‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
प्रत्येकालाच सोप्या मार्गाने आपलं उत्पादन विकायचं आहे, पण नफा मात्र भरमसाठ हवाय… कसा मिळेल? तुमच्यासारखे हजारो विक्रेते उपलब्ध असताना तुम्हाला प्रमाणाबाहेर नफा मिळायला स्कोपच काय असतो?
गर्दी नेहमी सोपा मार्ग शोधते. आणि या गर्दीत तुम्ही असाल तर तुम्ही फक्त गर्दी ढकलते म्हणून पुढं जात असता. तुम्हाला स्वतःहून पुढे जाण्याची कोणतीही संधी नसते. एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे तुम्ही चालत असता. कुणीतरी आपल्याला ढकलतंय आणि आणि आपण पुढे चाललोय एवढ्यातच तुम्हा समाधान मानावं लागतं.
स्वतःच्या मनाप्रमाणे चालायचं असेल तर या गर्दीतून बाहेर यावं लागतं. स्वतःच आपले मार्ग शोधावे लागतात. तुम्ही स्वतः शोधलेल्या मार्गावर गर्दीच नसते, असलीच तर तुरळक थोडीफार तुमच्यासारखाच ध्येयवेड्यांची असते. हा मार्ग शोधायला आणि त्यावर एकट्याने वाटचाल करायला अवघड आहे. पण इथे गर्दी नसल्यामुळे सगळ्या संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याची संधी आपल्याला मिळते. प्रत्येक गोष्टीचा मनासारखा उपभोग घेता येतो…
अगदी आपल्या व्यवसायात सुद्धा असंच आहे… विक्रीचा जेवढा सोपा मार्ग अवलंबवताल नफा तेवढाच कमी मिळेल कारण, तिथे किती नफा मिळवायचा हे तुमच्या हातात बिलकुल नसतं. तुमच्यारखे तिथे लाखो आहेत, त्यामुळे साहजिकच प्रत्येकाला एकमेकांवर कुरघोडी करायची आहे. या नादात तुमची बार्गेनिंग पॉवर कमी होते आणि खरेदीदारांची बार्गेनिंग पॉवर वाढते. तुम्हाला किती द्यायचं ते मार्केट ठरवतं…
पण ज्यावेळी तुम्ही एकट्याने वाटचाल सुरु करता, नवीन मार्ग अवलंबवता, विक्रीच्या कठीण मार्गावर चालायला लागता त्यावेळी तुमच्यासारखे खूपच कमी जण तिथे असतात. अशावेळी साहजिकच तुमची बार्गेनिंग पॉवर जास्त असते. तुमचे मूल्य ठरवण्याची तुमच्याकडे संधी असते. आणि तीच संधी तुम्हाला मोठं करते.
खूप जणांना ईझी कस्टमर हवाय. तो मिळतो; नाही असं नाही… पण तो तुम्हाला ईझीलीच हॅण्डल करतो…
सोप्या मार्गात अडकू नका… अवघड मार्गांना घाबरू नका… कारण तुम्हाला अपेक्षित असलेलं यश त्या अवघड मार्गावरच मिळणार आहे.
_
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Correct
Thanks sir very good information
100℅सत्य