यशाचे सूत्र (६)… ग्राहकाचा अहंकार जोपासा


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

प्रत्येक व्यक्ती हा अहंकारी असतोच. काहींचा अहंकार सारखा उफाळून येतो, काहीजण त्यावर नियंत्रण मिळवतात. पण बरेच जण हा अहंकार बाळगतातच. ग्राहकांमधे तर हा अहंकार असतोच. ते आपल्याकडे येतानाच एक अहंकार घेऊन आलेले असतात. मी पैसा देतोय म्हणजे मी श्रेष्ठ आहे हि मानसिकता असतेच. अशावेळी त्यांचा अहंकार जोपासणे हे व्यावसायिक म्हणून आपले कर्तव्य ठरते. उगाच आपला अहंकार उफाळू द्यायचा नाही, संयम बाळगणे आणि ग्राहकाला मोठेपण देणे कधीही चांगलेच असते.

बऱ्याच शॉप्स मधे ग्राहकाकडे पाहून हि वस्तू महाग आहे, स्वस्त दाखवू का? असा प्रश्न विचारला जातो. किमतीनुसार वस्तूंचे सेटअप असतात, किंवा ग्राहकाला ‘तुम्हाला परवडणार नाही’ अशा अर्थाची वाक्य वापरली जातात. काही ठिकाणी ग्राहक जास्त वेळ थांबलेला असेल तर काही घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर जास्त वेळ थांबू नका असे म्हंटले जाते. आपल्या अशा कृत्यांमुळे ग्राहकाचा अहंकार दुखावला जातो. कित्येक वेळा रागाच्या भरात तो महागडी खरेदी करेलही पण तो पुन्हा तुमच्याकडे येणार नाही. काहीवेळा ग्राहकाच्या मातांना खूप तीव्रतेने विरोध केला जातो, तो कसा चुकीचा आहे हे त्यालाच पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो, मोठ्या आवाजात, आसपासच्या लोकांना ऐकू जाईल अशा आवाजात मुद्दामून ग्राहकच ज्ञान कसं कमी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो… या सगळ्या गोष्टी ग्राहकाचा अपमान करणाऱ्या आहे. जिथे आपला अपमान होतो तिथे आपण जातंच नसतो. साहजिकच ग्राहकही जाणार नाही.

त्यामुळे उगाच तात्पुरती विक्री वाढवण्यासाठी, ग्राहकाने जास्त टाईमपास करू नये म्हणून, किंवा आपल्याला ग्राहकच मत पटत नाही म्हणून, ग्राहकाचा अहंकार दुखावू नका. ग्राहक राजा असतो, त्याला राजाप्रमाणेच वागणूक द्या. त्याची प्रत्येक कृती योग्यच आहे अशा प्रकारे आपले वर्तन ठेवा, त्याला प्रतिसाद द्या. चेहऱ्यावर हलकेसे स्मित ठेऊन चार शब्द चांगले बोलणे काही अवघड नसते. अगदी एखादी ग्राहकाला न आवडणारी गोष्ट सुद्धा ग्राहक सहज ऐकून जातो. यामुळे ग्राहकाचा अहंकार दुखावत नाही, आणि तुमचही काम सोपं होतं.

ग्राहकाचा अहंकार जोपासा आणि स्वतःच्या अहंकाराला आवर घाला… हि छोटीशी कृती आपल्याला कितीतरी मोठा फायदा करून देऊ शकते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


2 thoughts on “यशाचे सूत्र (६)… ग्राहकाचा अहंकार जोपासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!