यशाचे सूत्र (५)… न्यूनगंड बाळगू नका


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

यशाच्या मार्गात सर्वात जास्त आडवी येणारी गोष्ट आहे न्यूनगंड. स्वतःविषयीचा अविश्वास आपल्याला कोणतंच काम करू देत नाही.

व्यवसाय सुरु करावा तर मार्केटमध्ये विक्रीचा न्यूनगंड, ग्राहकांशी बोलण्याचा न्यूनगंड, अनोळखी लोकांना कसं भेटावं याचा न्यूनगंड, कुठे एखादी डील करायची आहे तर चर्चेत पराभव होईल याचा न्यूनगंड, लोक काय म्हणतील याचा न्यूनगंड, आपल्याला हे काम जमणारच नाही असा उरफाटा आत्मविश्वास, मी समोरच्यापेक्षा कुठेतरी कमी आहे अशी मानसिकता, मी यशस्वी होऊ शकत नाही असे सतत डोक्यात येणारे विचार… अशाने आपण स्वतःलाच संपवत असतो… यशस्वी होण्यासाठी जे मुख्य काम आवश्यक आहे आपण नेमकं त्याच्या उलटं करत असतो.

न्यूनगंड या यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. आपल्या व्यावसायिक आयुष्याची सुरुवातच या न्यूनगंडवर मात करून करायची असते. न्यूनगंडाचं ओझं मानगुटीवर लादून आपण पुढे जाऊ शकत नाही. हे ओझं जमेल तेवढ्या लवकर फेकून द्या. इतरांपेक्षा आपण कुठेही कमी नाही हे लक्षात घ्या.

पण, एक महत्वाचं… न्यूनगंड बाजूला सरताना बऱ्याचदा स्वभावात उर्मटपणा येण्याची शक्यता असते. हा उर्मटपणा सुद्धा व्यवसायाला घातकच असतो. स्वभावातील हे परिवर्तन म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात पाडल्यासारखेच आहे. त्यामुळे जरा सांभाळून…

स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर ताबा सुद्धा ठेवा. न्यूनगंडाचं जोखड फेकून द्या.

व्यवसाय साक्षर व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “यशाचे सूत्र (५)… न्यूनगंड बाळगू नका

  1. VERY SINCERELY THANKFUL TO YOU SIR .FOR YOUR VALUABLE LESSON LEARNED OVER THE FB PAGE.. IDEA FOR BUSINESS ARE REALLY IMPRESSIVE AND MOTIVATIONAL.. THE BASIC THEME OF YOURS VERY NICE, I LIKE SO MUCH..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!