‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
आपल्या सेल्स टीम कडून बऱ्याचदा ‘अपेक्षित विक्री का होत नाही?’ या प्रश्नाला ‘आपले रेट जास्त आहेत’ असेच उत्तर दिले जाते. प्रत्येक वेळी, ‘आपल्या प्रोडक्ट चे दर जास्त असल्यामुळे आम्हाला विकायला अवघड जात आहे’ हेच कारण आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जातो.
कित्येक सेल्स प्रतिनिधींना आपले प्रोडक्ट मोठ्या ब्रँड चे असेल तरच विकले जाऊ शकते असाही मोठा भ्रम असतो. भ्रम म्हणण्यापेक्षा मार्केटिंग सेल्स करण्याचा कंटाळा असतो. कंपनीचा ब्रँड मोठा असेल तर आपण फक्त काउंटर ला भेटी द्यायच्या, सेल आपोआप होईल अशी धारणा असते. अशावेळी मग ते आपला अजून ब्रँड झालेला नाही असेही कारण देतात. काही वेळा आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांकडे जास्त चांगली टीम आहे, त्यांच्याकडे जास्त माणसे आहेत, आपल्याकडे प्रोडक्ट रेंज कमी आहे, त्यांचे रिझल्ट जास्त चांगले आहेत, अशीही करणे दिली जातात. पण विक्री प्रतिनिधींची कार्यपद्धती पाहता एकूणच आपले रेट जास्त आहेत, आपला ब्रँड नाही या दोन कारणांना प्राधान्य दिले जाते हे लक्षात येते.
सेल्स टीम ला कधीही आमच्याकडून प्रयत्न होत नाहीयेत हे मान्य करायचे नसते. कारण ते मान्य केलं तर नोकरी जाऊ शकते किंवा पगार तरी कापला जाऊ शकतो अशी भीती असते. त्यामुळेच आपल्या प्रोडक्ट मधेच काहीतरी कमी आहे, आणि त्यामुळेच विक्री अपेक्षेप्रमाणे होत नाहीये हे सांगण्याकडे कल असतो.
समजा, यांचं ऐकून आपण उद्या रेट कमी जरी केले तर दोन महिन्यात पुन्हा तेच रडगाणं सुरु होणार असतं. त्यामुळे सेल्स टीम च्या विक्री न होण्याच्या प्रत्येक कारणाला कधीही गांभीर्याने घेऊ नका.
आपल्या प्रोडक्ट चे रेट कमी करण्यासाठी आपल्या सेल्स टीम कडून नेहमीच दबाव निर्माण केला जातो, पण या दबावाला कधीही बळी पडू नका. जॉईन झाला त्यावेळी जे रेट होते तेच आहेत किंवा त्याच प्रमाणात आहेत, त्यावेळी जे योग्य वाटत होत ते आता अयोग्य असू शकत नाही हे विक्री प्रतिनिधींना ठणकावून सांगा. आपल्या प्रोडक्ट चे रेट ठरवताना त्यासंबंधी योग्य अभ्यास करूनच ठरवावेत, विक्री प्रतिनिधींचे काम विकण्याचे असते, आपल्या प्रोडक्ट चे रेट कमी करण्याचे नाही. रेट मार्केटला योग्य वाटतात कि अयोग्य हे ठरवण्याचे किंवा त्याचा सर्व्हे करण्याचे काम उद्योजकाचे आहे, किंवा त्याच्या मॅनेजमेंट टीम चे आहे.
सेल्स टीम च्या प्रत्येक म्हणण्याला पाठिंबा कधी द्यायचा नसतो. आपली स्वतःची निरीक्षणशक्ती, निर्णयशक्तीच कामाला लावायची असते.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील