खरेदी न करता दुकानात तासभर टाईमपास करणाऱ्या ग्राहकांशी तुमची वागणूक कशी असते?


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

एखादा ग्राहक दुकानात येतो, तासभर टाईमपास करतो,
खरेदी काहीच करत नाही, फक्त किमती विचारत राहतो,
त्याला काही घेण्यात स्वारस्य नसून तो फक्त वेळ घालवण्यासाठी तुमच्या दुकानात आला आहे हे तुमच्या लक्षात येते…

अशावेळी बऱ्याचदा तुम्ही त्याला त्याच्या एखाद्या प्रश्नावर
काहीतरी उद्धट उत्तर देऊन तेथून हाकलण्याचा प्रयत्न करता…

तो ग्राहक मग रागारागात
तुम्हाला प्रत्युत्तर देऊन तेथून निघून जातो…
पुन्हा कधी दुकानात येणार नाही असंही म्हणतो…

तुम्हाला वाटत फुकटच टाईमपास करत होतं, बरं झालं गेलं…

पण,
हे प्रकरण तुमच्यासाठी संपतं… त्या ग्राहकासाठी नाही….

त्याचा विचार असतो, कि मी ग्राहक आहे, मला त्या दुकानात कितीही वेळ थांबण्याचा हक्क आहे…
आता ते कितीही वेळ थांबणे नकळतपणे असो किंवा ठरवून, तो त्याचा हक्क आहे…
अशावेळी तुमच्या उद्धट बोलण्यामुळे तो चिडतो, आणि तेथून निघून जातो.
त्याला तुमचा वागणं अपमानास्पद वाटतं, त्याचा इगो, अहं दुखावला जातो…
त्याच्या मनात कायमस्वरूपी तुमच्याविषयी नकारात्मक भावना तयार होते.

त्या दिवसापासून तो तुमच्याविषयी चांगले बोलणे बंद करतो.
तुमच्या विषयी कुठे चर्चा सुरु झाली तरी तो लगेच तुमच्याविषयी नकारात्मक बोलायला सुरुवात करतो.
स्वतः तुमच्याकडे येणे बंद करतोच, पण इतरांनाही तुमच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो.

त्या एक तासामधे काय घडलंय हे फक्त तुम्हाला आणि त्या ग्राहकाला माहित असते,
बाकीच्यांना तो ग्राहक जी स्टोरी सांगेल तीच खरी वाटणार असते.
साहजिकच तुमचा ब्रँड खराब होणार असतो…

याचवेळी, जर तुम्ही,
त्याने एक काय, दोन चार तास टाईमपास करूनही
त्याच्या प्रत्येक प्रश्नाला, चौकशीला हसतमुखानेच उत्तर दिले तर?
अगदी त्याला तिथून वाटं लावतानाही तुम्ही धन्यवाद सर, पुन्हा या असं हलकंसं स्मित करून म्हणालात तर?

तर त्याच्या मनात आपोआपच तुमच्या चांगुलपणामुळे अपराधीपणाची भावना निर्माण होईल.
मी तास दोन तास टाईमपास करतोय आणि हा माणूस काहीच म्हणत नाहीये,
हा विचार त्याच्या मनात तुमच्याविषयी आदराची भावना निर्माण करेल…

पण, आपल्याला त्याच्याकडून आदरही अपेक्षित नाहीये…
महत्वाचे आहे ते हे, की तो तुमच्याविषयी बाहेर वाईटच बोलू शकणार नाही.
तुम्हीच त्याला काहीही चुकीची वागणूक दिली नसल्यामुळे त्याचे तुमच्याशी काहीही वैर असणार नाही…
त्यामुळे तो बाहेर तुमच्याविषयी वाईट काहीच बोलू शकणार नाही…

दुसरा फायदा असा कि…
तो आला, त्याने तासभर टाईमपास केला, काहीच खरेदी ना करता निघून गेला…
तुम्ही मात्र प्रसन्न मनानेच त्याला निरोप दिला…
साहजिकच तुमच्याविषयी त्याच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर तयार होतो…
पुढच्या वेळी जेव्हा कधी त्याला खरंच काही खरेदी करायची असेल तेव्हा तो तुमचाच आधी विचार करणार असतो…

तो मानाने तुमच्यासमोर हरलेला असतो,
त्याला वाटणारी अपराधीपणाची भावना, तो कधीतरी तुमच्याकडे खरेदी करून, दूर करण्याचा प्रयत्न करतो…
आणि त्यावेळीही तुमच्याकडून मिळणारी तशीच चांगली वागणूक कदाचित त्याला तुमचा कायमस्वरूपी ग्राहक बनवते…

तुमची चूक असो वा नसो, तुमचं एखाद चुकीचं वागणं तुमचा ब्रँड खराब करू शकतो,
याचवेळी, समोरचा चुकीचा आहे हे माहित असूनही त्याला शांतपणे, प्रसन्नपणे हाताळण्यात तोटा काहीच नाहीये… झाला तर फायदाच होईल.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे,हसून बोलायला, प्रसन्नपणे बोलायला पैसे लागत नाही… मग त्यासाठी आपण नकार का द्यायचा?

ग्राहक आहे… तो येतोय, बसतोय, टाईमपास करतोय, काहीच खरेदी न करता निघून जातोय, आपल्याला वाईट का वाटावं? आपल्याला राग का यावा?
तो खरेदी करतोय कि नाही, किंवा मोठी खरेदी करतोय कि लहान रकमेची यावर आपण त्याला द्यायची वागणूक बदलू शकत नाही.
आपलं काम आहे त्याला योग्य प्रकारे हाताळणे… ते आपण योग्य की प्रकारे करणे आवश्यक आहे.
त्यातून आज नाही तर भविष्यात कधीतरी, पण फायदाच होणार आहे…

त्यामुळे, ग्राहक कसाही असू द्या, तुम्ही स्वतःवरचा ताबा सोडू नका… चांगलं वागणं थांबवू नका…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!