मार्केटचा कल, मार्केटची गरज याचा अंदाज घेता आला पाहिजे.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

640kb पेक्षा जास्त जागेची गरज पर्सनल कॉम्पुटर ला कधीच भासणार नाही असं बिल गेट्स यांचं मत होतं. 
बिसलेरी चा प्रोजेक्ट भारतासारख्या मार्केटमधे कधीच यशस्वी होऊ शकणार नाही असं कंपनीच्या संस्थापकांच्या सर्व मित्रांचं, सहकाऱ्यांच मत होतं. 
ईकॉमर्स कंपन्या भारतीय मार्केटमधे यशस्वी होऊ शकत नाहीत असं मत इथे जवळजवळ प्रत्येकाचंच होतं.

आपण आजच्या परिस्थितीवर उद्याचे आडाखे बांधू शकत नाही. उद्या अपेक्षेपेक्षा वेगळा असू शकतो याचा अंदाज आधीच असायला हवा. वर्ष दोन वर्षातच बिल गेट्स यांना त्यांचेच मत बदलायला ग्राहकांनी भाग पाडले. बिल गेट्स यांना माउस ची सुद्धा गरज वाटत नव्हती. तेही मत त्यांना काही काळातच बदलावे लागले.
आज देशभरात बॉटल वॉटर म्हणजे बिसलेरी असंच समजलं जातं.
ईकॉमर्स कंपन्यांनी देशभरात केलेला विस्तार आपल्या डोळ्यासमोर आहे. अमेझॉन ने तर होम ग्राउंड वर २५-२६ वर्षांपूर्वी सुरुवात केलेली आहे.

बिसलेरी, अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांनी मार्केटमधे जिथे कणभरही संधी दिसत नव्हती तिथे पाय घट्ट रोवले आहेत. यांनी लोकांना सवयी लावल्या. आपल्या प्रोडक्ट सर्व्हिस चा विचार करायला भाग पाडलं. आणि मुख्य म्हणजे आजच्यापेक्षा भविष्यात भविष्यात कशाची गरज असेल याचा त्यांनी विचार केला.

महत्वाचे म्हणजे आपल्याला वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. पुढे कशाला संधी असतील आपण फक्त अंदाज बंधू शकतो. आणि या संधी कित्येक क्षेत्रात असू शकतात. या अंदाजातूनच आपल्याला प्रयोग करावे लागतात. याच प्रयोगातून काही प्रयोग यशस्वी ठरतात. एकाच प्रयत्नावर थांबणे व्यावसायिक आत्महत्या ठरू शकते

आपल्या आसपास असे बरेच व्यवसाय सापडतील जे चालू शकत नाहीत असा सामान्य अंदाज व्यक्त केला गेला पण त्यांनी भरपूर यश मिळवलंय. आपण इथे फक्त एवढंच म्हणून शकतो कि मार्केटचा कल, मार्केटची गरज ओळखण्यात ते आपल्यापेक्षा सरस ठरले. हि गरज ओळखूनच आपल्याला व्यवसाय करावा लागतो. ज्याला ती गरज जाणवते, किंवा ती गरज निर्माण कण्याचे ज्याच्याकडे स्किल आहे, किंवा भविष्यात ती गरज निर्माण होऊ शकते असं ज्याला वाटत तो तिथे वरचढ होतो आणि सगळ्यांचे आडाखे चुकीचे ठरवतो.

म्हणून, मेनूकार्ड पाहून ऑर्डर दिल्यासारखे व्यवसायांची यादी पाहून व्यवसाय निवडू नका. एकंच व्यवसाय दोन वेगवगेळ्या ठिकाणी अतिशय उपयोगी किंवा पूर्णपणे बिनकामाचा असू शकतो.
मार्केटची गरज ओळखा. मार्केटचा कल ओळखा. कित्येक व्यवसायांच्या संधी समोर उभ्या असलेल्या दिसतील.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!