निर्णयशक्ती (२)… निर्णयाचा फेरविचार नको


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

सर्व महान माणसे एकदा निर्णय घेतात, तो अंतिम असतो. निर्णय घेतल्यावर त्यावर ते फेरविचार करत नाहीत. त्या निर्णयावर त्यांच्या मनाची चलबिचल होत नाही. कृती काय करायची हेही पक्के ठरलेले असते. त्यांचे हे सामर्थ्य पाहून सामान्य माणूस चकित होतो. ही महान माणसे जेव्हा म्हणतात, ‘मी ठरवले आहे’, त्यावेळी त्यांचे भाग्य नक्की ठरते. एकदा निर्णय घेतल्यानंतर ही थोर माणसे त्यावरच्या सर्व हरकती फेटाळतात आणि चर्चा करीत बसत नाहीत.

जो माणूस निश्चयी मनाचा असतो तो ठामपणे ‘होय किंवा नाही’ सांगतो. आणि एकदा जे ठरवले आहे त्याला चिटकून राहतो. म्हणूनच लोकांचा त्याच्यावर विश्वास बसतो आणि तो आयुष्यात यशस्वी होतो. आपल्याला काय हवे आहे हे त्याला चांगले माहीत असते आणि तो चिवटपणे त्या गोष्टीला चिटकून राहतो.

याउलट अस्थिर मनाच्या माणसाला आपल्याला नक्की काय हवे आहे हे समजत नाही. त्याच्या मनात चलबिचल होते आणि निर्णय लांबणीवर टाकणे हेच त्याचे धोरण बनते. त्याच्या या धरसोड वृत्तीमुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास राहत नाही. तो एक काम पुर्ण होण्यापुर्वीच दुसऱ्या कामात हात घालतो. त्यामुळे त्याच्यावर कोणी जबाबदारी टाकत नाही.

जो माणूस प्रगतीसाठी झगडत आहे त्याने जर ठाम निर्णय घेण्याविषयी कीर्ती मिळवली तर त्याचा त्याला फार फायदा होईल. आपल्याला नेमके काय हवे आहे हे त्याला माहीत होईल. खरं म्हणजे त्वरित निर्णय घेण्याचा गुण मिळवता येतो. कोणत्याही उद्योजकासाठी ही मोठी जमेची बाजू असते.

निर्णयक्षम व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…

(निर्णयशक्ती या पुस्तकातील सारांश…)

_

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!