तुम्ही व्यवसाय करता, हे सांगण्यात कमीपणा वाटू देऊ नका…


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

आमच्या नगर MIDC मोठ्या कंपन्या तश्या निवडकच आहेत. L&T, क्रॉम्प्टन, एक्साईड यासारख्या आठ दहा मोठ्या कंपनी आहेत. बाकी लहान आणि व्हेंडर कंपन्या जास्त आहेत. यातली L&T हि सर्वात मोठी कंपनी म्हणता येईल. MIDC मधील तिच्या काही व्हेंडर कंपन्या सुद्धा आता मोठ्या कंपन्या म्हणून गणल्या जात आहेत. आमच्या दृष्टीने नगर MIDC मधील अर्ध्याअधिक कंपन्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे L&T च्याच जीवावर चालू असं म्हणता येईल.

तीन वर्षांपूर्वी L&T मधून एक मशीन दुसरीकडे शिफ्ट केले. पण तेवढ्याने L&T चा संपूर्ण प्लॅंट दुसरीकडे शिफ्ट होणार अशी अफवा MIDC मधे पसरली. महिनाभर हि अफवा चालू होती. कुणालाही खात्रीशीर काही सांगता येत नव्हते. आणि कंपनीकडूनही कुठलाही खुलासा होत नव्हता. या अफवेमुळे MIDC मधील कित्येक कंपनीचालक तणावात होते. कामगार वर्गावर काम जाण्याच्या भीतीचे सावट होते. आणि अशी एखादी कंपनी कमी झालीकि संपूर्ण इंडस्ट्रिअल एरियामध्येच त्याचा विपरीत परिणाम होतो. महिनाभर संपूर्ण MIDC या अफवेमुळे टेन्शन मधे होती. शेवटी कंपनीकडूनच प्लॅंट शिफ्ट होणार नसून फक्त एक मशीन शिफ्ट केले आहे असा खुलासा केला गेला, आणि मग सगळ्यांना धीर आला…

हि कंपनीची ताकद असते. एक कंपनी हजारो लाखो लोकांना रोजगार देते. काही वर्षांपूर्वी मानेसर मधील मारुती सुझुकी चा प्लांट कामगारांच्या हिंसक आंदोलनामुळे बंद करण्याचे कंपनीने जाहीर केले होते. या एका निर्णयामुळे मानेसर मधील संपूर्ण इंडस्ट्रिअल सेक्टरच बंद पडण्याच्या मार्गावर होतं. शेवटी तिथल्या खासदार आमदारांनी मध्यस्ती करून कामगारांकडून हिंसा करणार नाही असे वचन घेऊन कंपनीला जाण्यापासून रोखले… एकट्या मारुतीच्या प्लॅंट मुळे तिथले लाखभर रोजगार जाण्याच्या मार्गावर होते. हि इंडस्ट्रीची ताकद आहे, आणि खासियतही आहे…

तुम्ही व्यवसाय करता म्हणजे तुम्ही प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कित्येक रोजगार तयार करण्यासाठी हातभार लावत असता. भारतातील टॉप १० कंपन्या पन्नासेक लाखाच्या आसपास रोजगार तयार करत असतील. देशातील एकूण व्यवसाय आणि कंपन्या किती रोजगार निर्माण करत असतील? कल्पना करा…

आपण व्यावसायिक आहोत म्हणजे आपण फक्त पैसा कमवत नाही, तर आपण रोजगार सुद्धा निर्माण करत असतो. पगार देण्यातली मजाच वेगळी असते, आणि एक समाधानही असतं; आपण त्यांचं घर चालवण्यासाठी हातभार लावत असतो… तुम्ही टपरी टाकून वडापाव जरी विकत असाल ना, तरी किमान एकाला तरी प्रत्यक्ष रोजगार तुम्ही दिलेला असतो, आणि अप्रत्यक्षपणे त्यासाठी रॉ मटेरियल पुरविणाऱ्या कंपनीमधे तुम्ही काही जणांना रोजगार दिलेला असतो, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या कंपनीमधेही तुम्ही रोजगार दिलेला असतो… तुम्ही अप्रत्यक्षपणे रोजगार निर्मितीसाठी भरपूर हातभार लावलेला असतो.

व्यवसाय हे एक Noble Profession आहे. हे खालच्या पातळीवरच नाही, तर सर्वोच्च पातळीवरचं प्रोफेशन आहे. त्यामुळे व्यवसायाचा न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. तुम्ही उद्योजक म्हणून कुठेही कमी नसता, तर सगळ्यांच्या वर असता. त्यामुळे तुमचा व्यवसाय लहान कि मोठा याने फरकच पडत नाही… लोकांना, मी व्यवसाय करतोय हे सांगताना तुमच्या शब्दात आत्मविश्वास झळकला पाहिजे, कमीपणा नाही.

उद्योजक व्हा…

_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

One thought on “तुम्ही व्यवसाय करता, हे सांगण्यात कमीपणा वाटू देऊ नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!