‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
“उद्योजक” हा शब्द ऐकलं की तुमच्या मनात काय येते ? अशी व्यक्ति ज्याने स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू केलाय? स्टिव जॉब्स सारखा कोणी जो इन्नोवेटीव व कलात्मत्क होता ? जारी या सर्व उद्योजक या शब्दाच्या योग्य व्याख्या आहेत, तरी उद्योजक म्हणजे त्याहून बरेच काही आहे.
जेव्हा कोणी त्याच्या कमफर्ट झोन च्या पलीकडे जाऊन काही करते अथवा करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती व्यक्ती उद्योजक असतो. त्याचा उद्योग व्यवसायाशी काही संबंध असेलच असे नाही. तुम्ही या आधी कधी मचान बांधले नसेल, आणि एखाद दिवशी तुम्ही त्याचे तंत्र शिकून ते बांधण्याचा प्रयत्न सुरू केलात तर तुम्ही उद्योजक झालात.
तुम्ही पुस्तक लिहिण्याचा विचार करताय परंतु तुम्हाला सुरवात कशी करायची, पुस्तक कसे लिहायचे हे माहिती नाही ? तुम्ही या साठीचा एखादा कोर्स केलात आणि तुमचं स्वत:च पुस्तक प्रकाशित करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केलात ? तर तुम्ही उद्योजक झालात.
तुम्ही ब्लॉग लिहिणे या उपक्रमाचा सुद्धा उद्योजकीय उपक्रम म्हणून विचार करू शकता. तुम्ही तुमच्या ब्लॉगला चांगले फोलोवर्स मिळवू शकलात, तर तुमच्या ब्लॉग मार्फत त्या सर्वांना काही सेवा अथवा प्रोडक्ट्स विकू शकता. जोवर तुम्ही त्यांचा फायद्याच काही ब्लॉग वर टाकताय तो वर लोक पैसे द्यायला तयार असतील. तुम्ही त्यांना जी माहिती अथवा सेवा पुरवताय त्याचा वापर ते त्यांच्यातून उद्योजक घडवण्यासाठी करू शकतात.
कोणतेही तंत्र आपण जर आत्मसात केले, त्यात मास्टरी मिळवली तर त्यातून आपण उद्योग उभारु शकतो. तुम्ही इतरांसाठी मचान बांधू शकता, इतरांना प्रकाशित लेखक होण्यास मदत करू शकता. तुम्ही कोणते तंत्र शिकण्याची इच्छा उराशी बाळगता त्याचा विचार करा आणि ते शिकण्याचा/आत्मसात करण्याचा दृस्टीने प्रयत्न सुरू करा. तुम्ही ठरवलेत तर त्यातूनच तुम्ही तुमचं नवा उद्योग उभारू शकाल.
आज इंटरनेटच्या माध्यमातून नवीन तंत्र शिकणे खूप सोपे झाले आहे. युट्यूब सारख्या साइट्स वर अनेक फ्री ट्रेनिंग वीडेओ उपलब्ध आहेत जे बघून तुम्ही शिकू शकता. तुम्हाला आणखी पुढे जाऊन शिकायचे असेल तर एखाद्या चांगल्या इलर्निंग साइट्स वरुण तुम्ही एखादा कोर्स जॉइन करू शकता. आता अशा अनेक इलर्निंग साइट्स येत आहेत ज्या वर अनेकविध विषयांवर प्रशिक्षण उपलब्ध होत आहे. कोणीही उद्योजक होऊ शकते आणि तसे प्रत्येकजण उद्योजक असतोच. तुम्ही जेव्हा जेव्हा नवीन तंत्र आत्मसात करता, तुमच्या कामावर नवीन पोझिशन स्वीकारता तेव्हा तुम्ही मनाने उद्योजक असता.
लक्ष्यात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही असे काही करण्याचा प्रयत्न करता जे तुम्ही या कधी कधीच केले नसेल, तेव्हा तुम्ही उद्योजक या सज्ञेच्या व्याखेत चपखल
_
निलेश गावडे
९६७३९९४९८३
ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach
www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील