‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
रे क्रॉक… मॅक्डोनाल्ड्स च्या यशाचे शिल्पकार…
क्रॉक यांच्या मते मॅक्डोनाल्ड्सच्या व्यवसायाचा गाभा स्वच्छता, गुणवत्ता आणि मूल्य हे तीन तत्व आहेत.
ग्राहकांना आपल्या शॉप मध्ये आल्यावर स्वच्छता दिसली पाहिजे, ग्राहकांना आपण अत्युच्च दर्जाची गुणवत्ता दिली पाहिजे, आणि ग्राहकांना त्यांनी मोजलेल्या पैशाचा समाधानकारक परतावा मिळाला पाहिजे.
क्रॉक फ्रॅंचाईजींच्या स्वच्छतेच्या नियमाबाबत अतिशय कडक होते. एखाद्या फ्रॅंचाईजी कडे गेले आणि समोर कुठे कचरा पडलेला दिसला कि ते स्वतःहून तो कचरा उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकत. कधीकधी शॉप स्वच्छ करायची मोहिमाच हाती घेत. त्यांनी त्यांच्या काही सर्वात जास्त चालणाऱ्या फ्रॅंचाईजी फक्त स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसल्यामुळे बंद केल्या होत्या.
गुणवत्तेच्या बाबतीत मॅक्डोनाल्ड्स ने आजतागायत तडजोड केलेली नाही. दर्जा / गुणवत्ता हाच व्यवसायाचा मुख्य पाया आहे असे क्रॉक यांचे मत होते. त्यामुळेच ते गुणवत्तेच्या बाबतीत बिलकुल तडजोड करत नसत. ज्या फ्रँचाइजींनी नफा वाढविण्यासाठी गुणवत्तेत तडजोड करायचा प्रयत्न केला त्या फ्रॅंचाईजी बंद करायला सुद्धा कंपनीने कमी केले नाही.
तिसरे महत्वाचे तत्व होते, मूल्य. ग्राहकांनी मोजलेल्या पैशाचा त्यांना पुरेपूर परतावा मिळाला पाहिजे, ग्राहकांनाही ते जाणवलं पाहिजे. यामुळेच मॅक्डोनाल्ड्स च्या बर्गर चे दर अतिशय कमी होते. हे दर वाढवावेत यासाठी क्रॉक यांच्यावर फ्रॅंचाईजी होल्डर्स कडून, गुंतवणूकदारांकडून आणि सहकाऱ्यांकडूनही प्रचंड दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असे, पण क्रॉक या दबावाला कधीही बळी पडले नाहीत. कंपनीचा नफा वाढवण्यासाठी इतर मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पण बर्गरची किंमत कधी प्रमाणाबाहेर वाढवली नाही. खरं तर ती किंमत जास्त असती तरी ग्राहकांनी बर्गर साठी रांगा लावल्याचं असत्या, पण त्यांना त्यांच्या पैशाचा पुरेसा परतावा नसता मिळाला असं क्रॉक यांचं मत होतं…
क्रॉक यांनी आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. याचाच परिणाम मॅक्डोनाल्ड हि आज जगातील सर्वात मोठी रेस्टॉरंट चैन कंपनी आहे.
तत्वांशी एकनिष्ठ रहा. थोड्याश्या फायद्यासाठी गुणवत्ता, सेवा, स्वच्छता, मूल्य यात कधीही तडजोड करू नका.
व्यवसाय साक्षर व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
आव्हाड सर कृपया मार्केटिंगधील संपूर्ण माहिती असणारी एखादी पुस्तक आहे का मराठी मध्ये ज्यामध्ये व्यक्तिमत्व संभाषण कौशल्य आणि संधी याविषयी सम्पूर्ण माहिती आहे
कोणताही एक पुस्तक निश्चित सांगणे शक्य नाही. जमतील तेवढी पुस्तके वाचणे कधीही चांगले. प्रत्येकातून थोडी थोडी कामाची माहिती मिळून चांगला ज्ञानसंग्रह तयार होतो