दुकान नेहमी स्वच्छ आणि धूळरहित ठेवा.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

तुमच्या दुकानात धूळ कुठेच दिसत कामा नये.

एखाद्या कप्प्यात धूळ आहे म्हणजे तो कप्पा बऱ्याच दिवसांपासून उघडलेला नाही किंवा त्यातील वस्तू बऱ्याच दिवसांपासून विकल्या गेलेल्या नाहीत असा अर्थ होतो. कित्येकवेळा शोकेस मध्ये ठेवलेल्या वस्तूंवर, बॉक्स वर धूळ साचलेली असते. बऱ्याचदा तर ती वस्तू ग्राहकाने मागितल्यानंतर ग्राहकांसमोरच त्यावरील धूळ झटकून ग्राहकाला दाखवली जाते. अशावेळी हि वस्तू बऱ्याच दिवसांपासून आहे असा अर्थ ग्राहक घेतो, आणि ती वस्तू पाहून पुन्हा ठेऊ देतो. किंवा याहीपेक्षा, असली अस्वच्छ वस्तू घेण्याची त्याची इच्छाच होत नाही.

दुकान नेहमी स्वच्छ ठेवा. दुकानातल्या कोणत्याही कोपऱ्यात कुठेही धूळ दिसणार नाही याची दक्षता घ्या. धूळविरहित दुकान आहे म्हणजे दुकानातील वस्तूंचे रोटेशन चांगले आहे असा अर्थ होतो. सहाजिकच जिथला माल खपण्याचे प्रमाण जास्त आहे तिथे गुणवत्ता आणि सेवा चांगली असणारा असाच अर्थ घेतला जातो, आणि ग्राहकाच्या मनात दुकानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ग्राहकाला अशा दुकानात प्रसन्न वाटते, आणि प्रसन्न वातावरणात खरेदी चांगली होते.

Private File - Access Forbidden

दररोज सकाळी शॉप पूर्ण स्वच्छ करा. धूळ सगळी पुसून साफ करा. आठवड्यातून एकदा छताला चिकटलेले, कान्याकोपऱ्यातले जाळेजळमटे काढून टाका. यासाठी शॉप मध्ये एखादा कर्मचारी असेल तर उत्तम. सेटअप लहान असेल, स्वतः दुकान चालवत असाल, अतिरिक्त कर्मचारी नसेल तर स्वतः हि साफसफाई करा, पण दुकान नेहमी स्वच्छ ठेवा. साफसफाईत तडजोड करू नका.

व्यवसायसाक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

Total Page Visits: 2127 - Today Page Visits: 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!