प्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि 


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

प्रोडक्ट मागे प्रॉफिट रेशो किती असावा, विक्री किंमत कशी ठरवावी, किती टक्के नफा असावा अशा पठडीतला हा लेख नाही. थोडा वेगळा मुद्दा आहे. आणि कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांचं याकडे अन्ती लक्ष गेलेलं नसावं…

तुम्ही हॉटेलमधे गेल्यावर हॉटेल महाग आहे कि स्वस्त हे कशावरून ठरवता ? भाज्यांचे रेट पाहून, बरोबर? सव्वाशे दीडशे रुपयाला भाजी असेल तर ठीकठाक आहे, दोन अडीचशे असेल बऱ्यापैकी महाग आहे असा एक ठोकताळा असतो… पण जेवण झाल्यावर कळतं कि भाजीचे रेट कमी असले तरी बिल खूप आले आहे. कशामुळे? याच कारण असतं ज्यांच्या रेट कडे आपण लक्ष देत नाही असे लहान लहान पदार्थ. रोस्टेड पापड २० रुपये, मसाला पापड ४० रुपये, रोटी १९-२० रुपये, चार पाच जणांचं बिल यातच दोन चारशे रुपयांचं होऊन जातं.

मागच्या महिन्यात माझ्या एका बंधूंनी अमेझॉन वरून सॅमसंग चा एक मोबाईल खरेदी केला. अमेझॉन वर बरेच मोबाईल स्थानिक रिटेलर्स पेक्षा नक्कीच स्वस्त मिळतात. मोबाईल आल्यांनतर त्याने अमेझॉन वरूनच मोबाईल कव्हर मागवले. साडे पाचशे रुपयाचे ते कव्हर अमेझॉन वर २८० रुपयाला होतं. म्हणजे अमेझॉन वर तसं दाखवलं होतं. त्याने ते ऑर्डर केलं. पण कव्हर आल्यावर त्याला हवं तसं ते नव्हतं, म्हणून त्याने पुन्हा रिटर्न केलं. मग त्याला मी जवळच्या मोबाईल शॉपी मधे जायला लावलं, तिथे तेच कव्हर १५० रुपयाला होतं. म्हणजे अमेझॉन वरच्या डिस्काउंट रेट पेक्षाही तब्बल ४६% कमी किमतीत…

अशी गडबड माझ्यासोबत सुद्धा झाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी माझ्या घराचे जरा रिन्युएशन केले. फरशी बदलली. ठेकेदाराशी आधीच फरशी बसवण्याचा रेट ठरवून घेतला. त्याने आधी २५०० रुपये ब्रास रेट सांगितला. बार्गेनिंग करत करत १६०० रुपये ब्रास ने फरशी बसवण्याचे निश्चित झाले. एकूण फरशी होती ८ ब्रास. म्हणजे १४-१५ हजार रुपये फरशी बसवण्याचे बिल होत होते. पण एकूण बिल झाले ५० हजार रुपये. फरशी पेक्षा इतर बारीक सारीक कामांचे बिल जास्त झाले ज्याची गणतीच केली नव्हती. पट्टी बसवणे, साईड पट्ट्या बसवणे, भिंतीवर फरशी बसवणे, उंबरा बसवणे, चॅम्पर मारणे अशा लहान लहान कामांची बोलणी केलेलीच नव्हती. या कामांचा अंदाज काम सुरु झाल्यानंतर महिनाभराने आला. मग पुन्हा इतर कामांच्या रेट बद्दल चर्चा झाली.

या सगळ्या उदाहरणांमधे एक समान धागा आहे. सगळ्यांनी लक्षात येणाऱ्या किंवा दिसणाऱ्या प्रोडक्ट / सर्व्हिस चे रेट मर्यादित ठेवलेले आहेत, पण लक्षात घेतल्या न जाणाऱ्या वस्तूंचे, पदार्थांचे, सेवांचे दर प्रमाणापेक्षा जास्त महाग आहेत. सामान्य माणूस नेहमी प्रथमदर्शनी जिकडे लक्ष जाईल अशा वस्तूचे सेवेचे दर पाहून त्या व्यवसायाच्या आर्थिक बाबींचा हिशोब करतो. हॉटेल मधे गेल्यावर जेवणाच्याच रेट कडे लक्ष जाणार, अमेझॉन फ्लिपकार्ट वर सर्फिंग करताना जास्त किमतीच्या किंवा मुख्य वस्तूंचेच दर तपासून घेतले जाणार, फरशी बसवायची म्हटल्यावर आपण साहजिकच फरशी बसवण्याचा रेट विचारणार… हि नकळत घडणारी गोष्ट आहे. पण नकळतच घडणाऱ्या कृतीचा आपल्या व्यवसायासाठी वापर करून घेतला जातो. रेट ठरवण्याची हि एक स्ट्रॅटेजि आहे. प्रत्येक वेळेस दहा ला प्रोडक्ट बनलंय मग ते १५ ला विकलं पाहिजे असं नसतं. ते १२ ला विकून एखादं १ रुपयाला बनणारं प्रोडक्ट त्यासोबत २ रुपया विकलं जातं… अशावेळी एकूण विक्रीवर प्रॉफिट रेशो ठरवला जातो. एखादी वस्तू स्वस्त देऊन इतर लक्षत न येणाऱ्या वस्तू थोड्या रेट वाढवून विकल्या जातात. पण त्या वस्तू किंवा सेवा अशा असतात कि ग्राहक टाळू शकत नाही, आणि त्यावर नाराज होऊन व्यवहाराला नकारही देऊ शकत नाही.

हॉटेल मधे पापड महाग आहे म्हणून आपण जेवण ऑर्डर न करताच माघारी जाणार नाही,
किंवा अमेझॉन वर १५० चं कव्हर २८० ला होतं म्हणून मी पुढच्या वेळेस मोबाईल तिथे खरेदी करणार नाही असं होणार नाही,
किंवा फरशी बसवताना पट्टीचा रेट ८० रुपये रनिंग फूट आहे म्हणून काही फरशी बसवण्याचेच रद्द केले जाणार नाही.

अशी खूप सारी उदाहरणे आपल्या आसपास आहे… पण नेहमीप्रमाणेच आपली नजर शोधक असली पाहिजे.

बऱ्याच हॉटेलच्या मेनूकार्ड वर कमी किमतीचे पदार्थ डाव्या पानावर खालच्या बाजूला असतात, आणि जास्त किमतीचे पदार्थ उजव्या पानावर वरच्या बाजूला असतात… कारण मेनूकार्ड उघडलं कि आपलं लक्ष सर्वात आधी उजव्या पानाच्या वरच्या बाजूला जात असतं…

खूप काही गोष्टी आहेत, खूप काही स्ट्रॅटेजि आहेत, गमतीजमती आहेत… म्हनुनच मी म्हणतो, इथे दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळत असतं.   

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!