‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
WhatsApp ने आपल्या Business App मधे केलेले बदल व्यावसायिकांसाठी चांगलेच उपयुक्त आहेत.
आपल्या नेहमीच्या WhatsApp App पेक्षा WhatsApp Business App मधे व्यावसायिकांसाठी उपयुक्त अशा बऱ्याच गोष्टी आहेत.
१. Automatic Reply
तुम्हाला कुणी मेसेज पाठवल्यावर लगेच त्यांना ऑटोमॅटिक रिप्लाय जातो. (हि सेटिंग चालू ठेवायची कि नाही हे तुम्ही ठरवू शकता.)
२. Greeting Message
एखाद्या ग्राहकाने तुम्हाला पहिल्यांदाच मेसेज केलाय, पण पुन्हा १४ दिवस काहीच मेसेज आला नाही तर आपोआप त्यांना Greeting Message जातो. (सेटिंग चालू ठेवायची कि नाही हे तुम्ही ठरवू शकता.)
३. Away Message
तुम्ही उपलब्ध नसाल त्यावेळी मेसेजकर्त्याला आपोआप तसा मेसेज जातो. (सेटिंग चालू ठेवायची कि नाही हे तुम्ही ठरवू शकता.)
४. Business Profile
तुम्ही तुमचे व्यावसायिक प्रोफाइल सविस्तर अपलोड करू शकता. यात तुमच्या व्यवसायाची माहिती, व्यवसायाचा पूर्ण पत्ता जो गुगल मॅप वर पाहता येईल, व्यवसायाची कॅटेगरी, थोडक्यात माहिती, ईमेल, वेबसाईट इत्यादी माहिती अपलोड करू शकता. म्हणजे ग्राहक तुमच्या प्रोफाइल वर जाऊन तुमच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेऊ शकतो.
५. Chat Link, Short Link
तुम्हाला मेसेज करणे सोपे जावे, यासाठी Chat Link तयार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, यात तुम्ही डिफॉल्ट मेसेज सेट करू शकता.
६. Labels
तुम्ही ग्राहकांना म्हणजेच चॅट अकाउंट ला किंवा नंबर ला लेबल लावू शकता. यामधे New Customer, New Order, Pending Payment, Paid, Order Complete असे पाच लेबल आहेत, तसेच तुम्हाला हवे असलेले इतरही लेबल तयार करू शकता. हे सर्व लेबल अकाउंट्स तुम्ही ऑप्शन सेक्शन मधे जाऊन लेबल ऑप्शन मधे पाहू शकता. हि खूप चांगली सोय आहे.
७. Catalogue
सर्वात महत्वाचं ऑप्शन आहे ते म्हणजे कॅटलॉग. हे अतिशय उपयोगी ऑप्शन आहे. तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही तुमचे प्रोडक्ट अपलोड करू शकता. तुमच्या प्रोडक्ट चा, सर्व्हिसेस चा कॅटलॉग बनवू शकता. हे प्रोडक्ट तुमच्या कॉन्टॅक्ट मधे, किंवा ग्रुप मध्ये शेर करू शकता. इच्छुक ज्यावेळी तुमच्या प्रोडक्ट वर क्लिक करतील तेव्हा ते थेट तुमच्या प्रोडक्ट वर जातील, तसेच तिथे मेसेज ऑप्शन उपलब्ध असतो, ज्यामुळे ते थेट तुम्हाला मेसेज करू शकतील. तसेच तुमचे इतर प्रोडक्ट, सर्व्हिस सुद्धा पाहू शकतील. नुसत्या इमेजेस पेक्षा अशा लिस्टेड प्रोडक्ट ला जास्त views मिळतात.
मागील काही वर्षात WhatsApp Business मुले व्यावसायिकांना आपले प्रोडक्टस ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी चांगली मदत झाली आहे. पण अजूनही याला अपेक्षित प्रतिसाद मिळालाय, किंवा यातील सर्व सेवांचा वापर केला जातोय असे होत नाहीये. लेबल आणि कॅटलॉग या सेवा तर अतिशय उपयुक्त आहेत. कुणी प्रोडक्ट किंवा सेवांची ची माहिती मागितली तर WhatsApp अकाउंट वर जाऊन कॅटलॉग पहा म्हणू शकता इतकं हे उपयोगी आहे, आणि ग्राहकांसाठी सोपं आहे. आणि व्यवसायाचा महत्वाचा नियम हाच आहे, ग्राहकांना तुमच्यापर्यंत पोचणे जेवढे सोपे करता येईल तेवढे करा.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Hi