‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
दररोज दरदिवशी तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वत:ला विकत असता, आणि जोवर तुम्हाला यश मिळत नाही तोवर काही घडत नाही.
आपण सर्व विक्री उद्योगात आहोत, आपल्याला हे पटो अथवा न पटो. तुम्ही डॉक्टर आहात, अथवा व्यवस्थापक आहात, अथवा राजकारणी, इंजिनीअर, उद्योजक अथवा वकील, त्याने काही फरक पडत नाही.
आपले उत्पादन अथवा आपल्या सेवा त्यांनी विकत घ्याव्या या साठी, आपलं प्रपोजल मान्य करावं अथवा किमान आपलं म्हणणं मान्य करावं यासाठी कोणाला ना कोणाला पटवण्यात आपण आपली बरीच ऊर्जा व वेळ घालवत असतो.
इतर कोणाचे मन वळवण्यात, त्यांना प्रभावित करण्यात निष्णात होण्याआधी, तुम्हाला अधिक चांगले व्हावे लागेल स्वत:ला प्रेरित करण्यात व स्वत:ला विकण्यात. त्यासाठीच्या या १० युक्त्या:
१. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट वर विश्वास हवा
स्वत:ला विकणे हे इतर कोहीही विकण्यासारखेच आहे. प्रथम, तुम्ही जे विकताय त्यावर तुमचा विश्वास हवा. म्हणजेच तुमचा “तुमच्यावर विश्वास हवा”. याचा संबंध positive self-talk व योग्य attitude यांचाशी आहे.
सर्व प्रथम लोकांचे लक्ष तुमच्या attitude कडे जाते. तुम्ही बहुतांशी लोकांसारखे असाल तर वेळो वेळी तुमच्यातला आत्मविश्वास तुम्ही गमावाल.
याच संबंध तुम्ही स्वत:शी कसे बोलता याच्याशी येतो. बहुतांशी लोक स्वत:शी सकारात्मक पद्धतीने बोलण्याऐवजी नाकारत्मक पद्धतीने बोलतात, आणि हेच त्यांना जीवनात मागे खेचत राहते.
Positive attitude पेक्षा योग्य attitude महत्वाचा असतो, विचारांची quality महत्वाची असते.
यशस्वी लोकांकडे रचनात्मक व सकारात्मक पद्धतीने स्वत:कडे व त्यांचा कामाकडे बघण्याचा दृष्ठिकोन असतो. त्यांचा attitude/वृत्ती शांत, आत्मविश्वास पूर्ण व सकारात्मक स्व-अपेक्षांनी भारलेला असतो. त्यांना कायम स्वत:बद्दल छान वाटत असते व त्यांना विश्वास असतो की ते जे काही करतील त्यात त्यांना यश मिळेल.
जर तुम्ही विक्रेते असाल, तुमचं उद्योग असेल किवा व्यवस्थापक असाल तर तुम्हाला सतत तुमच्या attitude/वृत्ती वर काम करायला हवे. तुम्हाला तुमच्या डोक्यात वाजणार्या त्या हलक्यात हलक्यात आवाजाकडे लक्ष दिले पाहिजे. तो आवाज सांगतोय का की तुम्ही बेस्ट आहात, तुम्च्यकडे आत्मविश्वास आहे आणि तुम्ही करून दाखवाल. की तो आवाज तुम्हाला मागे खेचतोय.
जर तुम्हाला ऐकू येत असेल की “मी हे किवा ते नाही करू शकत” किंवा “ते आता ते विकत घेऊ इच्छित नाहीत” किंवा “आपण खूप महाग आहोत” मग तूम्ही एकतर हे self-talk बदला किंवा तुमचे काम / नोकरी तरी बदला.
स्वत:वर विश्वास ठेवायला सुरवात करा आणि बाहेर जे तुम्ही करत आहात त्याचा तुमच्या attitude /वृत्ती वर परिणाम होऊ देऊ नका.
टीका करणे, निंदा करणे, तक्रारी करणे बंद करा आणि थोडा आनंद पसरवायला सुरुवात करा.
हेनरी फोर्ड, फोर्ड मोटर कंपनीचे संथापक, यांनी संगीतलेली लक्ष्यात ठेवा – “जर तुम्हाला विश्वास वाटतो तुम्ही करू शकता, किंवा जर तुम्हाला विश्वास वाटतो की तुम्ही करू शकत नाहीत, तर दोन्ही बाबतीत तुम्ही बरोबर आहात”.
२. वेष्टण आकर्षित असले पाहिजे
आपण जी इतर उत्पादने आपण विकत घेतो, त्यांच्या प्रमाणेच जसे उत्पादन पॅकेज करून आपल्या समोर मांडली जातात त्यावर ग्राहक खरेदी करायचे की नाही ते ठरवत असतो.
तूमच्या स्वत:च्या बाबतीत पण असेच सर्व छान असले पाहिजे. तुमचं पेहराव योग्य असला पाहिजे. आणि आपला ग्राहक साधारण पेहराव करतो म्हणून पण तसाच केला तर चालेल हा विचार मनातून काढून टाका.
तुम्ही कोणत्या प्रकारचे, कोणत्या रंगाचे कपडे घालता, तुमचा चश्मा, तुमचे शूज, ब्रीफकेस, घड्याळ, पेन जे तुम्ही वापरता, या सर्व वस्तु तुमच्या विषयी काही सांगत असतात.
३. चेहर्यावर हास्य
खूप काही करायची गरज नाही, फक्त एक हसरा चेहरा जो लोकांना घाबरवणार नाही.
