अतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

कधी स्वतःला अशा परिस्थिती पाहिले आहे जिथे तुम्ही विचार करण्यात खूप वेळ घालवत आहात आणि काम पूर्ण करण्यासाठी कमी वेळ मिळतो आहे? अति विचार करणे खूप आम आहे, खास करून निर्णय घ्यायचा असतो त्या वेळेस. अतिविचार करण्याने वेळ वाया जातो आणि आअविश्वास देखील कमी होतो.

यशस्वी व्यक्ती पटकन निर्णय घेतात आणि त्यावर ठाम राहतात. कमी यशस्वी लोक निर्णय घेण्यास खूप वेळ घेतात आणि त्यानंतर लगेच मन बदलतात देखील लवकर.

तुम्हाला वाटत असेल की तुम्ही निर्णय घेण्यासाठी वेळ घेता तेव्हा अधिक जबाबदार आणि सावध असता, पण तुम्ही पायावर धोंडा मारून घेत असता. असा कोणताही पुरावा नाही जो सांगतो की निर्णय घेण्यास जास्त वेळ लावल्याने त्यावर अति विचार केल्याने, जास्त चांगला परिणाम मिळतो.

मनाचा निर्धार करा आणि आयुष्यात पुढे चला

१. फायदे तोटे यांची यादी करा. लिहून काढा. निर्णय घेताना ते कागदावर उतरण्यात एक जादू असते. तुमचं संपेस्तोवर तुम्हाला कोणत्या दिशेने वाटचाल करायची आहे याची पूर्ण कल्पना तुम्हाला आलेली असेल.

२. तुमच्या मूल तत्वांबाबत जागरूक व्हा. निर्णय पटकन आणि सहज तेव्हा घेता येतात जेव्हा तुम्हाला तुमच्या मूल तत्वांची जाण असते. जेव्हा तुम्ही एखाद्या पर्यायाबद्दल विचार करता तेव्हा तो पर्याय तुमच्या तत्वांशी पडताळून बघा. बऱ्याचदा असे पर्याय सोप्पे नसतात, पण तुमच्या हिताचे असतात.

३. लक्ष्यात ठेवा तुम्ही कधी ही तुमचा निर्णय बदलू शकता. खूप थोडे, जर असलेच तर, असे निर्णय असतात ज्यावर तुम्हाला तुमच्या मरणा पर्यंत ठाम राहावे लागते. तुम्ही तुमचा निर्णय नंतर बदलू शकता हे समजण्याने सुद्धा आपण शांतलाने निर्णय घेऊ शकतो. आणि भविष्याबद्दल 100% अचूक अंदाज बांधला जाऊ शकत नाही.

४. पॅरॅलीसीस बाय ऍनालिसिस टाळा. अति विश्लेषण म्हणजे चांगले परिणाम असे नसते. त्याने निष्क्रियता आणि गोंधळ वाढतो. स्पेशल सैन्याचा एक नियम आहे की कृती करण्यासाठी तुम्ही 70% ठाम असायला हवे. तुम्ही सैन्यात नसाल पण हा नियम तुम्हाला लागू होतो.
बहुतेक वेळा, शेवटची 30% माहिती जमा होण्याआधी, संधी साध्य करायची शक्यता बंद होते.

५. अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करा. शक्यतो, असे पर्याय असतात ज्यांना दोन्ही निकष लागू होतात. स्वतःला विचारा की हा निर्णय घेतल्यावर तुम्ही 15 मिनिटानी आणि 15 वर्षांनंतर आनंदी राहू शकणार आहात का. दोन्ही निकष खरे उतरतील असे निर्णय सर्वोत्कृष्ट असतात.

६. व्यस्त व्हा. जे अती विचार करतात त्यांच्या कडे खूप रिकामा वेळ असतो. लोक तेव्हा पटकन निर्णय घेतात जेव्हा त्यांचा कडे प्रत्येक निर्णयावर विचार लरात बसायला वेळ नसतो. त्यामुळे व्यस्त व्हा. तुम्हाला वेळेत निर्णय घेणे सोपे जाईल. व्यायाम करणे हा एक पर्याय आहे व्यस्त होण्याचा. तुमचे शरीर थकलेले असते तेव्हा तुम्ही अती विचार करत नाही.

७. तुमचा अनुभव तुमच्या हितासाठी वापरा. तुम्ही आयुष्यातले अनेक निर्णय चुकले असतील. त्या अनुभवांना वाया जाऊ देऊ नका. पूर्वी कधी याच परिस्थितीत तुम्ही होता का याचा विचार करा. कदाचित तुम्हाला काही छान अंतरदृष्टी मिळेल.

८. निर्णय घेताना टायमरचा उपयोग करा. अनेक निर्णय घेण्यासाठी आठवडा किंवा दिवस लागत नाहीत. अनेकदा काही तास निर्णय घेण्यासाठी पुरेसे असतात. टायमर चा वापर करा, टायमर लावून त्या समस्येवर फोकस करा. जेव्हा टायमर चा अलार्म वाजेल तेव्हा निर्णय घेण्याची वेळ झाली असेल. तुमचे लक्ष/फोकस केंद्रित कार्यासाठी टायमर खूप उपयोगात येतो.

९. आता घेतलेला चांगला निर्णय, नंतर घेतलेल्या महान निर्णयापेक्षा अधिक योग्य असतो. तुम्ही कशासाठी थांबला आहात? यश म्हणजे खूप भारी निर्णय घेणे नसून, वेळेत निर्णय घेऊन त्यावर मेहनत करणे असते. अचूकता किंवा परिपूर्णतेला अति महत्व आणि कृतीशीलतेला कमी महत्व देणे टाळा.

छोट्या निर्णयांचे अति विश्लेषण करणे टाळा. जर तुम्ही निर्णय घेण्यासाठी खूप वेळ घेत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातले परिणाम मर्यादित करत आहात. तुम्ही कधी अतिविचार करून जास्त चांगला निर्णय घेऊ शकत नाही. तुम्ही फक्त वेळ वाया घालवत असता. तोच वेळ घेतलेल्या निर्णयावर कृती करण्यासाठी द्या. तुम्ही जास्त यशस्वी व्हाल.

_

निलेश गावडे
९६७३९९४९८३

ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach

www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!