प्रतिस्पर्ध्यावर टिका करण्यापेक्षा आपल्या प्रोडक्ट ची खासीयत सांगा


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

तुमचं प्रोडक्ट किती चांगलं आहे यापेक्षा तुमच्या प्रतिस्पर्ध्याचं प्रोडक्ट किती खराब आहे हे सांगुन तुम्हाला कायमस्वरुपी ग्राहक कधीही मिळू शकत नाही. तुमच्या प्रचारामुळे अपलं सध्याचं प्रोडक्ट खराब आहे असं ग्राहकाला वाटुन तो तुमच्याकडे वळेलही पण तो सध्याचं प्रोडक्ट खराब आहे म्हणुन तुमच्याकडे आलेला असतो तुमचं प्रोडक्ट चांगलं आहे म्हणुन नव्हे. अशावेळी तो सतत तुमच्या प्रेडक्ट ची तुलना त्यांच्या पुर्वीच्या प्रोडक्टशी करतील आणि एका कालावधीनंतर त्यांचं पुर्वीचं प्रोडक्ट आणि तुमचं प्रोडक्ट यात काहीच फरक नसल्याचे त्यांच्या लक्षात येईल… अशावेळी तो सहाजीकच त्याच्या पुर्वीच्या ब्रँड कडे वळण्याचीच शक्यता जास्त असते.

प्रतिस्पर्ध्यावर प्रहार करुन तुमचा व्यवसाय वेगाने वर जाउ शकतो पण ग्राहकाला सत्यपरिस्थिती लक्षात आल्यानंतर जेवढ्या वेगाने तुमची प्रगती झालेली आहे त्याच्या दुप्पट वेगाने तो प्रगतीचा आलेख खाली येतो…

याचवेळी तुमचे तुमचे प्रोडक्ट किती चांगले आहे हे सांगुन आणि प्रत्यक्ष ते प्रोडक्ट तशा क्वालिटीचे बनवुन ग्राहकांपर्यंत गेलात तर सुरुवातीची वाढ धिमी असेल पण मिळणारा प्रत्येक ग्राहक हा तुमचा हक्काचा असेल. आणि तो कायमस्वरुपी तुमचाच असणार आहे. थोडक्यात तुमच्या व्यवसायाला दिवसेंदिवस प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी सहाय्यभुत ठरणार आहे.

तुमच्या प्रतिस्पर्ध्याचं प्रोडक्ट किती खराब आहे यापेक्षा तुमचं प्रोडक्ट कसं आहे हे ऐकण्यात ग्राहकाला स्वारस्य असतं

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!