सूत्र यशाचे (७)… प्रस्थापित स्पर्धकांना घाबरू नका


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

नवीन व्यवसाय सुरु करताना बऱ्याचदा प्रस्थापित प्रतिस्पर्धी व्यवसायांचे आल्यावर दडपण येत असते. अगदी कित्येक वर्षे व्यवसायात असणारेही प्रथापित व्यवसायांच्या दडपणात असतात. यामुळे आपल्या व्यवसायाला मोठ्या व्यासपीठावर बघण्याची कितिकांची हिम्मतच होत नाही. काही नवउद्योजक सुरुवातीलाच प्रस्थापित स्पर्धकांचे इतके दडपण घेतात कि व्यवसायाची सुरुवात होते-न-होते तोच गुडघे टेकतात. कित्येक अनुभवी व्यावसायिक सुद्धा प्रस्थापितांसमोर आपला निभाव लागेल कि नाही या शंकेने मोठी उडी घेण्याला घाबरतात, मोठे निर्णय घ्यायला कचरतात, आणि आहे तिथेच राहण्यात समाधान मानतात, पण ते समाधान सुद्धा बळजबरीच असतं.

पण खरं तर या प्रथापित स्पर्धकांना घाबरायची गरज नसते. प्रत्येक जण मार्केटमधे आपली जागा निर्माण करत असतो. या प्रथापितांनीही कधी-ना-कधी आपली सुरुवात शून्यापासूनच केलेली असते. त्यांनीही आपल्यासाठी एखादी लहानशी जागा शोधलेली असते. जसं एखाद्या सामानाने गच्च भरलेल्या खोलीमधे टाचणी ठेवायला जागा मिळते अगदी तसंच. व्यवसायानं नवीन असो वा जुना प्रत्येकाने आपली जागा शोधायची असते आणि तिथे बस्तान बसवायचे असते. सुरुवातीच्या काळात या प्रथापितांच्या नजरेत तुम्ही कुणीच नसता, अदखलपात्र असता. ते तुम्हाला मोजतही नसतात. त्यामुळे ते तुमच्याशी स्पर्धा करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि ज्यावेळी तुम्ही त्यांच्या तोडीसतोड होतात त्यावेळी तुम्हाला त्यांच्याशी स्पर्धा करताना दडपणच येत नाही. आणि ते सुद्धा त्यावेळी तुमचा उचित सन्मान करतात.

प्रथापित स्पर्धकांना घाबरून आपण पुढे जाऊ शकत नाही. कोणतेही क्षेत्र असो, तिथे प्रस्थापित स्पर्धक असतातच. त्यांना घाबरून जर माघार घेतली तर मार्गच बंद होऊन जातील. कारण ते चहूकडे आहेत, कुणाकुणासमोर आपण माघार घेणार? त्यामुळे प्रथापित स्पर्धकांना घाबरू नका. आपल्यातली क्षमता ओळखा, आपल्यसाठो योग्य क्षेत्र शोधा, त्यात आपला मार्ग तयार करा, आणि त्यावर खंबीरपणे वाटचाल करा.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


2 thoughts on “सूत्र यशाचे (७)… प्रस्थापित स्पर्धकांना घाबरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!