‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
अकाउंटंट हा तसा लघुद्योगात दुर्लक्षित असणारा व्यक्ती आहे. आर्थिक बाबतीतली सर्व कामे शक्यतो स्वतः मालकच करत असतो. उत्पन्न खूप मोठ्या स्तरावर नसताना एका अकाउंटंट साठी महिन्याला दहा पंधरा हजार खर्च करणे तसे अवघड काम आहे. पण व्यवसाय बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतर आणि चांगले उत्पन्न मिळायला लागल्यानंतर त्यातील आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी एक कायमस्वरूपी अकाउंटंट असायलाच हवा.
अकाउंटंट तुमचा बराच ताण हलका करतो. बिले बनविण्यापासून टॅक्स संबंधी सर्व कामे करण्यापर्यंत सर्व कामे अकाउंटंट करत असतो. तुमचा CA सुद्धा सतत अकाउंटंट च्या संपर्कात राहतो. GST रिटर्न, ऑडिट सारख्या कामात अकाउंटंट चा चांगला फायदा होतो. तुमचे महिन्याचे खर्च, उत्पन्न याचा चांगलं ताळमेळ अकाउंटंट बसवू शकतो. हिशोबाची कामे आपल्यापेक्षा अकाउंटंट नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकतो. व्यवसायाचे हाल हवाल दररोज आपल्याला कळतात. आर्थिक गडबडी असतील तर तात्काळ लक्षात आणून देऊ शकतो. नफ्या तोट्याचे हिशोब अगदी मुद्देसुद सांगू शकतो. अशा विविध आणि महत्वाच्या कामांसाठी एक तरी अकाउंटंट व्यवसायात असायलाच हवा.
सुरुवातीला अकाउंटंट व्हिजिट बेसिस वर ठेऊ शकता. व्यवसाय चांगला चालायला लागल्यानंतर कायमस्वरूपी पगारी बेसिस वर अकाउंटंट नियुक्त करावा. अकाउंटंट नियुक्त करताना त्याची फक्त डिग्री पाहू नका. त्याला खरंच काम जमणार आहे का हे तपासून घ्या. तुमच्या CA लाच शक्यातो त्याची मुलाखत घ्यायला सांगा. CA कडून अप्रूव्हल आले तर लगेच कामावर घ्या.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील