सूत्र यशाचे (१) – तणावमुक्त रहा


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

उद्योजकांनी नेहमी तणावमुक्त राहणे आवश्यक असते. लहान लहान गोष्टींवरून डोक्याला ताप करून घेऊ नये. कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाचे प्रमाण उद्योजकांमधे जास्त आहे. परंतु कर्मचारी आपल्याप्रमाणे काम करू शकत नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. त्यांच्यात आपल्याप्रमाणे कामाची क्षमता असती तर ते आपल्या जागी असते. ते कर्मचारीच आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या क्षमतेएवढीच अपेक्षा ठेवा. यासोबतच आर्थिक अडचण, घरगुती काही समस्या, मार्केटमधील चढउतार, बँकांचे हफ्ते अशा विविध कारणांमुळे सुद्धा तणाव वाढत असतो. हा तणाव टाळण्याचा नेहमी प्रयत्न करावा.

तुम्ही टेन्शन घेतलं किंवा नाही घेतलं काहीच फरक पडणार नसतो. समस्येच्या निराकरणासाठी ठरलेला वेळ लागणारच असतो. उलट टेन्शन मुळे तुमच्याच कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. एखाद काम दिवसभरात होणे अपेक्षित असेल तर त्याला दोन दिवस लागतात. टेन्शनमुळे चिडचिड वाढते, रागीटपणा वाढतो. याचा कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर आणि घरी कौटुंबिक स्वास्थ्यावर परिणाम होतो.

तणाव घेणं किंवा न घेणं हा मानसिकतेचा भाग आहे. पण यासाठी तुम्ही प्रयत्न सुद्धा करू शकता. दररोज सकाळी लवकर उठून दहा मिनिटे ध्यान धारणा आणि किमान अर्धा तास व्यायाम केला तर दिवसभर मेंदू चांगला फ्रेश राहतो. आपल्या मनावरील कामाचा ताण कमी होत जातो. यामुळे कामात चांगले लक्ष लागते. कार्यक्षमता वाढते. आणि काम सुरळीत झाले कि तणावही आपोआप कमी होतो. थोडक्यात नेहमी फ्रेश, तणावमुक्त, रिलॅक्स राहिलं तर तुमचं काम जास्त चांगलं होतं.

शांत रहा, रिलॅक्स रहा, तणावमुक्त रहा…

उद्योजक व्हा…

_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!