४. नावाने संबोधा
शक्य तितक्या लवकर ग्राहकाला नावाने हाक मारला सुरवात करा, फक्त अति करू नका. आजकाल व्यवसाय कमी फॉर्मल झाला आहे, तरी शक्यतो सुरवातील त्यांचे प्रथम नावांचा वापर करताना खबरदारी घ्या. तुमच्या ग्राहकाला तुमचे नाव माहिती झाले आहे व ते त्याचा लक्ष्यात आहे याची खात्री करून घ्या. ती जुनी आयडिया वापरा “माझे नाव बॉन्ड आहे, जेम्स बॉन्ड” किवा “माझे नाव जेम्स आहे, जेम्स बॉन्ड “.
५. समोरच्या कडे लक्ष द्या
त्यांची देहबोली काय सांगते? ते तुमच्या सोबत कंफरटेबल आहेत की नर्व्हस वाटतय त्यांना? ते तुमचं ऐकत आहेत की त्यांची नजर खोली भर फिरते आहे. जर ते कंफरटेबल नसतील, त्यांचे तुमच्या बोलण्याकडे लक्ष नसेल तर त्यांना तुमच्या व्यवसायासंबंधी काही महत्वाचे सांगयात काही उपयोग नाही.
अशा वेळेस आपले बोलणे थोडक्यात आटोपा आणि त्यांना त्यांचा बद्दल बोलण्यास उद्युक्त करा.
असे धरून चला की जेव्हा कोना नवीन व्यक्तिला भेटणार असाल, तेव्हा सुरवातीचा वेळ ते तुम्ही जे काही सांगतात त्यातले बरेच थोडं लक्ष पूर्वक ऐकतील. त्यांचा जास्त वेळ तुम्हाला व तुमच्या सभोवतालचं दृश बघण्यात जाईल.
६. ऐका आणि तुम्ही लक्षपूर्वक ऐकताय हे दाखवा.
बहुतेक लोक, खास करून पुरुष, ऐकतात पण ते ऐकतायत असे दाखवत नाहीत. समोरची व्यक्ति त्याला जे दिसते त्याप्रमाणे चालतो, न की तुमच्या डोक्यात जे चालले आहे त्या प्रमाणे. जर त्यांना ब्लॅंक एक्सप्रेशन दिसले तर त्यांना वाटते तूम्ही गेलात “जेवणाच्या सुट्टी वर “.
या साठी समोरचा बोलत असताना तुमचे डोके हलवा, अधून मधून “हम्म, अ .. हं” असे म्हणत रहा, एखाद दूसरा प्रश्न विचारा आणी दाखवा की तुम्ही लक्षपूर्वक ऐकताय.
७. स्वारस्य दाखवा
जर तुमच्या स्वारस्य घ्यावे असे वाटत असेल तर आधी तुम्हाला दुसर्यात स्वारस्य दाखवले पाहिजे. तुम्हाला यशस्वीरित्या विकताना तुम्ही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट करू शकता.
बहुतेक लोक स्वत:च्या self image बद्दल खूप जागरूक असतात. जर त्यांना वाटले की तुम्ही त्यांना किंमत देत आहात, तुम्हाला वाटते आहे ते व त्यांचे शब्द खूप महत्वाचे आहेत, तेव्हा तुम्ही त्यांची self -image मोठी करण्यात यश मिळवता. जर तुम्ही लोकांना त्यांना स्वत:ला आवडण्यात मदत करू शकलात तर ते तुमच्यावर प्रेम करतील.
परंतु असे करण्यासाठी उगा खोटी स्तुति करू नका, कारण बहुतेक लोकांना हे लगेच लक्षात येईल आणि ते त्यास बळी पडणार नाहीत. ग्राहकामध्ये आणि त्याचा व्यवसायमध्ये थोडा जेन्युईन इंट्रेस्ट दाखवा आणि ते देखील तुमचं ऐकण्यास तत्पर होतील.
८. सकारात्मक बोला
“काय वाईट दिवस आहे..नाही..” किंवा “आजकाल धंदा मन्दा चल रहा है ” किंवा असेच काहीही बोलू नका ज्यामुळे चर्चा नाकारत्मक दिशेने जाईल. त्या ऐवजी (आणि खरे ) बोला “तूमच्या ऑफिस चे डिझाईन मला खूप आवडले” किंवा “तुमच्या नवीन उत्पादनाबद्दल मी काही चांगले रिपोर्ट्स ऐकले आहेत”.
९. समोरच्या ला मिरर करा
याचा अर्थ त्याची कॉपी करा असा घेऊ नका. याचा अर्थ इतकाच की, तुमचे बोलणे, वागणे हे तुमच्या ग्राहका सारखे असले पाहिजे.
उदा. जर तुमचं ग्राहक हळू आणि शांतपणे बोलत असेल तर तुम्ही देखील हळू व शांतपणे बोला.
लक्षात ठेवा लोकांना ती लोकं आवडतात जी त्यांचा सारखी असतात.
१०. मैत्रीपूर्ण व्यवहार करा.
जर तुम्ही आक्रमक व तणावपूर्ण दिसतं अथवा बोलत असाल, आणि जर समोरची व्यक्ति बचावात्मक वागायला लागली व सहकार्य करत नसेल तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
जर तुम्ही सहौदार्याने व मैत्रीपूर्ण वागलात, तर तुम्हाला कायम सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
याचा अर्थ खूप चांगले चांगले वागा असे नसून, तुम्ही हसतमुख असा, तुमचं आवाजात माधुर्य असूद्या.
आपले उत्पादन, आपल्या सेवा, आपल्या कल्पना विकण्याची सुरवात करण्यापूर्वी खात्री करून घ्या की – ग्राहकाने आपल्याला स्वीकारले आहे व त्याचे आपल्याकडे पूर्ण लक्ष आहे.
_
निलेश गावडे
९६७३९९४९८३
ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach
www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील