November 26, 2020
उद्योजक होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य आहे का?

उद्योजक होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य आहे का?

Share
 • 784
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  784
  Shares


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : निलेश गावडे
======================

तुमचे व्यक्तिमत्व उद्योजक होण्यासाठी योग्य आहे की नाही ते खूप महत्वाचे आहे. तुम्ही स्वयं-प्रेरित आहात का? तुम्ही बॉस शिवाय काम करू शकता का? जर तुमच्या मध्ये उद्योजकांसाठी लागणारे काही गुण नसतील असे तुमच्या लक्ष्यात आल्यावर तुम्ही त्याची भरपाई ते गुण अथवा कौशल्ये विकत घेऊन करू शकता का ?

उद्योजक होण्यासाठी तुमच्यात कोणते गुण असायला हवेत?

उद्योजकांमध्ये कोणकोणते गुण असले पाहिजेत या विषयी तुम्हाला ओंनलाईन असे अनेक लेख वाचायला मिळतील. अनेक अशा लेखांमधून असे संगितले जाते की उद्योजक होण्यासाठी तुमच्यात त्या साठी आवड असायला हवी, परंतु, यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुमच्यात आवड असण्या व्यतिरिक्त अनेक महत्वाच्या गुणांची गरज भासते.
शेवटी, तुमच्या उद्योजकीय प्रवासात अनेक वेळा अस ही दिवस येतील जेव्हा तुम्हाला तुमच्या उद्योगाचा तिटकारा वाटेल. परंतु तुम्हाला तुमच्या कामाची आवडच असला हवी असे नाही, तुम्ही परिणामांविषयी उत्साहित असलात तरी चालते. उद्योगात यशस्वी होण्यासाठी लागणारे खालील दिलेले गुण, तुमच्या काम पूर्ण करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहेत.

Promoted
उद्योजक होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य आहे का?

१. कौशल्य – तुम्ही काय करताय हे तुम्हाला माहिती हवे. जर तसे नसेल, तर किमान तुमच्या कडे असा कोणी असावा ज्यांना तुम्ही विचारू शकता आणि त्यातील तज्ञ म्हणून त्यांना त्या कामाची माहिती असेल. तुमच्या उद्योगातील सर्व कामे तुम्ही आऊटसोर्स करू शकता. उदा. तुम्हाला वेबसाईट बनवायची असेल तर तुम्हाला ती बनवण्याचे ज्ञान असले पाहिजे हे काही नाही. तुमच्या कडे नव नवीन ग्राहक शोधण्याची व इतर लोकांना काम वाटून त्यांच्या कडून करून घेण्याची योजना असणे गरजेचे आहे.

२. चिकाटी – तुम्ही उद्योग सुरू केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात अपयश आले म्हणून हार माणून चालणार नाही. तुम्हाला जो पर्यन्त यशाचा अनुभव मिळत नाही तोवर तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागेल. जर तुम्ही अभ्यास केला असेल आणि तुमचा कृती आराखडा तयार असेल, तर चिलखत उतरवण्यापूर्वी तुम्ही त्यावर काम करणे गरजेचे आहे. हार मानण्यापूर्वी किमान एक ठरावीक काळ तुम्ही तुमच्या कृती आराखड्यावर ठाम राहून त्याप्रमाणे काम केले पाहिजे.

READ  उद्योजकांसाठी प्रेरणादायी., संभाजी राजांची जंजिरा लढाई...

३. लवचिकता – सत्य हेच आहे की, उद्योजकाला पडून लगेच उठून उभे राहता आले पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण होईल की तुम्हाला तुमच्या निर्णयांवर फेर विचार करावा लागेल. हे खूप सामान्य आहे. प्रत्येक उद्योगात चढ उतार असतात. तुमची या अशा वादळातून तरुन जाण्याची क्षमताच तुम्हाला यशस्वी उद्योजक बनवत असते.

Promoted
उद्योजक होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य आहे का?

