‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
जर तुम्ही हा लेख वाचत आहात तर तुम्ही आयुष्यात तुमच्या कडे जे आहे त्यापेक्षा अधिक काही शोधत आहात असं म्हणता येईल.
तुम्ही कदाचित नवीन उद्योग शोधात असाल, काही नवीन संधी शोधत असाल, पार्ट-टाइम कमाई, या सगळ्याचे कारण एकच – सध्याच्या परिस्थिती बद्दल असमाधान. तुम्ही कदाचित आता जे करताय त्यात यशस्वी असाल, त्यामुळे कदाचित तुम्ही कंटाळले असाल. तुम्ही बदल शोधताय. तुम्हाला एक छोटं सीक्रेट सांगतो …
तुमच्या आयुष्यात काही बदल होणार नाही, जो वर तुमच्यात बदल होत नाही.
6व्या शकतातील ग्रीक तत्ववेत्ता हेरक्लिटस म्हणतो “बदलातून आपल्याला हेतु सापडतो.” तुम्हाला मारुति गाडी चालवत राहायचे आहे आणि मनाची समजूत घालायची आहे की ती मर्सिडिज आहे, की गाडी बादलायची आहे? तुम्हीच ते आहात जे हा बदल घडवू शकता. जर तुम्हाला आयुष्याकडून जास्त हवे असेल तर तुम्हाला आयुष्याला जास्त द्यावे लागेल. ते करण्याची पद्धत म्हणजे तुम्हाला स्वताला शिक्षित करावे लागेल. पुढील काळाकढून तुम्ही जास्तीची अपेक्षा कशी करू शकता जर तुमच्या मेंदूचा ऑपरेटिंग सिस्टम तेच आहे जे शाळा सोडताना होते ?
सर्व काही बदलत असते. तुम्ही सुद्धा बदलले पाहिजे. स्वत:ला री-इंवेंट करा. जीवनात नवीन रोमांचक फेज सुरू करा. वेळ कोणासाठी थांबत नाही.
मी अशा अनेकांना भेटतो ज्यांनी शाळा सोडल्यानंतर एक नवीन पुस्तक वाचलेले नाही किंवा कोणत्या प्रकारच्या नवीन शिकण्याच्या अनुभावातून गेले नाहीत. मला हे खूप खेदजनक वाटते, पण काही लोकांना याचा अभिमान वाटतो.
मला तुम्हाला 3 प्रश्न विचारायचे आहेत, परंतु तुम्ही त्या आधी थोडा विचार करावा असे मला वाटते. कदाचित तुम्हाला पहिल्या प्रश्नाचे अचूक उत्तर द्यायला अल्पावधी लागेल.
हा घ्या पहिला प्रश्न : “तुम्ही मागील आठवड्यात पोट भरण्यासाठी किती वेळ दिलात?”. तुमचे उत्तर अगदी अचूक असले पाहिजे असे नाही, पण तुम्ही थोडफार अचूक उत्तर द्याल. तुमचे उत्तर कुठे तरी लिहून ठेवा.
दूसरा प्रश्न : “तुमच्या मेंदूला खायला घालण्यासाठी तुम्ही किती वेळ देता?” अनेकांना या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फार वेळ घ्यावा लागणार नाही. बहुतेकांचे उत्तर शून्य असेल.
आता माझा तिसरा प्रश्न: “का? तुम्ही तुमचे पोट भरण्यासाठी इतका वेळ देता आणि मेंदूची भूक भागवण्यासाठी इतका कमी वेळ का देता?”
हे प्रश्न कोणाला कमी लेखण्यासाठी नाहीत, मला फक्त इतकेच वाटते की परिस्थिती बद्दल तुम्ही विचार करावा. परिस्थितीबद्दल गांभीर्याने विचार कृती करायला लावतो आणि जेव्हा कृती केली जाते तेव्हा तुमचे विश्व बदलते. तुम्हाला तेच हवे आहे, नाही का?
