‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
बऱ्याच जणांचा (म्हणजे जवळजवळ ९०% जणांचा) असा गैरसमज झालेला असतो कि एखाद्या कंपनीजची फ्रॅंचाईजी, डिस्ट्रिब्युशन घेतले म्हणजे आपण फक्त काउंटर वर बसून पैसे गोळा करायचे असतात. व्यवसाय आपोआप चालतो, आपण काही करायची गरज नसते.
फ्रॅंचाईजी म्हणजे एखादी कंपनी जी सेवा किंवा प्रोडक्ट पुरविते तीच सेवा वा प्रोडक्ट आपण तिचे फ्रॅंचाईजी होऊन आपल्या परिसरात पुरवू शकतो, इतकंच. बाकी आपल्याला इतर व्यवसायिकांप्रमाणेच काम करावे लागते. आयतं काही मिळत नाही. फ्रॅंचाईजी च्या माध्यमातून आपल्या त्या कंपनीच्या सेवा सहज उपलब्ध होतात, आयते बिझनेस मॉडेल मिळते, कंपनीचा ब्रँड वापरायला मिळतो, रीस्क रेशो कमी होतो आणि कंपनीच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी फायदा होतो. थोडक्यात कंपनीकडे असलेल्या सेवा तुम्ही कंपनीच्या नावाने तुमच्या ग्राहकांना विकून पैसे कमवता…
ज्या फ्रॅंचाईजी आयत काही देतात त्यांच्या फ्रॅंचाईजी घेण्यासाठी साठ सत्तर लाख कमीत कमी खर्च करावे लागतात. कारण त्यांचा ब्रॅण्डच एवढा मोठा असतो कि त्यांच्या नावावर ग्राहक येतात. अशावेळी ते फ्रॅंचाईजी फीचेच दहा वीस लाख रुपये घेतात. बाकी ठिकाणी आपल्याला स्वतःला व्यवसाय करावाच लागतो. मी MTS टेलिकॉम ची फ्रॅंचाईजी घेतली होती म्हणजे मी काही दिवसभर बसून राहत नव्हतो. आम्हाला मोडेम विकण्यासाठी प्रयत्न करावेच लागत होते, डेमो देण्यासाठी ग्राहकांकडे जावेच लागत होते, स्थानिक वेगवेगळे जाहिरातींचे कॅम्पेन करावेच लागत होते. आयतं असं काहीच नव्हतं. त्यामुळे फ्रॅंचाईजी घेताय म्हणजे निवांत बसून खाल असं काहीच नाही, काम करावेच लागेल. मार्केटमध्ये जावेच लागेल, ग्राहक शोधावेच लागतील, विक्री करावीच लागेल, नेटवर्क संभाळावेच लागेल.
डिस्ट्रिब्युशन मधेही हीच परिस्थिती आहे. डिस्ट्रिब्युशन घेतलं म्हणजे आता आपण फक्त पैसे खर्च करून माल विकत घ्यायचा आणि निवांत व्हायचे, जी काही विक्री करायची ती कंपनीचा माणूस करेल असा आपला भ्रम असतो. असे डिस्ट्रिब्युटर सहा महिन्यात संपून जातात. कंपनी लगेच दुसरा डिस्ट्रिब्युटर पकडते.
डिस्ट्रिब्युशन व्यवसायात सुद्धा सगळं काही स्वतःलाच करावं लागत. स्वतः मार्केटमधे फिरावे लागते, काउंटर जोडावे लागतात, आर्थिक व्यवहार हाताळावे लागतात, स्वतःची कंपनी असावी अशा प्रकारेच सगळं काम करावं लागतं. फक्त कंपनीकडून आपल्या तयार प्रोडक्ट मिळतं, त्यांचा ब्रँड मिळतो एवढाच डिस्ट्रिब्युशन आणि स्वतःच्या प्रोडक्शन मधे फरक असतो.
त्यामुळे फ्रॅंचाईजी घेतली, डिस्ट्रिब्युशन घेतलं म्हणजे निवांत बसून पैसे मिळतात हा भ्रम दूर करा. काम करावंच लागतं. आयत अपेक्षित असणाऱ्यांना, चांगल्या कंपन्या फ्रॅंचाईजी साठी दारातही उभं करत नाहीत, आणि डिस्ट्रिब्युशन मधे कंपनीला फरक पडत नाही. त्यांना फक्त आपला माल खपण्याशी मतलब असते. तुम्ही नाही काम केलं तर ते दुसऱ्या कुणाला तरी डिस्ट्रिब्युटर बनवतील.
आणि महत्वाचे म्हणजे मोठमोठ्या डिस्ट्रिब्युटर्सशी तुलना करताना, त्यांचा कसा आरामात माल खपतो असा विचार करताना त्यांनी आधी काही वर्ष राबराब राबून नेटवर्क तयार केलेलं असत हे लक्षात घ्या.
व्यवसाय साक्षर व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
नमस्कार
मी सौ. शर्वरी जोशी. *शैली क्रियेशन* या नावाने नाशिक येथे मी एक स्मॉल स्केल युनिट चालवते, ज्यात लहान मुलांसाठी ड्रेस बनतात. आम्ही दुकानासाठी काम करतो. आमचे *शै ली* ब्रँड मोठ्यांचे चे कपडे पण असतात. मला एक प्रॉब्लेम नेहमी येतो तो म्हणजे माझ्याकडे कारागीर टिकत नाहीत. ड्रेस बनवायचं स्किल, फिनिशिंग आली की कारागीर पळ काढतात , आणि मग काही दिवसांनी कळतं की त्या व्यक्तीने स्वतःचाच टेलरिंग शॉप / बुटिक टाकलं. यामुळे सतत नवीन लोकं येत राहततात, त्यांना स्किल शिकवायला आपल्याला वेळ आणि मेहेनत घ्यावीच लागते. म्हणजे वेळ पैसा, श्रम सगळंच वाया जातं.. सोबतच नवीन लोकांना ती फिनिशिंग यायला वेळ लागत असल्याने येणाऱ्या ऑर्डर चा फ्लो पण कमी होतो. यावर काही पर्याय सुचवता येईल का?
धन्यवाद!
mam mi shubhra jadhav.. mumbai madhe swatch chota business ahe online.. tumhi tumhe product pathavu shakta ka what’s app no. 9152202276