‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
तुम्ही मागणारे कि मिळवणारे यावर बरंच काही ठरतं.
मागणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं समोरचा देऊ इच्छितो. मिळवणाऱ्यांना आपल्या मनाप्रमाणे मिळविण्याची संधी असते, ते कुणावरही विसंबून नसतात.
मागणे सोपे आहे, मिळविणे अवघड… म्हणून मागणाऱ्यांची रांग मोठी असते, आणि मिळवणाऱ्यांची वानवा दिसते.
मागणारे कधीच समाधानी असत नाहीत, आणि मिळविणारे कधी निराश होत नाहीत… कारण मागणाऱ्याला आपल्याच काहीच क्षमता नाही हे माहित असते, आणि मिळवणाऱ्याला आपल्यात काय क्षमता आहे हे चांगले माहित असते.
मागणारे सतत तक्रार कात असतात, मिळवणारे सतत उपाय शोधात असतात, त्यावर काम करत असतात
मागणारे नेहमीच अपयशी असतात, मिळवणारे नेहमीच यशस्वी असतात.
उद्योजक काही मागत बसत नाहीत… ते स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद बाळगतात. स्वतःला हवं ते मिळविण्याचा प्रयत्न करतात. आणि सोबतच मागणाऱ्यांच्या झोळीत सुद्धा दान टाकतात…
मागणारे होऊ नका, मिळवणारे व्हा..
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील