मोठी इनिंग खेळायची असेल तर पीच वर टिकून राहण्याचं कसब आत्मसात करावं लागतं


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

मोठी खेळी खेळायची असेल तर कोणत्याही परिस्थितीमधे पीच वर टिकून राहणे खूप आवश्यक असते. यासाठी संयम, समर्पण आणि निरीक्षण खूप आवश्यक असते. स्कोर होतो कि नाही याला महत्व नाही, तुम्ही टिकून आहात हे महत्वाचे असते. जसजसे पीच वर रुळायला लागतात हळूहळू स्कोर वाढायला सुरुवात होईल. एक एक करत धावा जमा होत जातील आणि तुम्ही एका मोठ्या खेळीची तयारी सुरू केलेली असेल…. लोकांना वाटतं कि तुम्ही नुसतेच टाईमपास करत आहात, पन्नास चेंडू खेळूनही एकही धाव काढली नाही, तुम्ही खूपच स्लो खेळात आहात… पण जसजसा सामना पुढे सरकत जातो तसतसे लक्षात येते कि सगळे खेळाडू बाद होत असताना सामना फक्त तुमच्या संयमी खेळीमुळेच सावरला आहे…

शांत रहा, धीर सोडू नका, संयमी खेळी खेळा… मोठा स्कोर आपोआपच होईल…

व्यवसाय सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षात बंद पाडण्याचे प्रमाण खूप मोठे आहे, कारण या कालखंडात स्कोर काहीच होत नसतो पण अडचणी भरपूर येत असतात. इथे खचणारे पुढे जाऊ शकत नाहीत आणि इथे खंबीर राहून परिस्थितीला तोंड देत हळूहळू का होईना पण एक एक पाऊल पुढे टाकणारे कधी माघारी फिरत नाहीत.

टीप- जमाना ट्वेन्टी ट्वेन्टीचा वाटत असला तरी व्यवसायात फक्त कसोटी सामनाच असतो. त्यामुळे ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात हळू खेळून जमत नाही असे म्हणून चालणार नाही. दोन चेंडूवर सिक्सर मारून आऊट होणे T-20 मध्ये खपून जातं, कसोटीमधे नाही.

घाईगडबड व्यवसायात चालत नाही. धीर धरा…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!