‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
अनेकांना निर्णय घेता न येण्याचा शापच मिळालेला असतो. कारण आपला निर्णय चुकला तर जे नुकसान सोसावे लागेल त्याला त्यांची तयारी नसते. निश्चित निर्णय न घेण्याचे हे एक महत्त्वाचे कारण असते. त्यांना आपल्या अंगाला थोडाही ओरखडा लागू न देता सुखरूप ध्येय गाठायचे असते. त्यांना भाकरी खायची असते व राखूनही ठेवायची असते. मग त्यांना ठाम निर्णय घेता येणे अशक्य होते.
जर्मन कवी गटे म्हणाला होता, ‘या जगात नक्की निर्णय घेऊ न शकणारा माणूस दयनीय ठरतो. त्याचे मन नेहमी हे करू की ते करू असे लंबका सारखे दोन टोकांत फिरत असते. आणि तो शेवटी दोन्ही टोकांपैकी कोणताच निर्णय घेत नाहीव सर्व गोष्टी खुंटीलाच टांगून ठेवतो’.
कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्हाला कशाचा तरी त्याग करण्याची तयारी ठेवावी लागते. ज्याची या त्यागाला तयारी नसते तो दीर्घकाळ विचार करत बसतो. मग त्याला सर्व परिस्थिति जास्त गुंतागुंतीचे वाटू लागते. हा गुंता काही सुटत नाही आणि मग तो काहीच न ठरवता स्वस्थ बसतो.
यशस्वी व्हायचे असेल तर धरसोड वृत्ती न ठेवता एक ठाम निर्णय घेता येण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक असते.
निर्णयक्षम व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…
(निर्णयशक्ती या पुस्तकातील सारांश…)
_
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील