यशाचे सूत्र (३) … सहकारी चांगले निवडा


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

एक चांगली टीम तुम्हाला नक्कीच यशस्वी करू शकते. सहकारी निवड तुमच्या व्यवसायातील महत्वाची पायरी आहे. सर्वजण सर्व क्षेत्रात पारंगत असू शकत नाही पण प्रत्येक जण कोणत्या तरी एका क्षेत्रात पारंगत असतोच… एखादा सेल्स मधे हुशार असेल, एखादा अकौंटिंग मधे हुशार असेल, एखाद्याचे कौशल्य क्रिएटिव्हिटी मधे असेल तर एखादा ब्रॅण्डिंग मधे हुशार असेल… तुम्ही स्वतः सुद्धा सर्व क्षेत्रात पारंगत असू शकत नाही, तुमची स्पेशालिटी सुद्धा दोन तीन क्षेत्रापुरतीच मर्यादित असते. पण जेव्हा हे वेगवेगळे कौशल्य असणारे लोक तुम्ही जोडता, तुमच्या व्यवसायाचे भाग बनवता तेव्हा या सर्वांच्या साथीने तुमचा व्यवसाय सर्वगुणसंपन्न होतो… हि टीम म्हणजे फक्त व्यवसायातील भागीदार असे नव्हे. तुमचे कर्मचारी, भागीदार, सल्लागार अशा सर्वांची मिळून टीम तयार होत असते.

टीम तयार करताना विचारपूर्वक करावी. वेगवेगळ्या विचारांचे लोक सोबत असावेत, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत असणारे लोक जोडावेत. एकाच विषयावर प्रत्येकाचे मत वेगवेगळे असते. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र बसता तेव्हा सर्वांची मते ऐकायला मिळतात. आणि त्या विषयाचा सर्व बाजूंनी अभ्यास करून निर्णय घ्यायला सोपे जाते. तसेच प्रत्येकाची एकेक क्षेत्रात स्पेशालिटी असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अडकून पडण्याची गरज पडत नाही. तुम्ही तुमच्या महत्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकता. चांगले सहकारी तुमचा कामाचा ताण ९०% पर्यंत हलका करू शकतात.

वेगवेगळ्या विचारांचे, कौशल्ये असणारे सहकारी नेहमीच शोधत राहावे. चांगले लोक जोडण्यात कसलीही कसर ठेऊ नका.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा..
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!