांचाशी सुसंगत आहे का याचा विचार करा. आणि दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर परत एकदा तो वाचून, मोबाइल वर टाइप करून सगळ्यांना पाठवा. बघा तुमचा व्यावसायिक दिवस कसा जातो ते…
आणि एक करा, जी मंडळी तुमच्या संदेश वाचून त्याच स्वरूपाचा संदेश पाठवतील त्यांचा सोबत जास्त संपर्क ठेवा, त्यांचा सोबत आपल्या गोल्स विषयी चर्चा करण्यास सुरवात करा. आणि जी मंडळी तुमच्या संदेश च्या बदल्यात काही राजकीय, धार्मिक, फालतू विनोद ई पाठवतील त्यांना शक्यतो टाळा. अशी मंडळी तुमच्या यशाच्या प्रवासात तुमचा फक्त वेळ घालवणारी असतात.
तुम्ही कोणती पुस्तकं वाचता, वर्तमानपत्र कोणते वाचता, तुम्ही कोणती बिझनेस मासिक वाचता हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे तुमच्यात यशाची मानसिकता (success mindset) रुजवण्यामध्ये.
_
निलेश गावडे
९६७३९९४९८३
ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach
www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील