कंपनी मोठी होते ती गुणवत्ता आणि सेवेमुळे…


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

रे क्रॉक…. ज्यांनी मॅक्डोनाल्ड्स सारखं एक मोठं उद्योगविश्व उभारलं. रे क्रॉक स्वच्छतेच्या बाबतीत खूप शिस्तबद्ध होते. मॅक्डोनाल्ड्स शॉप मधे थोडीसुद्धा अस्वच्छता असू नये असा त्यांचा दंडक होता. आणि सोबतच बर्गर नेमून दिलेल्या प्रमाणातच बनविले गेले पाहिजे असा दंडक होता. कंपनीच्या सुरूवातीच्या काळात अमेरिकेतील त्यांची एक सर्वात जास्त चालणारी फ्रॅंचाईजी या बाबतीत मागे पडत होती. क्रॉक यांनी फ्रॅंचाईजी मालकाला सांगून पहिले. पण आपण मॅक्डोनाल्ड्स ची अमेरिकेतील टॉप सेलिंग फ्रॅंचाईजी आहोत, कसंही वागलं तरी आपल्याला काय कुणाचं भीती असं त्याचा अविर्भाव होता. रे क्रॉक नि त्याला सरळ फ्रॅंचाईजी बंद करायला सांगितलं

माझी एक एक्साईड कंपनीला प्लास्टीक ट्यूब पुरविणारी कंपनी होती. दुचाकी वाहनांच्या बॅटरीला ऍसिड ओव्हरफ्लो साठी लागणारी एक फूट लांबीची प्लास्टिक फ्लेक्सिबल ट्यूब आम्ही देत होतो. ट्यूब एकदम ट्रान्सपरंट असावी, त्यावर एकही काळा डाग नको, बुडबुडे नको असा कंपनीचा क्वालिटी स्टॅंडर्ड होता. ट्यूब तपासताना एखाद्या ट्यूब मधे एखादा जरी अगदी लहानसा काळा डाग किंवा बुडबुडा असेल तर लगेच सगळा माल रिजेक्ट व्हायचा. ज्या ट्यूब मधून ऍसिड वाहणार आहे ती ट्यूब सुद्धा कंपनी दिसण्याच्या बाबतीत अगदी बारकाईने तपासत असे.

दोन तीन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश मधील मारुती सुझुकीची एकाच मालकाची असलेली पंधरा वीस शोरूम एकाच वेळी बंद केली गेली होती. ग्राहकांना खराब माल पुरविणे, खराब सर्व्हिस, खोटे स्पेअर पार्टस, ग्राहकांशी अर्वाच्च भाषा वापरणे अशा तक्रारी आल्यामुळे कंपनीने शहानिशा केली आणि सत्यता आढळल्यानंतर तात्काळ शोरूम्स बंद केले.

मॅक्डोनाल्ड्स, मारुती सुझुकी, एक्साईड या कंपन्या प्रातिनिधिक आहेत. जवळजवळ सर्वच यशस्वी कंपन्यांचा इतिहास पहिला तर त्यांनी सेवा आणि गुणवत्ता यांना सर्वोच्च स्थान दिलेले अढळून येईल.

या कंपन्या अशाच मोठ्या नाही झालेल्या. प्रचंड मेहनत, शिस्त, गुणवत्ता, सेवा हि यांच्या यशाची कारणे आहेत. फक्त पैसा कमावणे हे यांचं उद्दिष्ट नसतं, तर आपल्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक समाधानी मनानेच माघारी गेला पाहिजे यासाठी या कंपन्या सतत प्रयत्नशील असतात. आपल्या तत्वांशी या कंपन्या बांधील असतात. थोड्याशा फायद्यासाठी या कंपन्या तत्वांशी तडजोड करत नाहीत. या कंपन्या खूप वेगाने वर जाताना दिसत नाहीत, पण यांची प्रगती सतत चालू असते. याउलट ग्राहकांना कस्पटासमान लेखणारे काही काळ मार्केटिंग जाहिरातीच्या बळावर वर जातात पण जास्त दिवस मार्केटमधे तग धरू शकत नाहीत.

व्यवसायचे भविष्य पाहताना आपण आपल्या व्यवसायाला पुढच्या किमान दहा, पंधरा आणि पंचवीस वर्षांनी कुठे पाहू इच्छितो याचा विचार करायलाच हवा…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “कंपनी मोठी होते ती गुणवत्ता आणि सेवेमुळे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!