अकार्यक्षम, कृती न करणार्या व्यक्ति ह्या कारणे सांगणार्या असतात. ही मंडळी “ कारणे-दाखवा” होतात. ही मंडळी स्वत:च्या अकार्यक्षमता लपवण्यासाठी नव-नवीन करणे देण्यात आपला वेळ आणि मेहनत वाया घालवत असतात.
तुम्ही “कारणे-दाखवा” मंडळी त्यांचा बोलण्यावरून सहज ओळखू शकता.
“मी तितका हुशार नाही!”, बकवास. तुम्हाला काही साध्य करण्यासाठी हुशार असणे गरजेचे नाही. तुमची फक्त शिकण्याची तयारी असावी लागते. तुमची शिकण्याची तयारी आहे का?
“आमच्या कुटुंबात कोणीच यशस्वी झालेले नाही.” भारीच!. मग आता तुम्हाला संधि आहे काही वेगळे करण्याची. मोडा कुटुंबातली परंपरा.
“माझे नशीब चांगले नाही.” खरेच? कदाचित देवाला वाटत नाही तुम्हाला नशिबाची गरज आहे म्हणून. जितकी जास्त मेहनत कराल तितके तुमचे नशीब फळफळेल.
तुम्ही काय बोलता या विषयी जागरूक रहा. जेव्हा तुम्ही कोणाला विचारता ते कसे आहेत, बहुतेक लोक काय उत्तर देतात?
प्रश्न – “तुम्ही कसे आहात?” उत्तर – “ठीक”. विचार करा, असे उत्तर जरा नकारात्मक नाही वाटत? ठीक, कशाचा तुलनेत? बकवास उत्तर आहे. हे उत्तर टाकून द्या. काही वेगळा प्रयत्न करा. “खूप छान. विचारल्याबद्दल धन्यवाद!”. हे ऐकून कदाचित भुवया उंचावतील.
तर, परत हा लेख ज्या साठी आहे त्या विषयावर येऊया. आणखी किती काल तुमच्या जवळची सगळ्यात बहुमोल गोष्ट तुम्ही वाया घालवणार आहात ? – वेळ
कारणे सांगणे बंद करा आणि कृती करण्यास सुरवात करा. काही तरी करा. आता करा. तुम्ही स्वत:ला शिक्षित करने सहज सुरू करू शकता.
चांगले ज्ञान तुम्हाला शक्ति देईल. चांगल्या ज्ञानावर आधारित कृती तुम्हाला ताकत देते. काही चांगली पुस्तके वाचा. त्याने खूप बादल घडेल. कळत नाही कुठून सुरवात करायची? सोपे आहे. जवळच्या पुस्तक दुकानात जा. तिथे “मोटिवेशन – सेल्फ हेल्प – पर्सनल डेवलपमेंट – सक्सेस” या सांधर्भात काही मिळते का बघा. तुम्हाला महितीपूर्ण अशी अनेक चांगली पुस्तकं मिळतील. अनेक पुस्तकांमध्ये इतर चांगल्या पुस्तकांचे संदर्भ सापडतील. तुम्ही एखाद्या कोर्स साठी, वर्कशॉप साठी प्रवेश घेऊ शकता.
असे काही केल्या नंतर तुम्हाला “कारणे-दाखवा” होण्याचे कारण सापडणार नाही. मी तुम्हाला काही सजेस्ट केलय जे तुम्हाला बदलण्यास मदत करेल.
हो, तुम्ही आहे तसेच राहू शकता. तो तुमचा चॉइस आहे. पण जर तुमच्या आयुष्यात आसमाधान असेल आणि तुम्हाला सुधारणा हवी असेल, तर त्या बाबतीत काही तरी करा !
तुम्हाला तुमच्या आयुष्यात एकच संधि मिळते. ती भव्य करा. जे घडून गेले आहे तसेच पुढे घडणारा आहे हे मनातून काढून टाका. तूमचे ऑपरेटिंग सिस्टम बदलून टाका. ज्ञान मिळवा. नवीन संकल्पना, विचार, कृतीशीलता यांच्या बद्दल समजून घ्या.
