निर्णयशक्ती (१)… योग्य व त्वरित निर्णय घेण्याचे महत्व


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

इंग्लंडचा प्रसिद्ध सेनापती नेल्सन म्हणाला होता, ‘ज्यावेळी लढायचे की नाही हे मला समजत नाही त्या प्रत्येक वेळी मी लढण्याचा निर्णय घेतो’. आणीबाणीच्या प्रसंगी निश्चित व ठाम निर्णय घेण्याचा श्रेष्ठ गुण नेल्सनकडे होता. म्हणूनच तो जगप्रसिद्ध नाविक सेनापती ठरला.
पहिल्या महायुद्धातील सेनापती लॉर्ड किचनेर यांचेकडेही ठाम आणि जलद निर्णय घेण्याचा व त्यावर त्वरित कृती करण्याचा गुण होता, म्हणूनच तो यशस्वी झाला.

नेपोलियन सुद्धा गहन प्रश्नावर त्वरित निर्णय घेत असे. तो तर महत्त्वाचे निर्णय एका क्षणात करीत असे.

शिवाजी महाराजांकडेही असा त्वरित निर्णय घेण्याचा व कृती करण्याचा गुण होता. उदा. अफजलखानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज विजयोत्सव साजरा करीत बसले नाहीत, त्याच रात्री त्यांनी कोल्हापूरच्या मोहिमेसाठी प्रस्थान केले.

जर्मनीचा फॉन मोल्टके हा गेल्या शतकातला असा महान सेनापती होता. तो म्हणत असे, ‘प्रथम परिस्थितीचा अंदाज घ्या आणि मग लगेच निर्णय घ्या”. त्याने एकदा निर्णय घेतला की तो पक्का असे आणि तो कठोरपणे अमलात येत असे.

सर्व यशस्वी, थोर नेतृत्व आणि महान माणसे यांचेकडे त्वरित निर्णय घेण्याचा गुण असतो. त्याशिवाय ती महान होत नाहीत. जे न डगमगता निर्णय घेतात ते विजयी होतातच. ताबडतोब निर्णय आणि त्वरित कृती यामुळे यश यांच्या पायाशी लोळण घेते.

योग्य निर्णय योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घेतला आला पाहिजे. नेतृत्व कौशल्यासाठी आवश्यक असलेला हा महत्वाचा गुण आहे.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “निर्णयशक्ती (१)… योग्य व त्वरित निर्णय घेण्याचे महत्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!