उद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

आपल्याकडे उद्योजकांना चोर समजण्याची एक घाण सवय लागली आहे. याच मानसिकतेतून सरकारी अधिकाऱ्यांपासून गावगुंडांपर्यंत प्रत्येकाला उद्योजक हे ठगवण्यासाठीच असतात असं वाटतं… कारण यांना माहित आहे ज्या समाजाच्या दडपणाने सरकार कारवाई करू शकत त्या समाजालाच यांच्याशी काहीच देणं घेणं नाहीये.

मग लहान लहान (नसलेल्या) चुका काढून कारवाईच्या नावाखाली अधिकारी खंडणी गोळा करतात तर गल्लीतले कुत्रे वाघ बनून उद्योजकांकडून “माझ्या एरियात व्यवसाय या करायचा तर” अशा धमक्या देऊन खंडणी गोळा करतात. कोणत्याही MIDC मध्ये जाऊन बघा, कंपन्यांचा प्रचंड छळ चालू असतो. लेबर काँट्रॅक्टरकडून धमक्या मिळतात, युनियन लीडर धमक्या देऊन खंडण्या गोळा करतो, स्थानिक राजकीय नेते खंडण्या मागतात, प्रत्येक कामासाठी स्थानिक गुंडांच्या चेल्यांनाच व्हेंडर म्हणून नेमावे लागते. एखादी कंपनी सुरु होणार म्हटलं कि लगेच तिथे न सांगताच स्थानिक राजकीय लोकांचे वाळू, डबर, सिमेंट, लोखंड येऊन पडते, कंपनीने फक्त बिलं पस करायची रेट विचारायचे नाहीत, नाहीतर कंपनी सुरूच होऊ शकणार नाही… असले भिकार चोट धंदे सगळ्या देशभर चालू आहेत.

हे गुंड आणि राजकारणी कमी म्हणून कि काय सरकारी अधिकारी सुद्धा हात धुवून मागे लागतात. काहीतरी पिल्लू काढायचं, मोठमोठे कलमं लावून कारवाईला सुरुवात करायची. कंपनी एक दिवस जरी बंद पडली तरी लाखोंचं नुकसान होणार असतं, इथे तर कित्येक दिवस कंपनी सुरु होऊ शकणार नाही असे प्लॅन आखले जातात. मग उद्योजकाकडे या अधिकाऱ्यांना खंडणी देऊन मान सोडवण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. याला थोडंफार चार, त्याच पोट भर, कर्मचाऱ्यांना संभाळ… आणि सगळं करूनही परत उद्योजकच चोर असतो… का? कारण तो स्वतःच्या हिमतीवर पैसा कमवून श्रीमंत बनतो. अरे तुम्ही बनाना श्रीमंत कुणी अडवलंय ? तुमची लायकी नाही श्रीमंत बनण्याची म्हणून इतरांच्या श्रीमंतीचा रागराग करायचा नसतो, त्यापेक्षा आरशात बघून स्वतःच्या कानफडात मारून घ्या.

आपल्या घरातील ९९.% वस्तू या उद्योजकानेच बनविलेल्या आहेत. सगळ्यात जास्त नोकऱ्या सुद्धा त्यानेच दिलेल्या आहेत, सरकारला सगळ्यात जास्त कर सुद्धा तोच देतो… त्याला चोर म्हणा नाहीतर दरोडेखोर म्हणा, सालं नोकऱ्या मागायला त्याच्याकडे यावं लागतं.

काल CCD चे संस्थापक V.G. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली. त्यांनी लिहिलेली एक चिट्ठी सुद्धा वाचायला मिळाली. त्यात त्यांनी एका आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने केलेल्या छळाबद्दल लिहिलंय, एका कंपनीच्या अधिग्रहणात आणल्या जाणाऱ्या अडथळ्यांबाबत लिहिलंय, आणि सोबतच काही गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या छळाबद्दलही लिहिलेलं आहे. पत्रावरून असं लक्षात येतंय कि त्यांनी माइंडट्री डील साठी बरेच पैसे उचलले होते, पण सरकारी खात्याच्या कारभारामुळे ती डील होऊ शकली नाही आणि आता घेतलेले पैसे फेडणं शक्य होत नव्हतं. त्यांच्या पात्रातील एक वाक्य खूप त्रासदायक आहे… “मी उद्योजक म्हणून अपयशी ठरलो” I have failed as an entrepreneur… कदाचित आर्थिक नियोजनात अडकल्यामुळे ते असे म्हणाले असावेत.

त्या आयकर अधिकाऱ्यावर काही कारवाई होणार नाही हे निश्चित. कुणी त्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याची काहीही शक्यता नाही. सामान्य जनतेकडून कसलीही अपेक्षा नाही. माइंडट्री डील ला बरोब्बर एखाद्या कायद्याच्या प्रोसेस मध्ये टाकून अडकवलं जाईल हेही नक्की आहे. सरकार यांचं काही वाकडं करू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. कारण यांच्या खंडण्यांची साखळी अगदी पायापासून कळसापर्यंत असते.

पण शेवटचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. व्यवसायाच्या प्रोसेस मधे त्यांनी जे काही पैसे उचलले त्यात ते ट्रॅप झाले. त्यांना ट्रॅप ट्रॅप करायला आयकर विभागाचे अधिकारी कारणीभूत आहेत, परंतु तरीही त्यांच्याकडून आर्थिक नियोजनात गडबड झाली आणि याचा शेवट त्यांचा आयुष्याचा प्रवास थांबण्यात झाला…

पन्नास एक हजार नोकऱ्या देणारा एक उद्योजक काल देशाने गमावला आहे. कुणाला याच वैषम्य वाटण्याची शक्यता नाही. कारण श्रीमंताला त्रास झाला कि आपल्याला आनंद होतो. मोठमोठे उद्योजक दिवाळखोरीत निघाले कि आम्हाला प्रचंड आनंद होतो. तो कधी संपतोय आणि आयुष्यातून उठतोय याची आम्ही वाटच पाहत असतो. असली किळसवाणी मानसिकता फक्त याच देशात असेल. श्रीमंतीची व्याख्या तरी काय असते? आपल्यापेक्षा जास्त कमावणारा…. थोडक्यात आपण सुद्धा कुणासाठी तरी श्रीमंत असतो, आणि उद्या आपला श्रीमंत म्हणून छळ झाला तर कुणीतरी टाळ्या वाजवणार आहे.

बाहेरचे उद्योजक इथे कंपन्या टाकायला लागले कि आम्ही त्यांचं कौतुक करतो आणि इथले उद्योजक बाहेर देशात पाय पसरायला लागले कि आपल्याला दुःख होत. बाहेर कशाला आपल्याच देशात त्यांची प्रगती व्हायला लागली कि आपल्या पोटात दुखायला लागत. पण एक लक्षात घ्या… उद्योजक एकटा कधी संपत नसतो… त्याच्यासोबत हजारो लाखो लोकांचे रोजगार संपत असतात… कदाचित आपलं कुटुंब सुद्धा त्याच्यामुळे अप्रत्यक्षपणे दोन वेळच जेवत असतं.

कमवायची आपली लायकी नाही आणि जो कमावतोय त्याला सुखात बघायची आपली मानसिकता नाही. अशा समाजामधे खरं तर एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडणार नाही हे स्पष्ट आहे.

पण काहीही असो, उद्योजकांना कितीही शिव्या घाला, त्यांचा कितीही छळ करा, त्यांना कितीही नावं ठेवा, त्यांना चोर म्हणा, दरोडेखोर म्हणा, नोकऱ्या मागायला झक मारत त्यांच्याकडेच यावं लागणार आहे.

शेवटचं – देशातल्या टॉपच्या फक्त दहा कंपन्या किती रोजगार देत आहेत माहित आहे का? प्रत्यक्ष रोजगार कमीत कमी २५ लाख आणि अप्रत्यक्ष रोजगार कमीत कमी त्याच्या दुप्पट.
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


21 thoughts on “उद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…

  1. उद्योजक एकटा पडत चालला आहे कधी सुधारणा होणार आहे कसा देश प्रगती करायचा

  2. अप्रतिम लेख.. मी वयाच्या 22 वर्षापासुन व्यवसाय करतोय आणि आपल्या लेख मुले खूप काही शिकायला मिळाले..

    1. मी ज्या समाजात वाढलो ,ती थे एकच भावना आहे ,अति श्रीमंत म्हणजे चोर ,पन्नास हजार रोजगार निर्माता हरवलाय ह्या गोष्टीच भान ,समाजाला नाही,प्रशाशनाला तर नाहीच ,सुंदर वास्तविकता मांडली आहे सर

  3. सडेतोड…????
    अतिशय खरं मत व्यक्त केलेत आव्हाड सर, कोणीही उद्योजक उभारताना आनंदापेक्षा आधी दडपून गेलेला असतो कारण, सरकारी बाबूंची भीती… माहीत नसलेल्या परवानग्या आशा एक ना अनेक कारणांनी आधार वाटायचा तर उद्योजकांना भीतीच जास्त असते, शिवाय तोडपाणी लागते ते वेगळेच…
    त्यामुळं तुमच लिखाण नक्कीच योग्य आहे…????????

  4. मला खुपच वाईट वाटलं ही बातमी वाचून मला पण बिझनेस सुरु करायचा आहे पण मला 2जननी दाखवून दिल की बिझनेस का करु नये म्हणुन खरच उद्योजक बनणे खुप मोठी ताकद आहे हे मराठी उद्योजका गुंड बन आणी खून करुन टाक तुला कमी लायकीचा समजणार्यानचा

  5. खरोखरच डोळ्यात अंजन घालणारा लेख
    माझाही व्यवसाय आहे , आम्ही किती तनावात असतो हे आम्हालाच माहिती आहे
    वरील प्रकरणात मुळाशी जाणं आवश्यक आहे
    मिडिया वाले झोपले का?

    1. एखादा उद्योग चालवणे व बेरोजगारांना नोकरीला लावणे ही खरी समाजसेवाच आहे भले तो उद्योजक त्यातुन कमाई करत असेल,पण त्याला चोर म्हणता येणार नाही. म्हणणाऱ्यांना ही स्वातंत्र्य आहे,त्यांनी उद्योग काढावा.
      आव्हाड साहेब, आपलं चिंतन समर्थनिय आहे पण तमाम समाजाला दोष देऊ नका. समाजाचा काहि भाग किंवा त्या उद्योजकाचा स्पर्धक, शासकीय अधिकारी, राजकारनी व त्यांचे पाळलेले गुंड ह्नयांची मानसिकता मात्र कारणीभूत ठरेल.

  6. उत्तम लेख, ह्वी जी सिद्धार्थ यांच्या मृृृत्युला आय टी डिपार्टमेंट दोषी आहे समाज नाही… समाजाची मानसिकता जरी तुम्ही लिहील्या प्रमाणे असली तरी भारतिय उद्योजकाबाबतसमाजाचादृृृृष्टीकोण आणि सिद्धार्थ यांची आत्महत्या या दोन्ही वेगवेगळ्या स्वतंत्र गोष्टी आहेत.

  7. मी ज्या समाजात वाढलो ,ती थे एकच भावना आहे ,अति श्रीमंत म्हणजे चोर ,पन्नास हजार रोजगार निर्माता हरवलाय ह्या गोष्टीच भान ,समाजाला नाही,प्रशाशनाला तर नाहीच ,सुंदर वास्तविकता मांडली आहे सर

  8. सुंदर व प्रसंगाला उपयुक्त लिखाण ज्यामुळे ज्यांचे डोळे उघडायला हवेत त्यांनी जरी काळजी घेतली तर या देशामध्ये येणारी आर्थिक संकटे पार करण्याची ताकद सर्वाना मिळेल
    *जे लोक इतरांचा समाजाचा विचार करत असताना स्वतःचा विचार करत नाहीत त्यांना अशा संकटाना सामोरी जावच लागतं*
    असाच एक उद्योजक काळाच्या पडध्याआड गेला श्री राजन पिल्लाई -ब्रिटानिया कंपनीचा सर्वेसर्वा
    बाबूराव मोहिते बेळगांव

  9. अगदी खर आहे.. माझ्या वडिलानी खुप प्रयत्न केले. त्यांना सेंद्रिय खत तयार केले होते ते मार्केट मध्ये यावं म्हणून खुप मेहनत घेतली… एमआयडीसी मध्ये प्लॉट घेतला…पण घेतलेलं कर्ज सगळ वाटून संपलं…खुप नाराज हताश होऊन खुप नुकसान सहन करून सगळ बंद केलं त्यांनी….आणि स्ट्रेस येऊन त्यांना heartattck आला…त्यातच ते गेले…I hate this system..

  10. Too good openly said lot of facts n figures n as a businessman one need to understand n study this as an case study ????????????

  11. आपल्या देशात कागदोपत्रीच सगळ आहे प्रत्यक्षात कोणी काम करत नाही.जर एखादा उद्योजक काही का होईना पण लोकांना रोजगार देतो,व त्यांचे कुटुंब चलवतो तरी शेती प्रधान देशात शेती म्हणावी तशी पिकत नाही, त्यातून एखादा शेतकरी कीव कुणी उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न केला तर त्याला वेडात कडतात,पण साथ व मदत कोणी करत नाही
    आपला लेख बरोबर आहे, काळाची गरज ही नवीन युवा वर्गाला प्रोझाहन देणे आहे अशा घटनंमुळे कोणी उद्योगंद्यांच्या कडे जाणार नाही

  12. मन अगदी विषन्न zale. का आपला समाज असा सवेंदना शुन्य होत चलला आहे? समाज व्यवस्था इतकी भयानक होत आहे. हे बदलने खुप खुप गरजेचे आहे. भागीरथ प्रयत्न करने गरजेचे आहे. समविचारी लोकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास बदल होईल, होय मी प्रयत्न करणार.

  13. बरोबर आहे सर
    समाजात असे अनेक लोक आहेत काही न करता पाहिजे
    तुम्ही सध्याच्या परिस्थितीवर लिहिले आहे
    याला शासन व सर्व समाज जबाबदार आहे

  14. Shetkaryanchya नंतर आता middleclass आणी राजकिय नेत्यांचा आश्रय नसलेल्या उद्योजकांचआ नम्बर आहे.

  15. I do agree that typical middle class mentality people in society to treat entrepreneurs as thieves, law evaders and so should be modified. However example of Sidharth is not correct and I am sure the truth will come out
    Also Samajala kunihi gelyane kahihi farak padat nasato.
    We as SME may be facing lots of problems or hurdles on account of Govt administration or law authorities in our progress but unless we are indulged in serious crime or serious law violation no one can perish us.
    This is my personal opinion and I may be wrong but I apologise and no offence to anyone.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!