ग्राहकांशी असलेले वाद सामोपचाराने सोडवा. ग्राहकांना एक बाजू निवडायची संधी देऊ नका.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

तुम्ही ग्राहकांच्या घोळक्यात आहात, त्यात एखादा ग्राहक तुमच्याशी वाद घालतोय. त्या वादामुळे बाकीचे ग्राहक गोंधळून जातात. अशावेळी त्या ग्राहकाशी वाद वाढणार नाहीत यासाठी प्रयत्न करायचा असतो. जर बाकीचे ग्राहक आपल्याविषयी नकारात्मक विचार करतील अशा विचाराने तुम्ही आपली बाजू योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी आणखी आक्रमक झालात तर बाकीच्या ग्राहकांना कुणाची तरी एक बाजू योग्य आणि दुसऱ्याची अयोग्य अशा निष्कर्षापर्यंत येणे भाग असते. आणि अर्थातच ते ग्राहकाचीच बाजू निवडण्याची शक्यता जास्त असते. कारण अशावेळी ते आणि तुम्ही अशी विभागणी होत असते.

त्यामुळे ग्राहकांसमोर कोणत्याही प्रकारचे वाद निर्माण होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील रहा. वादविवादात विनाअट थेट माघार घ्यायला सुद्धा कमी करू नका. त्या क्षणाला बाकीच्या ग्राहकांसाठी तो वाद पूर्णपणे थांबलेला असला पाहिजे. ग्राहकांना योग्य अयोग्यतेच्या निष्कर्षापर्यंत येण्याची वेळ येऊ देऊ नका. कालांतराने एकांतातात पुन्हा काय करायचं करा.

  • ग्राहकाशी होणाऱ्या वादविवादात चेहरा नेहमी हसरा ठेवा. चेहऱ्यावर त्रासदायक भाव येऊ देऊ नका
  • शक्यतो माघार घेण्याला प्राधान्य द्या. माघार घेण्याने आपण लहान होत नाही.
  • ग्राहकांना आपल्याला चुकीचे ठरवलेले आवडत नाही. त्यामुळे ग्राहकाची बाजू चुकीची आहे हे सांगतानासुद्धा ग्राहकाला अपमानास्पद वाटणार नाही याची दक्षता घ्या.
  • तक्रार करणे हा ग्राहकाचा मूलभूत हक्क आहे, त्या तक्रारीला समाधानकारक प्रतिसाद देणे हे आपले कर्तव्य आहे हे लक्षात घेऊन काम करा.
  • हजारात एखादा ग्राहक विक्षिप्त असतो, पण त्यालाही हाताळताना संयमाने हाताळा. तो विक्षिप्त असला तरी इतरांकडे तुमचा नकारत्मक प्रचार करूच शकतो, आणि तुमचा ब्रँड खराब करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
  • ग्राहकाची एखादी अपेक्षा पूर्ण करणे अशक्य असल्यास शांत भाषेत समजावून सांगा
  • ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करताना काही वेळेस नफ्यात थोडेसे नुकसान होऊ शकते, ते सहन करा. प्रत्यक्षात नुकसान होणार नाही याची मात्र काळजी घ्या.
  • ग्राहक चिडचिड करत असतानाही तुमच्या चेहऱ्यावर शांत भाव आणि स्मितहास्य असेल, तर त्याचा राग आपोआपच कमी होऊन जातो. आणि जर त्याची बाजू चुकीची असेल तर पूर्णपणे माघार घेतो. पण माघार घेतानाही आपला मानसन्मान तो टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून काही काळ आक्रमक धोरण अवलंबवतो.
  • कित्येक वेळा ग्राहकांना त्यांची बाजू चुकीची आहे हे माहित असते, पण त्यांचा काही कारणाने इगो दुखावलेला असतो, तो शांत होईपर्यंत ते शांत होत नाहीत, अशावेळी माघार घेऊन त्यांच्या इगो ला कुरवाळणे कधीही उत्तम.
  • वादविवादात तुम्ही घेतलेली पडती भूमिका ग्राहकाला तुमच्याविषयी सकारात्मक बनवते. किमान ते बाहेर तुमच्याविषयी वाईट बोलणार नाहीत याची खात्री असते.

एका वाक्यात सारांश म्हटलं तर, ग्राहकांशी वाद सामंजस्याने मिटविण्याला प्राधान्य द्या, प्रसंगी विनाअट माघार घ्यायलाही कमी करू नका.

माघार घेऊन वाद जागेवर थांबवल्याने ग्राहक तुमच्याबद्दल आणखी सकारात्मक होतात. कारण त्यातून तुमची ग्राहकांप्रती आदराची भावना दिसते. एखाद्या ग्राहकाला तुम्ही दिलेला आदर बाकीच्या ग्राहकांनासुद्धा आपलाच आदर वाटत असतो. त्यांना विरोधात उभा करण्याच्या भानगडीत पडू नका.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!