व्यवसाय करायचाय तर मार्केटिंग करावीच लागेल.


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

व्यवसाय करायचा असेल तर मार्केटिंग करावीच लागेल.
जमणारच नाही, तुम्हीच विकून द्या, गिऱ्हाईक शोधून द्या असले प्रकार व्यवसायात चालत नाहीत.

तुमचं प्रोडक्ट, सेवा तुम्हाला तुमच्या अपेक्षित ग्राहकांपर्यंत पोचवावेच लागते. मार्केटिंग आणि सेल्स स्किल शिवाय व्यवसाय होऊ शकत नाही. यासाठी असतील तेवढे मार्ग तुम्ही वापरा. थेट ग्राहकांना भेटा, जाहिराती करा, रिटेल काउंटर असतील तर प्रेत्यक काउंटर ला भेट द्या, ग्राहकांना प्रोडक्ट पटवून द्या, पाठपुरवठा करा, अगदी चौकात उभा राहून मोठ्यानं ओरडून आपले प्रोडक्ट सांगण्याची गरज असेल तर तीही पूर्ण करा. पण कोणत्याही परिस्थितीत आपल्या अपेक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचा आणि आपले प्रोडक्ट विकण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करा.

मार्केटिंग आणि सेल्स व्यवसायाचा श्वास आहेत. याशिवाय व्यवसायाची कल्पना अशक्य आहे. व्यवसाय करायचाय पण मार्केटिंग आणि सेल्स चा त्रास नको म्हणणे म्हणजे जगायचंय पण श्वास घेण्याची झंजट नको असे म्हणण्यासारखेच आहे.

मार्केटिंग शिवाय व्यवसाय म्हणजे श्वासाशिवाय जीवन… दोनीही अशक्य.

व्यावसायिक पार्श्वभूमी नसल्यामुळे आपल्यात विकण्याचा न्यूनगंड असू शकतो, परंतु त्यावर मात करण्यासाठी ज्याचा न्यूनगंड आहे तीच कृती आपल्याला करावी लागणार आहे. त्याला दुसरा पर्याय नाही.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!