तुम्ही या विषयी आधी कदाचीत ऐकले असले, पण ते इतके महत्वाचे आहे की मी तुम्हाला ते परत सांगणार आहे…
आपल्या जगात 3 प्रकारच्या व्यक्ति असतात.
अशा व्यक्ती असतात जे घडवतात.
अशा व्यक्ति असतात जे घडते ते बघणार्या
आणि अशा व्यक्ति असतात जे विचारतात “काय घडले?”
नवीन तंत्र शिकण्याची इच्छा नसणे, यशस्वी लोकं जे ज्ञान मिळवू इच्छितात ते मिळवण्याची इच्छा नसणे, असे करून जर तुम्ही स्वत:ला 2र्या किंवा 3र्या गटात ठेवले असेल, तर सोपा उपाय आहे. तुम्हाला तीन गोष्टी कराव्या लागतील:
१. स्वत:मध्ये गुंतवणूक करा
२. नवीन ज्ञान मिळवा
३. त्या ज्ञानाचा वापर करा
तुम्ही स्वत:ला उत्तम करण्याचा निर्णय आज घेऊ शकता किंवा माझ्या सल्ल्या कडे दुर्लक्ष करू शकता. निर्णय तुमचा आहे.
लक्ष्यात ठेवा, स्वत:मध्ये गुंतवणूक करण्याइतके आयुष्यात महत्वाचे दुसरे काही नाही. एखाद्या पुस्तकातून किंवा सेमिनार मधून सादर होणार्या 100 संकल्पनांमधून मधून एक जरी संकल्पना मिळाली, तरी ती बहुमोल असेल. तुम्हाला नाही असे वाटत का? ती एक संकल्पना कदाचित अशी असेल जी तुमच्या भविष्यात अमुलाग्र बदल घडवून आणेल.
तुमच्यात गुंतवणूक करण्यायोग्य तुम्ही आहात काय ?
जर, भूतकाळात तुम्ही सतत कारणे देत आला असाल तर आता तुम्हाला संधी आहे त्या विषयी काही करण्याची.
जर तुम्ही वर्तमानपत्र वाचाल, टीवी बघाल, रेडियो ऐकाल तर तुमच्या लक्ष्यात येईल आपल्या मनावर किती प्रमाणात नकारात्मकता आदळत असते. दर दिवशी दर मिनिट नकारात्मक्तेने आपण घेरलेले असतो. यशाच्या सूत्रांचा अभ्यास आपल्याला ही नाकरतमकता ब्लॉक करण्याची ताकद देतो. ते आपल्याला जे हवे आहे त्यावर लक्ष केन्द्रित करण्यास शिकवू शकते.
जेव्हा तुम्ही नकारात्मकते पासून स्वत:चा बचाव करण्याचे तंत्र शिकाल तेव्हा तुम्ही आयुष्यात जे चांगले व सर्वोतम येणार आहे त्याकडे लक्ष देऊ शकाल.
आजूबाजूला बघा, जगाला कृतीशील लोकांची, काही करून दाखवणार्यांची गरज आहे. आपल्या कडे नकारात्मक विचार करणार्यांची आणि “”कारणे-दाखवा” मंडळींची कमतरता नाही. ती सर्वत्र आहेत. माझा तुम्हाला सल्ला आहे “या लोकांमध्ये तुमची भर घालून त्यांची संख्या वाढवू नका.”
करून दाखवणार्यांच्या गटात सहभागी व्हा ज्यांचा पाया यशस्वी विचार, यशाचा विचार हा आहे.
अपयश १०१ या विषयात “कारणे-दाखवा” हा धडा तुम्हाला सापडेल. कृतीशील, करून दाखवणारा होण्याचा निर्णय आजच घ्या.
तुम्ही जो काही निर्णय घ्याल, तुमच्या भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा.
_
निलेश गावडे
९६७३९९४९८३
ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach
www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील