सूत्र यशाचे (१०)… परिस्थितिनुरुप लवचिक धोरण अवलंबवा, दूरचा विचार करा


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत जे एका ट्रॅक्टर कंपनीच्या शोरूम चे मॅनेजर आहेत. त्यांची विक्रीची पद्धत खूप आक्रमक आहे. कित्येक वेळा त्यांनी ट्रॅक्टर त्यांच्या खरेदी किमतीपेक्षा दहा वीस हजारांनी स्वस्त दिलेले आहेत. याने शोरूम ला तोटा होतोच. पण शोरूम मालकाची काही तक्रार नसते. कारण ते त्याच ठिकाणी हा डिस्काउंट देतात त्या ठिकाणी त्यांना पाय रोवायचे असताता. आणि हे डिस्काउंट अशा ग्राहकाला दिले जातात ज्याच्याकडे पाहून किमान दहा वीस ग्राहक आपोआपच त्यांच्याकडे येणार असतात. एक लहानस नुकसान सोसून ते किमान दहा वीस ग्राहक सहज जोडतात. याचा परिणाम ते शोरूम सर्वात जास्त ट्रॅक्टर विक्रीमध्ये दरवर्षी अग्रेसर राहतं. ते त्या परिस्थितीमध्ये ग्राहक जोडण्यासाठी जे योग्य आहे ते करतात, तात्पुरतं नुकसान न पाहता पुढच्या फायद्याचा विचार करतात, आणि तो फायदा मिळवतातच.

हि पद्धत बरेच जण वापरतात. ज्यांना सेल्सच खरं गमक कळलेलं असतं त्यांना यामधे विशेष काही वाटत नाही. पण नवख्यांना हि पद्धत सांगितली तर ते आपल्यालाच वेड्यात काढतात. कारण त्यांचा नफ्याचा हिशोब प्रत्येक प्रोडक्ट नुसार चालतो. एकूण विक्रीवर नाही. ज्याला आपण नुकसान म्हणतो ती प्रत्यक्षात त्यांनी ग्राहक वाढवण्यासाठी केलेली गुंतवणूक असते याकडे लक्ष दिले जात नाही.

एका व्यवहारात नुकसान, दुसऱ्या व्यवहारात थोडा फायदा, तिसऱ्या व्यवहारात चांगला फायदा, चौथ्या व्यवहारात ना नफा ना तोटा, पाचव्या व्यवहारात पहिल्या नुकणीच्या बदल्यात थोडा फायदा असणारे पण भरपूर ग्राहक, सातव्या व्यवहारात थोडा फायदा असणारे थोडेफार ग्राहक, आठव्या व्यवहारात पुन्हा थोडे नुकसान, नवव्या व्यवहारात चांगला नफा देणारे काही ग्राहक, दहाव्या व्यवहारात पुन्हा थोडस किंवा थोडं जास्त नुकसान… सगळे व्यवहार मिळून एकत्रीतरित्या बऱ्यापैकी किंवा चांगल्यापैकी नफा… एकत्रितरित्या हिशोब करणारे नेहमीच पुढे जातात. कारण त्यांना खेळत्या भांडवलाचा फायदा चांगला कळलेला असतो. पैसा फिरला पाहिजे. प्रत्येकवेळी मनासारखा नफा मिळणार नाही, पण दरवेळी काहीतरी रोटेशन होणार आहे, आणि हेच रोटेशन व्यवसायाच्या संधी वाढवणार आहे हे त्यांना माहित असते.

सेल्स मधे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातील हि एक, पण एकमात्र नाही. पण अशा विविध गोष्टींच्या अनुभवातूनच आपण योग्य विक्रेते बनू शकतो. लवचिक असणे हा विक्रीकौशल्यासाठी आवश्यक गुण आहे. समोर आलेल्या परिस्थितीला आपलेसे करण्यासाठी त्यावेळी जे योग्य वाटेल ते करणे आवश्यक असते. रेट फिक्स असावा, बार्गेनिंग नसावी या गोष्टी मान्य आहेत. पण हे प्रत्येकवेळी लागू पडत नाही. ८०% व्यवसायात तर नाहीच नाही. तिथे परिस्थितीनुसारच आपल्या धोरणात बदल करावे लागतात.

इथे दोन मुद्दे सांगण्याचा प्रयत्न आहे. पहिला म्हणजे नफ्या तोट्याचा हिशोब कसा करावा, हा; आणि दुसरा म्हणजे परिस्थितिनुरुप लवचिक धोरण अवलंबणे, हा…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!