‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
ग्राहकांना फक्त गुणवत्तापूर्ण प्रोडक्ट किंवा सेवा हवी असते असे नाही. ग्राहक, विक्रेत्याच्या स्वभावाचा सुद्धा विचार करत असतो. हसत खेळत बोलणारे, मिश्किल स्वभावाच्या विक्रेत्यांकडे ग्राहक नेहमीच आकर्षित होत असतात. अडेलतट्टू, उग्र बोलणारे, सतत चेहऱ्यावर रागीट भाव घेऊन वावरणारे विक्रेते ग्राहकांना आवडत नाहीत. अशांकडे कितीही चांगली उत्पादने, सेवा असू द्या, ग्राहक हळूहळू कमी होत जातो. ग्राहकाला पर्याय शोधायला भाग न पाडणे महत्वाचे असते, आणि यासाठी विक्रेत्याचा स्वभाव चांगला असणे महत्वाचे असते. ग्राहकांशी चांगली वागणूक तुमच्या व्यवसायाला दुपटीने नक्कीच वाढवू शकते.
ग्राहकांशी बोलताना चेहऱ्यावर नेहमी हलकेसे स्मित ठेवावे. बोलण्यात कुठेही कडवटपणा नसावा, तुटकपणा नसावा. ग्राहकांशी बोलताना आपलेपणा वाटायला हवा. बार्गेनिंग करताना चेहऱ्यावर त्रासदायक भाव नसावेत. या लहानश्या कृती आपल्या व्यवसायाला नक्कीच चांगला फायदा मिळवून देतात. नफा कमी जास्त होईल, विक्री कमी जास्त होईल, पण ग्राहक कायमस्वरूपी असतो, आणि तो कायमस्वरूपी आपल्याकडेच राहावा यासाठी आपली वागण्याची पद्धत त्याला आवडेल अशी असावी लागते.
प्रत्येक व्यावसायिकाने ग्राहकांशी संबंध येतील असे सर्व कर्मचारी संभाषणकौशल्यामध्ये पारंगत करावेत, आणि स्वतःही शिकून घ्यावेत.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा..
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Very nice information