४. संसाधनात्मकता (रिसोर्सफुलनेस) – बर्‍याच लोकांना असे वाटते की उद्योग सुरू करण्यासाठी अनेक संसाधनांची आवश्यकता असते. खरे तर, तुम्ही फक्त रिसोर्सफुल असण्याची आवश्यकता असते. तुम्हाला ओळखता आले पाहिजे जेव्हा तुमच्या समोर काही असे संसाधन/रिसोर्स आहे जे तुम्ही त्या त्या वेळेस वापरू शकता, जसे पैसे, लोक, तंत्रज्ञान इ.

५. प्रेरणा – जर तुमच्या कडे तुमच्या डोक्यात असलेल्या उदधिष्ट, स्वप्नाना पूर्ण करण्यासाठी स्वत:ला व इतरांना प्रेरित करण्याची क्षमता नसेल तर तुम्ही उद्योगात यशस्वी होऊ शकत नाही. परंतु जर तुमच्या कडे प्रेरणा नसेल, पण क्षमता आणि इच्छा असेल तर तुम्ही एखादा कोच हायर करू शकता तुम्हाला ती शोधण्यात मदत करण्यासाठी.

६. वचनबद्धता – तुम्ही तुमच्या उद्योगात १०० टक्के असण्याचा हा गुण आहे. तुम्ही कधी हा उद्योग कधी तो उद्योग असे उद्योग-उद्योग खेळणे चालणार नाही. तुम्ही परिश्रमपूर्वक तुमच्या उद्योगात राहून ते करून दाखवले पाहिजे.

Promoted
उद्योजक होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य आहे का?

७. साहसाची भावना – उद्योजक होणे व तो उद्योग चालवणे हा असा प्रवास असणार आहे ज्यात तुम्हाला अनेक चढउतार अनुभवास येतील. कधी तुम्हाला यश मिळेल कधी अपयश. कधी हे खूप पटापट होईल, आणि हे असेच असणार आहे. असे म्हणतात की उद्योजक हा रिस्क घेत असतो, पण खरे तर, जो इतरांसाठी काम करत असतो तो देखील रिस्क घेताच असतो, फक्त त्याच्या ते लक्ष्यात येत नाही.

या व्यतिरिक्त इतर ही काही गुण आहेत जे उद्योजक होण्यासाठी आवश्यक आहेत. जेव्हा तुम्हाला लक्ष्यात येईल की उद्योजक विविध प्रकारच्या व्यक्तिमत्वाची माणसे असतात, बोलके ते अंतर्मुख आणि त्यामधील सर्व काही असतात, तुमच्या लगेच लक्ष्यात येईल उद्योजक यशस्वी कसे होतात.

अभ्यास, संशोधन व तुमच्या उद्धोश्तांपर्यंत तुम्हाला नेणारी धोरणात्मक कृती तुमच्या साठी महत्वाची आहे. थोडक्यात, कृती केल्याने तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कडे हेतु असेल व खूप प्लॅन असतील, पण तुम्ही ते प्रत्यक्षात उतरवणार नसाल त्या साथी काही कृती करणार नसाल, तर काहीच घडणार नाही.

उद्योजक/ व्यावसायिक होण्याचे तुम्ही एकदा ठरवलेत की तुम्हाला पुढे हे ठरवायचे आहे की यशस्वी होण्यासाठी तुम्ही कोणता उद्योग करणार आहात.

READ  व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपल्या मनावर आणि विचारांवर ताबा ठेवायला शिका

_

निलेश गावडे
९६७३९९४९८३

ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach

Promoted
उद्योजक होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य आहे का?

www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहीलShare
 • 784
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  784
  Shares
 • 784
  Shares

  व्यावसायिकांसाठी वाचनीय पुस्तके

उद्योजक होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य आहे का?
उद्योजक होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य आहे का?
उद्योजक होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य आहे का?
उद्योजक होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य आहे का?
उद्योजक होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य आहे का?
उद्योजक होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य आहे का?

5 thoughts on “उद्योजक होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!