यशाचे सूत्र (२)… निर्णयक्षमता


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला यशाच्या शिखरावर नेत असते.

आपल्या आयुष्याचे मागचे दहा वर्षे चाळून पहा… आपल्या आयुष्यात कित्येक घटना अशा घडलेल्या आहेत ज्या आपण योग्य वेळी निर्णय घेतला असता तर त्यावेळचे परिणाम खूप वेगळे आणि आपल्या आयुष्यावर खूप चांगले परिणाम करणारे ठरू शकले असते असं वाटतं… तेव्हा वेळ होती, पण उशीर झाला किंवा घाईगडबडीत निर्णय चुकला नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती असं कित्येक बाबतीत आपल्या वाटत असते. खरं हे आपल्या कमकुवत निर्णयक्षमतेचे परिणाम आहेत. मला स्वतःला निर्णय घेण्यात उशीर केल्यामुळे बऱ्याचदा चांगलेच नुकसान झालेले आहे. आत्ताही कधीमधी चूक होते पण ती तितकीशी मोठी नसते. सात आठ वर्षांपूर्वी निर्णय घेण्यात ज्या काही मोठ्या चुका झाल्या त्यातून शिकून मी शक्य तेवढे लवकर निर्णय घेण्याची क्षमता डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्याचे चांगले परिणाम मिळत आहेत.

आपण इतरांच्या यशाला नशिबा चा भाग म्हणतो आणि त्याच्या निर्णयक्षमतेला दुर्लक्षित करतो. खरं तर ते यश योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे मिळालेले असते. त्यांच्या यशाला नशिबाचे कोंदण लावल्यामुळे निर्णयक्षमतेचे महत्व आपल्या लक्षातच येत नाही.

व्यवसायात आपल्याला कित्येकदा तात्काळ निर्णय घ्यायचे असतात. अशावेळी हि निर्णयक्षमता चांगली असणे आवश्यक आहे.

‘निर्णय घेऊ का नको’ किंवा ‘काय निर्णय घेऊ’ असं कन्फ्युजन होत असेल, किंवा प्रत्येक वेळी कुणीतरी आपल्या निर्णयाला समर्थन देण्याची आवश्यकता भासत असेल, किंवा कुणाशी तरी चर्चा केल्याशिवाय आपल्याला कधीच अंतिम निर्णयाप्रत येणं शक्य होत नसेल, किंवा आपल्याला कोणत्याही गोष्टीवर ठाम निर्णयच घेता येत नसेल तर आपल्याला आपली निर्णयक्षमता सुधारण्याची खूप आवश्यकता आहे. व्यवसायात कित्येकदा तात्काळ निर्णय घेण्याची गरज असते, अशावेळी कमकुवत निर्णयक्षमता तुमच्या व्यवसायाचे नुकसान करू शकते.

निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करावा, योग्य अयोग्यतेच्या कसोट्यांवर सर्व बाजू तपासून पाहाव्यात, चांगल्या वाईट परिणामांचा अंदाज घ्यावा, वाईट परिणामांना सामोरे जाण्याची तयारी करावी, आणि मग निर्णय घ्यावा… निर्णय घेतल्यानंतर मागे फिरायला पुन्हा संधी नसते. आणि घेतले निर्णय योग्य आहे हे तुम्हाला सिद्ध करून दाखवण्याचे दडपणही असते.

काही वेळेस निर्णय घेण्यासाठी वेळच नसतो. आत्ता काय ते ठरवायचं आहे अशी वेळ येते. अशावेळी त्या क्षणाला जे योग्य वाटेल तो निर्णय घेऊन मोकळं व्हावं लागतं. तिथे गडबड झाली, गोंधळ उडाला, निर्णय घ्यायला उशीर झाला तर हातची संधी जाऊ शकते.

निर्णयक्षमता डेव्हलप होत असते. मागच्या निर्णयांमधून शिकून, इतरांच्या यशापयशाची उदाहरणे तपासून, आसपास घडत असलेल्या घटनांचा अभ्यास करून आपण आपली निर्णयक्षमता वृद्धिंगत करू शकतो.

निर्णयक्षमता आपल्या व्यवसायासाठी अत्यावश्यक गुण आहे.

व्यवसाय साक्षर व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!