व्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

व्यवसाय कसा वाढवू ? हा खूप सामान्यपणे विचारला जाणारा प्रश्न आहे… पण याच उत्तर अवघड बिलकुल नाहीये…

व्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात

“मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा”

व्यवसाय वाढवण्याचे यापेक्षा वेगळे मार्ग नाहीत. एक तर तुम्हाला तुमचे मार्केट वाढवावे लागेल किंवा प्रोडक्ट वाढवावे लागतील. मार्केट वाढवायचे म्हणजे नवीन कस्टमर शोधायचे, नवीन एरीयतात एक्सपान्शन करायचे, सध्या जिथपर्यंत पोचला आहात त्याच्या पुढे जायचे ई. आणि प्रोडक्ट वाढवायचे म्हणजे सध्या जे काहीं प्रोडक्ट किंवा सेवा तुम्ही देत आहात त्याच्याशीच निगडित, सध्याच्याच नेटवर्क मधे प्लेस करता येतील असे प्रोडक्ट किंवा सेवा सुरु करणे. दोनीही परिस्थितीत तुमचा व्यवसाय वाढणारच आहे. काहींना मार्केट वाढवणे सोपे असते, काहींना प्रोडक्ट वाढवणे जास्त योग्य असते,

काहीवेळेस तुमच्याकडे आणखी वाढवण्यासाठी प्रोडक्टचं नसतील तर मार्केट वाढविण्याशिवाय पर्याय नसतो, काहीवेळेस मार्केट च लिमिट संपलेलं असतं मग प्रोडक्टच वाढवावे लागतात. ते जे काही असेल हे दोन मार्गच तुमचा व्यवसाय वाढवणार असतात. जो ज्या परिस्थितीत योग्य असेल तो मार्ग अवलंबवावा. जाहिरात, मार्केटिंग वगैरे हे या मार्गांना सपोर्टींग असतात.

बिझनेस वाढवणं हे बिलकुल रॉकेट सायन्स नाही.
बेसिक गोष्टी आहेत. फक्त नीट अभ्यास करून अमलात आणाव्या लागतात इतकंच…

व्यवसाय साक्षर व्हा…

_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “व्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!