‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
उत्कृष्ट परिणाम तुमच्या रोजच्या छोट्या छोट्या कृतीतून घडत असतो. तुमच्या सवयी ठरवतात तुम्ही कोण आहात आणि भविष्यात तुम्ही काय साध्य करू शकता. खालील ६ सवयी तुमचे आयुष्य बदलवून टाकू शकतात आणि तुम्हाला यशस्वी बनवतील.
दिवसाची सुरवात लवकर करा.
लवकर उठा आणि स्वत: सोबत शांत वेळ घालवा, तुमची सगळ्यात महत्वाची कामं करा आणि दिवसभरात जे समोर येणार आहे त्यासाठी स्वत:ला तयार करा. तुम्हाला सुरवातीला त्रास होईल पण ही सवय लावून घ्या. 15 मिनिटे आधी उठा आणि पुढे हळू हळू त्यात सुधारणा करा.
पॉवर ऑफ फाईव ची प्रॅक्टीस करा.
रोज, तुमचे उद्धिष्ट साध्य करता येईल आशा दिवसभरात करता येण्याजोग्या 5 गोष्टी लिहून काढा आणि त्या पूर्ण करा. तुमच्या कडे उपलब्ध असलेला वेळ आणि तुमचे उद्धिष्ट यांना अनुसरून तुम्ही 5 पेक्षा अधिक गोष्टी सुद्धा करू शकता.
इतरांची स्तुति व प्रशंसा करा.
जर तुम्हाला मजबूत व यशस्वी उद्योग उभारायचा असेल तर तुम्हाला सर्वोत्कृष्ट टिमचे नेतृत्व करावे लागेल. सर्वोत्कृष्ट टीम चे नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला तुमच्या टिम च्या कामातील चांगल्या गोष्टींकडे पहावे लागेल. तुमच्या सभोवतालच्या लोकांमधील चांगले गुण हेरून त्यांची प्रशंसा करण्याची सवय अंगिकारा.
तुमचे वचन पाळा.
तुम्ही जर कोणाला काही करण्याचा शब्द दिला असेल, वचन दिले असेल तर ते पूर्ण करा. तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात असेल की उद्योगात असेल, जर तुम्ही शब्द पाळणारे नसाल तर कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि कोणी तुमच्या सोबत व्यवहार करण्यास तयार होणार नाही.
नाव कमवायला 20 वर्षे लागतात आणि गमवायला 5 मिनिटे पुरेशी असतात. जर तुम्ही याचा विचार केलात तर, तुम्ही तुमचे काम वेगळया पद्धतीने कराल.
– वारेन बफे
समाजाला परत द्या.
समाजासाठी थोडे का होईना पण काही योगदान करण्याची सवय लावून घ्या. त्यासाठी तुम्ही यशस्वी होण्याची वाट बघू नका. थोड्याने सुरवात करा आणि सवय लावून घ्या.
रोज ३०मिनिटे वाचन करा.
तुम्ही वाचन रोज सकाळी दिवस् सुरू करण्या आधी करू शकता किंवा रात्री झोपण्या आधी करू शकता. तुमचे ज्ञान वाढवेल असे काही वाचा किंवा काहीच नाही तर अगदी व्यक्तिमत्व विकास विषयीची पुस्तके वाचा.
_
निलेश गावडे
(निलेश गावडे सरांचे एप्रिल २०२१ मध्ये कोरोनामुळे निधन झाले आहे, त्यामुळे त्यांच्यासंबंधी इतर माहिती दिलेली नाही. परंतु गावडे सर आज आपल्यात प्रत्यक्ष नसले तरी त्यांच्या लेखांच्या माध्यमातून आपल्या सोबत आहेत. म्हणून त्यांचे जुने लेख पुनः पब्लिश करत राहू)
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील