लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
व्यवसायाच्या प्रमोशन साठी आपण जाहिराती तयार करतो. मुख्यत्वे डिजिटल माध्यमांवर या जाहिराती आपण पब्लिश करतो. फेसबुक, WhatsApp , इंस्टाग्राम सारख्या माध्यमांवर या जाहिराती जास्त प्रमाणात पब्लिश केल्या जातात. पण बऱ्याचदा त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. बऱ्याच याचे कारण चुकलेली जाहिरातीची डिझाईन आणि कन्टेन्ट हेच असते.
नियम जाहिरातीचे या शीर्षकाखाली आपल्या उद्योजक मित्र पोर्टल वर पब्लिश केलेल्या अल्बम स्लाईड्स मध्ये जाहिरातीसंबंधी बरेच नियम सांगितलेले आहे. पण यासोबतच काही टेक्निकल पॉईंट्स आहेत जे जाहिरात तयार करताना लक्षात घेतले पाहिजेत…
१. सोशल मीडिया माध्यमांचा, वेबसाईट्स चा वापरकर्ता वर्ग मुख्यत्वे मोबाईल वापरतो. ९०% यूजर्स मोबाईलवरच आपली जाहिरात पाहतात.
२. म्हणून मोबाईलवर योग्य दिसेल अशी जाहिरात शक्यतो बनवावी.
३. मोबाईल व्हीव्यू साठी शक्यतो चौकोनी आकाराची जाहिरात कधीही योग्य. किंवा उभी १:१.२५ या प्रमाणात असावी. आयताकृती असेल तर १:१.२५ या प्रमाणात जास्तीत जास्त असावी.
४. आयताकृती जाहिरात मोबाईलवर खूपच लहान दिसते. चौकोनी किंवा उभी आकराची इमेज लगेच लक्ष वाढून घेते.
५. जाहिरात बनवून झाल्यानंतर ती आधी मोबाईल वर कशी दिसते हे तपासून घ्यावे.
६. डेस्कटॉप वर योग्य वाटणारी जाहिरात कधीकधी मोबाईल वर अतिशय खराब दिसते.
७. डेस्कटॉप वर जाहिरातीमधील जे फॉन्ट आपल्या खूप मोठे वाटतात तेच फॉन्ट मोबाईल व्हीव्यू वर अतिशय लहान दिसतात. काहीवेळा वाचताही येत नाहीत.
८. म्हणून आपण बनवलेली जाहिरात इमेज, मोबाईल वर योग्य प्रकारे वाचता येते का हे तपासून घ्यावे.
९. जाहिरातीमधे एखादे हेडिंग मोठ्या अक्षरात असावे. जे स्क्रोल करताना लगेच लक्षात येऊ शकेल.
१०. जाहिरातीमधे गिचमिड करू नका. डेस्कटॉप वर जो मॅटर पुरेसा वाटतो तो बऱ्याचदा मोबाईल व्हीव्यू वर अतिशय गिचमिड झाल्यासारखा वाटू शकतो.
११. डेस्कटॉप आणि मोबाईल वर दिसणाऱ्या रंगात बराच फरक पडतो. त्यामुळे मोबाईल व्हीव्यू वर सुद्धा रंगसंगती तपासून पाहावी.
१२. जाहिरात मुख्यत्वे डेस्कटॉप वर तयार केली जाते. अशावेळी ती मोबाइलवर पाठवताना WhatsApp सारख्या App चा वापर करू नका. हे app इमेज ची क्वालिटी डाऊन करत असतात. म्हणून इमेज इमेल वर घ्यावी, व ईमेल वारू डाउनलोड करावी. किंवा मोबाईल CPU ला कनेक्ट करून इमेज ट्रान्स्फर करून घ्यावी.
१३. फेसबुकवर वेगवेगळ्या ग्रुप्स वर जाहिरात करताना सगळीकडे एकाचवेळी पोस्ट करू नका. एकच व्यक्ती बऱ्याच ग्रुप मध्ये असण्याचे प्रमाण खूप आहे. अशावेळी सगळ्या ग्रुप्स वर एकाच वेळी जाहिरात पोस्ट केली तर अशा यूजर्स ना स्क्रोल करताना एकाखाली एक तुमचीच जाहिरात दिसेल, आणि या जाहिरातीच्या अतिरेकाला कंटाळून ते तुमच्या अकांऊट ला hide all करू शकतात. किंवा तुम्हाला कायमस्वरूपी ब्लॉक करू शकतात.
१४. WhatsApp वर अनोळखी नंबर्स ना मेसेज शक्यतो करू नका. समोरच्या व्यक्तीने जर तुमचा नंबर स्पॅम रिपोर्ट केला, आणि या रिपोर्ट चे प्रमाण वाढले तर तुमचा नंबर WhatsApp कडून ब्लॉक केला जाऊ शकतो. आणि WhatsApp कडून एकदा ब्लॉक झालेला नंबर पुन्हा सुरु झाल्याचे ऐकण्यात नाही.
१५. इंस्टाग्राम वर शक्यतो चौकोनी आकाराच्या जाहिराती असाव्यात.
१६. फेसबुक वर पेड प्रमोशन करणार असाल तर जाहिरातीमधे जास्त कन्टेन्ट ठेऊ नका. इमेज मधे शब्द जास्त नसावेत. माहिती शक्यतो कॅप्शन मधे ठेवावी, इमेज मधे एक दोन ओळीच असाव्यात. यामुळे पेड प्रमोशन यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते.
१७. माध्यम कोणतेही असो; अस्पष्ट, धूसर, खराब क्वालिटीच्या इमेज ला प्रतिसाद मिळत नाही. इमेजमधील शब्द वाचण्यायोग्य असावेत.
१८. प्रत्येक माध्यमाची इमेज दाखवण्याची आपापली पद्धत आहे. त्या पद्धतीचा अभ्यास करून जाहिरात कोणत्या माध्यमासाठी बनवायची आहे त्यानुसार डिझाईन करावी. उदा. फेसबुक, इंस्टाग्राम, WhatsApp, टेलिग्राम वर जाहिरात आपण ज्या साईज मध्ये पोस्ट केली आहे त्यानुसारच दिसते. म्हणजे इथे चौकोनी आकाराची किंवा १:१.२५ या प्रमाणातील आयताकृती अकराची इमेज योग्य आहे. ट्विटर वर, डेस्कटॉप वर इमेज आहे त्या आकारात दिसते पण मोबाईल व्हीव्यू वर ती इमेज आयताकृती आकारात क्रॉप होते. पूर्ण इमेज पाहण्यासाठी त्यावर क्लिक करून इमेज ओपन करावी लागते. म्हणजे मोबाईल व्हीव्यू साठी इमेज शक्यतो आयाताकृतीच योग्य होईल. लिंक्ड इन वर सुद्धा आयताकृती आकाराचीच इमेज योग्य आहे. पण सरासरी मोबाईल चा वाढत चाललेला वापर पाहता ९०% प्रकारात चौकोनी किंवा १:१.२५ या आकारातील आयताकृती इमेज कधीही योग्य.
थोडक्यात कोणत्याही परिस्थिती, जाहिरात इमेज बनवताना मोबाईल वर काय योग्य वाटेल याचा विचार करा.
या आपल्या व्यवसायाच्या जाहिराती बनवण्यासंबंधी काही टेक्निकल आणि प्रॅक्टिकल टिप्स आहेत. या टिप्स मुळे तुमच्या जाहिरातींना प्रतिसाद मिळण्याचे प्रमाण नक्की वाढेल. जर तुमच्या जाहिरातींना प्रतिसाद मिळत नसले तर या टिप्स मधे कुठे आपण कमी पडलोय का ते तपासून पहा आणि तशी सुधारणा करा.
या टिप्स मुख्यत्वे सोशल मीडिया माध्यमांसाठी आहेत हे कृपया लक्षात घ्यावे. वेगवेगळ्या माध्यमांसाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असतात.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील